Skip to main content

सुपरनॅचरल - भाग 3

लेखक nishapari यांनी गुरुवार, 11/07/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 जॉनची पत्नी मेरीला अझाझेल या डेमनने मारलं . त्याचा बदला घेण्याचा जॉनने निश्चय केला . त्यातून तो अमानवी अस्तित्वांना शोधून संपवणारा हंटर बनला ..असे अनेक हंटर त्याच्याआधीही होते पण जॉन मात्र अमानवी अस्तित्वांबाबत पूर्ण अनभिज्ञ होता . मेरीच्या मृत्यूनंतर शोध घेता घेता त्याचा इतर हंटर्सशी परिचय झाला .. त्यांच्या मदतीने आणि स्वतः अनुभव घेत तो लवकरच एक कुशल एक्स्पर्ट हंटर बनला .

चोरीचा मामला!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 11/07/2019 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
एफ एम रेडिओवर एकदा सहज "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" या गण्याचं रिमेक गाणं माझ्या ऐकण्यात आलं. त्यात "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" यानंतर पुढे कोणती शब्दरचना ऐकायला मिळेल याबद्दल मी उत्सुक होतो.

फ्री चा फुगा!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 11/07/2019 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील? बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन! त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी?? मागे एकदा टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र क्लीन आणि क्लियर शाम्पू फ्री द्यायचे रविवारी! मुखपृष्ठाला चिकटवलेला असायचा!

अनपेक्षित धक्का! (कथा)

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 11/07/2019 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
धक्का देणाऱ्या काही छोट्या कथा 1 त्या दिवशी पाच वर्षाचा मुलगा एलेक्स हा त्याचे वडील डेव्हिड यांच्या सोबत एकटाच बेडवर खेळत बसलेला होता, तो म्हणाला, "पप्पा बेडखाली कुणीतरी आहे, बघा ना!" "अरे कुणी कशाला येईल बेडखाली?" "बघा ना, मला हालचाल जाणवतेय!" "ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी बघतो", असे म्हणून डेव्हिडने बेडखाली वाकून पाहिले, बघतो तर काय घाबरून पाय दुमडून थरथरत अलेक्स बेड खाली बसला होता आणि घाबरत हळू आवाजात म्हणाला, "पप्पा बेडवर कुणीतरी आहे!" 2 मी त्या दिवशी घरी एकटाच होतो. रात्री सगळी दारं खिडक्या बंद करून बसलो. तेवढ्यात लाईट गेली.

कधीकधी मी हळवा होतो , बघुनी देव दानवांत

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 11/07/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी मी हळवा होतो बघुनी देव दानवांत का उगविली हि बीजे तू ? अर्धपोटी मानवात कधीकधी मी कठोर होतो बघून साऱ्या वेदनांना भळभळ त्या वाहत असतात पण पुन्हा करतो सुरुवात कधीकधी मी हळहळतो कोमेजल्या कळ्या बघुनी नव्या उमलताना बघून त्याला करतो कुर्निसात कधीकधी मी बिथरतो भविष्यकाळ चिंतूनि कल्पनांच्या माध्यमातून पेटवतो नवी वात कधीकधी मी शोधतो हरवलेली जुनी वाट मिट्ट काळोख दूरदूर आता हीच माझी वहिवाट हीच माझी वहिवाट .... {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

चॉकलेट काका

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 11/07/2019 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे काका ४-५ दिवस बेड वर आजारी असल्याने पडून होते जरा बरे वाटले म्हणून व पाय मोकळे करावे ह्या हेतून त्यांनी सारस बागेत जायचं ठरवलं ते उठले बेसिन जवळ जाऊन वोश घेतला आरशात पहाताना त्यांना जाणवलं दाढी खूप वाढली आहे पण दाढीचा कंटाळा आल्याने तोंड पुसले केस विंचरले पायजमा शर्ट घातला काकांना लहान मुले प्रिय होते त्यांची एक पिशवी होती त्यात गोळ्या चॉकलेट असायचे सोसायटीच्या मुलांना ते कायम देत असत त्यांना मुले चॉकलेट काका म्हणायचे सारसबाग सोसायटी पासून हाकेच्या अंतरावर होते पिशवी घेऊन ते सारस बागेत गेले थोडे पाय मोकळे झाल्यावर ते बाजूच्या बाकावर बसले समोर लहान मुले ६-७ वर्षांची असतील ख

मुत्सद्दी क्रांतिकारी - रंगो बापूजी गुप्ते

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 10/07/2019 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते "रंगो बापूजी गुप्ते". पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली.

टूर दी फ्रान्स - भाग २

लेखक Ashuchamp यांनी बुधवार, 10/07/2019 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
टूर दी फ्रान्स - भाग १ (ओळख) २०१९ टूर बद्दल थोडी माहीती या वर्षीचा रुट २१ स्टेजेसमध्ये एक वैयक्तिक टाईम ट्रायल, एक सांघिक टाईम ट्रायल, ८ फ्लॅट, ४ डोंगराळ आणि ७ पर्वत स्टेजेस आहेत. २० जुलै रोजी होणारी १४ वी स्टेज Tarbes – Tourmalet ही सर्वात कमी म्हणजे ११७.५ किमी तर १२ जुलैला होणारी सातवी स्टेज Belfort – Chalon-sur-Saône ही सर्वाधिक २३० किमी अंतर पार करेल. या ज्या ७ पर्वत अर्थात माऊंटन स्टेजेस आहेत त्या किलर आहेत. La Planche des Belles ला १६५ किमीच्या स्टेजला शेवटचे ७ किमीचा भयानक घाट आहे.

झटपट पापड चाट by Namrata's CookBook : ८

लेखक Namokar यांनी बुधवार, 10/07/2019 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: ६ उडीद पापड धणे+जिरे पुड चाट मसाला/काळे मीठ लाल तिखट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर बारीक शेव बुंदी चवीनुसार मीठ तेल क्रमवार पाककृती: १. उडीद पापड भाजून घ्या २. पापड एका भांड्यात चुरुन घ्या ३. त्यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , बुंदी( optional) , तिखट , चाट मसाला, तेल ,मीठ , बारीक शेव घालून सर्व एकत्र करुन घ्या ४. लिंबाचा रस घालून एकत्र करुन घ्या ५.