मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट पापड चाट by Namrata's CookBook : ८

Namokar · · पाककृती
लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: ६ उडीद पापड धणे+जिरे पुड चाट मसाला/काळे मीठ लाल तिखट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर बारीक शेव बुंदी चवीनुसार मीठ तेल क्रमवार पाककृती: १. उडीद पापड भाजून घ्या २. पापड एका भांड्यात चुरुन घ्या ३. त्यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो , बुंदी( optional) , तिखट , चाट मसाला, तेल ,मीठ , बारीक शेव घालून सर्व एकत्र करुन घ्या ४. लिंबाचा रस घालून एकत्र करुन घ्या ५. सर्व्ह करताना कोथिंबीर घालून सर्व्ह करा खूपवेळ तसच ठेवल्यावर पापड चाट नरम होते ,त्यामुळे खायच्यावेळेसच कांदा , टोमॅटो त्यामध्ये घालून एकत्र करा

वाचने 6805 वाचनखूण प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

पण मांडण्याची शैली अन फोटो उत्तम आहे. आमच्या ऑफिस मधले मारवाडी आणतात हा प्रकार डब्यात कैकवेळा. ते लोक त्याला "पापडकी चुरी" म्हणतात. कोशिंबिरीसारखा खातात हा आयटम. म्हणजे पापड आणतात अन मग ऑफिस कॅफेटेरिया मधून बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, असलीच तर हिरवी मिर्ची अन कोथिंबीर घेऊन मिक्स करतात त्यात.