पावसाळ्यातील एक प्रवास!
गेल्या आठवड्यात काही महत्वाच्या कारणांमुळे भर पावसात मुंबई-पुणे-निपाणी आणि परत पुणे असा प्रवास करावा लागला. त्या दरम्यान आलेले काही अनुभव लिहावे म्हटलं!
तस म्हटलं तर खूप काही वेगळं, थरारक नाही पण माझ्यासाठी तरी बऱ्याच गोष्टी कायम लक्षात राहतील अशा होत्या.
मुंबई मध्ये पाऊस वाढू लागला आणि शनिवारी दुपारी मी पुण्यासाठी बसने निघालो. प्रचंड पाऊस अपेक्षित असल्यामुळे रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी होती, पण एकंदरीत पावसामुळे वेळ लागलाच. एका बोगद्यात आम्ही पोचायच्या आधी एक कार पलटी झालेली बघितली आणि धस्स झालं! घाटामधून दिसणारे धबधबे बघत ४ तासात पोचलो.
मिसळपाव