श्रावणातल्या कहाण्या
श्रावणातल्या कहाण्या
आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार! या शुक्रवारची आणि श्रावणातल्या रविवारची आठवण कायम मानत घर करून आहे; श्रावणामध्ये घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी दर शुक्रवारी जीवत्यांची पूजा करून त्यांची कहाणी वाचायची; आणि रविवारी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. या कहाण्या ऐकायला घरात असणाऱ्या सर्वांनी बसलंच पाहिजे असा तिचा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढंच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायव्हर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसायला बोलावलं जाई.
मिसळपाव