Skip to main content

अक्कलकोट मठ आणि संस्थान

लेखक कंजूस यांनी सोमवार, 23/09/2019 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कलकोट काय आहे बघू म्हणून प्रथमच गेलो होतो. भरपूर पाऊस असल्याने गाड्या वेळेवर जातील का शंका होती. बऱ्याच जणांनी सोलापुरला रेल्वेने जाऊन पुढे बसने जा असा सल्ला दिला. अक्कलकोट रोड नावाचे स्टेशनही आहे आणि तिथे जाण्यायेण्याच्या वेळा ( १० वाजता सकाळी. चेन्नई मेल, उद्यान एक्सप्रेस) चांगल्या वाटल्याने तीच तिकिटं काढली. सध्या तमिळनाडूत तीव्र पाणी टंचाई आणि इतर ठिकाणी फार पाऊस यामुळे गाड्यांची तिकिटं सहज मिळाली. जाण्याचे पर्याय - अ) अक्कलकोट स्टेशन मार्गे. अक्कलकोट स्टेशनला डावीकडे बाहेर (मुंबईकडून येताना) पडल्यावर बस् स्टॉप आहे. कर्नाटकच्या बसेसही असतात.

एका रम्य पहाटे

लेखक मालविका यांनी सोमवार, 23/09/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
एका रम्य पहाटे फेब्रुवारी महिन्यात काही कामानिमित्त पुण्याला जाणे झाले. चिपळूण पुणे अंतर २०० किमी आहे. एकदा दिवसात पुण्यात जाऊन परत यायचं असा प्लॅन ठरला. त्यामुळे पहाटे ४ला चिपळूणहुन निघालो. माझे दोन भाऊ विवेक दादा आणि सुमंता, मी आणि श्रीनिवास असे चौघे जण प्रवासात एकत्र होतो. (त्यावेळी कुंभार्ली घाटाची अवस्था बरी होती) पण पाटण ते उंब्रज रस्ता मात्र वाईट याच अवस्थेत होता. त्यामुळे सुमंता आणि विवेकदादाने एका नवीन रस्त्याने जाऊया म्हणून सुचवले. 'आम्हाला काय ?

प्रभातरंग (आमची रविवार सकाळ)

लेखक अमर विश्वास यांनी सोमवार, 23/09/2019 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभातरंग (आमची रविवार सकाळ) काल सकाळी प्रभातरंग कार्यक्रम पहिला / ऐकला. (प्रभातरंग सकाळीच असतो याची नोंद घ्यावी) कार्यक्रमाची वेळ होती सकाळी साडेसहाची.. रविवार पहाट ... आत्तापर्यंत च्या अनुभवावरून बरोब्बर ७. १० ला पोचलो.. पोचल्याबरोरबर कुठे जागा रिकामी आहे यावर एक सराईत नजर फिरवत असतानाच कानावर शब्द पडले कार्यक्रमाची सुरवात करतो .... वेळेवर आल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटली (इथे पुन्हा तीच स्वतःची पाठ थोपटणारी बाहुली (स्मायली)अपेक्षित आहे .. पण सापडत नाहीये) साबीरभाई स्वतः च बोलत होते .. उस्ताद साबीर ख़ान साहेबांची सारंगी .. साथीला प्रशांत पांडव. पटकन एक खुर्ची पकडली.

ऑब्जेक्षनेबल..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/09/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी रिटायर होण्यापूर्वी एकूण एकतीस वर्षे रेडिओत नोकरी केली. आकाशवाणीवर असताना कोणते शब्द,वाक्यं, गाणी प्रसारीत होऊ द्यायची याबाबत काटेकोर नियम होते. ते पाळावेच लागत. म्हणजे पाळले नाहीत नाहीतर मेमो मिळत. मग मेमोवर न भागलेल्या केसेसना गांभीर्यानुसार प्रसंगी सस्पेन्शन ही भोगावे लागे. तर ते असो. आता "अबीर गुलाल उधळीत रंग" हा तसा किती रसाळ अभंग आहे की नाही ?! पण तो आम्ही रेडियोवर लावू शकत नव्हतो, कारण त्यात "उंबर्‍यासी कैसे शिवू आम्ही यातीहीन " अशी ओळ आहे.

डेट्रॉईट , शिकागो , न्यूयॉर्क ट्रीप साठी मार्गदर्शन हवे आहे

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 23/09/2019 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्या महिन्यात डेट्रॉईट्ला एका कार्यक्रमासाठी जायचे आहे. हातात दहा बारा दिवस आहेत. तीन चार दिवस शिकागो आणि कार्यक्रम झाल्या नंतर तीच चार दिवस न्यूयॉर्क फिरावे असा विचार आहे. माझ्या सोबत कुटुंब आणि तीन ज्येष्ठ नागरीक आहेत. शिकागो आणि न्यूयॉर्क साठी एखादी गायडेड टूर कंपनी / व्यवस्था होऊ शकेल का ? याबद्दल कोणी मार्गदर्शन हवे आहे. या भागात कोणी मिपाकर आहेत का?

अभिनव वैचारिक शब्दप्रवास

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 23/09/2019 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक 22-9-2019 च्या सकाळ, सप्तरंग पुरवणीत प्रा. विनिता देशपांडे (पुणे) यांनी लिहिलेले माझ्या कादंबरीवरचे परीक्षण: - विनीता श्रीकांत देशपांडे डॉ. सुधीर देवरे लिखित "मी गोष्टीत मावत नाही" कादंबरी वाचल्यावर प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे "ते" गोष्टीत खरंच मावत नाहीत. वाचकहो, आता हे "ते" कोण? हे जाणून घेण्यासाठी कादंबरी वाचल्याशिवाय उमगणार नाही. "ते" समाजात सर्वत्र वावरणारे आहेत. सर्व स्तरांवर ते वावरतात.

गंध अद्वैताचे

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 23/09/2019 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
केसांचे हळवे वळसे पाठीवर सळसळ हलके सुटण्या धडपडती ओले जणू कामशराचे चेले मानेला लटके मुरके ज्याने सगळे वेढे सुटले मग कुंतलसंभाराचे जणू प्रपात ते कोसळले धुंद मोगरा हसे साजरा गंधित झाला तुला माळता क्षण शारीर करुनी गेला मादकतेचा कोरा गजरा चढता लाली तुझ्याच गाली अवचित होई गोरामोरा केशी लपवुनी अंग मखमली चेहरा झाके विसरुनी तोरा सुमनदलांची तनू थरथरे मुग्ध मोकळी चुरगळ पसरे उन्मनी तुझे हास्य मोहरे गात्रीं तुझिया लक्ष मोगरे धवलपुष्पी सुख उन्मळे कुसुम हरपले मुरून गेले भारुनी काया तुझी परिमळे उरले गंधांचे अद्वैत आगळे । - अभिजीत
काव्यरस

सायकल दौरा पूर्वेचा घाट- असा घातला घाट २

लेखक मित्रहो यांनी सोमवार, 23/09/2019 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग पूर्वतयारी, part1, मारेडमल्लीला डास असले तरी शरीर थकल्यामुळे मस्त झोप लागली. मारेडमल्लीचे जेवण पण सुंदर होते. दुसऱ्या दिवशी मारेडमल्ली ते नरसीपट्टणम असे १३४ किमीचे अंतर कापायचे होते. मी आजपर्यंत कधीही सलग दोन दिवस शतक पूर्ण केले नव्हते. आजच्या रस्त्यात आदल्यादिवशी सारखे चढ नव्हते. पूर्ण सपाट जरी नाही तरी रस्ता सोपा होता. मारेडमल्लीवरुन आम्ही सकाळी सातला निघालो. आमचा पहिला पाडाव होता रंपाचोडावरम या गावात, नाष्ट्यासाठी. रंपाचोडावरम हे तसे महत्वाचे गाव आहे.

ती लेस्बिअन आहे?

लेखक राजे १०७ यांनी रविवार, 22/09/2019 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी शिक्षण घेतलेल्या कोर्सची मुलं नव्वद पंचाण्णव टक्के सरकारी नोकरीत जात असत. माझंही शिक्षण पूर्ण झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळाली. माझे क्लासमेट उच्च पदांवर वेगवेगळ्या खात्यात क्लास थ्री पासून ते सुपर क्लास वन अधिकारी बनले होते. मी एका तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करत होतो. सोबतच शेजारच्या गावचा माझा बॅचमेट व जवळचा मित्र नोकरी करत होता. अगोदर वेगळ्या जिल्ह्यात नोकऱ्या करून एकाच तालुक्यात बदलून आलो होतो. मित्र जिल्ह्याच्या ठिकाणी रहात होता व मी माझ्या हेड क्वार्टर ला रहात होतो. एकमेकांच्या घरी जाणे येणे होत होते. आमचं मुळ गाव दूसऱ्या जिल्ह्यात होते व नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात करत होतो.

भंडारदरा

लेखक vcdatrange यांनी रविवार, 22/09/2019 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
भंडारदराला जेव्हा कधी जाणं झालयं प्रत्येकवेळी काहीतरी नविन विषय वळवळतो डोक्यात. मागे प्रवरा मेडिकल ट्रस्ट करिता आदिवासी आरोग्याच्या उपक्रमांची आखणी, नियोजन केले होते. त्यातले एक प्रोडक्ट होते "मोटारसायकल अॅम्ब्युलन्स". अहमदनगर जिल्ह्यात, विशेषत: भंडारदरा धरणक्षेत्रातील काही दुर्गम, अतिदुर्गम गावं जेथे रस्तेच काय पण पायवाटाही नाहीत, अशा ठिकाणच्या नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या जीवावरचे संकट टळावे, या हेतूने या मोबाईल रुग्णवाहिका प्रस्तावित केली.