डुब्रॉवनिक ....!!!!!
सकाळी नेहमी प्रमाणे लवकरच पहाटे जाग आली, पाच वाजलेले. ऊठून आवरायचं होतंच.नाश्ता पण करून बरोबर घ्यायचा होता. कारण बोटीवरती काय खायला मिळते माहित नाही, त्यामुळे मग फ्रेंच टोस्ट करून घेतले. सोबत नेहमीप्रमाणे छत्री, पाणी असा जामानिमा होताच. सकाळी साडेसहाची टॅक्सी बोलावली. लवकरच पोर्टवर पोहोचायचं ठरवलेलं इकडे तिकडे थोडं फिरता येईल म्हणून. तिथे बोट लागलेली होती पण दरवाजे बंद होते. दोन-चार लोक बॅगा घेऊन उभे होते.
आम्ही तिकडेच थोडं फिरत बसलो. एका वेगळ्या अँगलनं सगळं स्प्लिट असं समोर दिसत होतं.
व्हाटसअॅप चा एसएमएस मेसेज
तो: हॅलो.
ती: हं बोला.
तो: काय गं, झोप झाली का?
ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.
तो: हं.
ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.
तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी एक एसएमएस पाठवलेला होता वाचला का?
ती: हो वाचला ना. म्हणून तर विचारले की तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही व्हाटसअॅप केले आहे ना?
तो: अग, एसएमएस चा मेसेज म्हणतोय मी.
धो धो धो की भं भं भं ( भाग १)
राजपुत्र आणि प्रधानपुत्र खूप जिवलग मित्र असतात. दोघेही शूरवीर असतात. दोघांनाच दूर दूर जंगलात शिकारीला जाण्याचा छंद असतो. एकदा असेच ते दोघे अरण्यात शिकारीसाठी जातात, बरेच प्रयत्न करुनही शिकार मिळत नाही. ते असेच घनदाट जंगलात पुढे जात राहतात. शिकार केल्याशिवाय परत यायचं नाही म्हणून चार पाच दिवस झाले तरी तिकडेच मुक्काम करतात. झाडांची फळे खाऊन, झऱ्याचं पाणी पिऊन तहान भूक भागवतात.
पाचव्या दिवशी ते एका तळ्याकाठी येतात. तळ्याकाठी त्यांना एक अतिशय सुंदर, लावण्यवती तरुणी दिसते. तिच्या हातात एक लाल असतो. त्या लालमधून लालसर प्रकाश बाहेर पडत होता.
मंतरलेले दिवस २
शारदोत्सव
नवरात्र सुरू झाले की माझ्या बालपणच्या नवरात्रातल्या महालक्ष्मीच्या जत्रेच्या स्मृती मनात रुंजी घालू लागतात. आमच्या घरी सखूआज्जी - आईची एक सख्खी मावशी कायमची राहायला आलेली होती. वयात अंतर असले तरी तशा दोघी मैत्रिणीच होत्या. दोघीही धार्मिक आणि सश्रद्ध. देवी ही स्त्रीशक्ती असल्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांना महालक्ष्मी देवीचे फार अप्रूप. गणपती विसर्जन झाले की दोघींना महालक्ष्मीच्या जत्रेचे वेध लागत. माझ्या एकदोन मावसबहिणी पण पितृपक्षात कधीतरी आमच्याकडे येऊन जात. जत्रेला जायचा दिवस ठरवायला.तुझ्या भेटीला आलो दत्ता
तुझ्या भेटीला आलो दत्ता
सत्वरी या आता ||
तुझ्या मंदीराची केली वाट सोपी
नसे काही चिंता, मनी आस मोठी
वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा ||
भक्तांची दु:खे करुनीया दूर
दिले जीवनात सुख भरपूर
सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता ||
पाहूनिया रुप होईल मनाची शांती
नसे आस कसली, तिच विश्रांती
सखा तूच गुरू तूच तूच होई दाता ||
ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती
तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी
रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां ||
- पाषाणभेद
२८/०९/२०१९
बाबा आणि खुशीची नेपाळ सफर
"तुझी लढाई फक्त तुझ्या स्वतःबरोबर आहे. दुसऱ्या कुणाबरोबर नाही. इतरांकडे लक्ष देऊ नकोस." बाबा ऐकत होता. अडकून पडलेलं एक दार उघडत होतं. बाहेरून मदत मिळाल्यावर बऱ्याच वर्षांपासून अडकलेलं दार उघडलं. एके दिवशी बाबा विचार करत होता, "जर आपण दार अडकूच द्यायचं नाही असं ठरवलं तर?" ठरवणं हि पहिली पायरी. सतत जागरून राहून प्रयत्नपूर्वक पुढे जाणं हि योग्य वाटचाल. आपली वाट आपणच शोधावी लागते. दुसऱ्या कुणावर सोडून देऊन चालत नाही. असे शेकडो धडे जगाच्या बिनभिंतीच्या शाळेत मिळतच असतात. शिकणाऱ्याला. शिकायची इच्छा नसणाऱ्याची घागर रिकामीच राहते.
या पसाऱ्याचं काय करावं?
मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली.
दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत.
दोन नको देऊ...
लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात.
सदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा.
एक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले.
कलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं.
radio ga ga
RADIO GA GA………………
ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो.
मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.
मिसळपाव