Skip to main content

बुरहानपूर आणि महेश्वर

लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 02/11/2019 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातल्या सगळ्या राज्यांमधलं मध्य प्रदेश हे माझं आवडतं राज्य आहे. मला जुने महाल, गढ्या, राजवाडे, किल्ले, मंदिरं, छत्र्या, मशिदी, थडगी आणि स्मारकं पहायला आवडतात. मध्य प्रदेशात हे सगळं मुबलक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं हे राज्य आताशा नुकतंच प्रसिद्धीच्या झोतात येत असल्यामुळं इथे गर्दी कमी असते, शिवाय महाराष्ट्राला लागून असल्यामुळे ते पोहोचायलाही सोयीचे आहे.

जन्मांतरीचे प्रेम

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी शनिवार, 02/11/2019 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज बँकमध्ये खुप गर्दी होती. महीन्यातला शेवटचा आठवडा असला की गर्दी ठरलेलीच. मिताली विंडोवर बसून आपलं काम करत होती. स्लिपवर लिहलेली रक्कम मोजून समोरच्या ग्राहकांना देणं आणि घेणं मोठं जोखमीचं काम. म्हणजेच विड्रॉवल आणि डिपॉझिट दोन्ही मितालीकडेच होतं. त्यामुळे मान वर करून इकडे तिकडे बघणं अशक्य. दोन नंतर जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा मिताली लंचसाठी गेली. आल्यावर काम होतंच. चारला बँक बंद होत असे. आज लंच करून आल्यावर ती कॅश मोजत होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या विंडोवर आलं. "बसा" तिने वर न बघताच सांगितलं तेव्हा ती व्यक्ती चेअर घेऊन बसली. कॅश मोजून झाल्यानंतर. ती त्या व्यक्तीला म्हणाली, "बोला".