Skip to main content

पर्स..

लेखक आजी यांनी सोमवार, 02/12/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पर्स म्हणजे एक वस्तुसंग्रहालय आहे. माझ्याकडे इतक्या पर्सेस आहेत, पण अजूनही मला माझ्या गरजा पूर्ण करणारी, योग्य आकाराची, आदर्श पर्स मिळालेली नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या पर्सेस आहेत. त्यांत मी बॅग बनवणाऱ्याकडून, लघुउद्योजक बायकांकडून, माझ्या अपेक्षा सांगून बनवून घेतलेल्या बॅग्जही आहेत. मला गरजेनुसार पर्सेस लागतात. सकाळी फिरायला जाताना लहानशी पाण्याची बाटली, मोबाईल, एक रुमाल आणि घराची किल्ली एवढंच सामावणारी लहान पर्स मला हवी असते. तर प्रवासाला जाताना मला मोठी पर्स हवी असते.

आशय - भाग ६

लेखक किंबहुना यांनी सोमवार, 02/12/2019 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 5 माझा संतापाने तिळपापड झाला. चहा प्यायच्या टेबलवर मी त्याला झाप झाप झापला. तो देखील मला सॉरी म्हणाला. तो म्हणाला की रात्री तूच माझ्या जवळ येऊन झोपलास, मला वाटले तुला सवय आहे याची, आणि नकळत माझ्या हातून तसे घडून गेले. मी देखील त्याला वॉर्निंग देऊन विषय संपवला.>>>>> पण विषय अर्थातच संपलेला नव्हता. जाणाऱ्या दिवसांसोबत माझा रागही शांत झाला. अश्यातच एका रात्री त्याने पुन्हा प्रोपोझल मांडलं. का कोण जाणे, मला या वेळेस त्याची दया आली, जे अतिशय अयोग्य होतं, पण ते मला खूप उशीर कळलं..

ती सर ओघळता..

लेखक आनंदमयी यांनी सोमवार, 02/12/2019 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
ती सर ओघळता सोबतीस मी झरतो तो मेघ झुरावा तैसा मीही झुरतो आपुलेच काही तुटुन ओघळून जावे खेदात तशा मी कणा कणाने विरतो... ती सर ओघळता विझती स्वप्नदिवेही अन दिवसासंगे विझून जातो मीही अन लख्ख काजळी गगनी दाटून येता मी आशेचे कण शोधित भिरभिर फिरतो ती ओघळता मी सुना एकटा पक्षी पंखांच्या जागी असाह्यतेची नक्षी शेवटास मीही काव्यपंख लेवून आठवांभोवती तिच्या नित्य भिरभिरतो ती सर ओघळता उरे न काही बाकी सहवास सरे अन अंती मी एकाकी ती सरीसारखी चंचल आर्त प्रवाही तिज धरू पाहता मीच दिवाणा ठरतो ©अदिती जोशी

सृजनाचा व्यायाम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/12/2019 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात. परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले, "व्यायाम करतोस ना रोज?’’ "होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शिर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळे तेही नाही करत.’’ असं म्हणून ज्युनियरने सिनियरला बोलायला स्पेस दिली. स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, "बरोबर, आता या वयात नाही करू शिर्षासन. मानेला त्रास होतो.

संदीपची हुषारी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/12/2019 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतनत हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. "मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत", सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते. पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे.

देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।।

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 30/11/2019 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुळजाभवानीचे दागिने कर्मचा-यांकडून लंपास लोकसत्ता 30 नोव्हेबर 2019 देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। म्हणून लंपास केली मंदिराची तिजोरी ।। तुम्ही करत बसा कोर्ट आणि कचेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। सोने, चांदी, भांडीपात्र, काही शिल्लक नाहीमात्र।। तुम्ही बसा तपासत, नोंदी आणि हजेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। तीर्थी धोंडा पाणी म्हणाले तुकोबा जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पानी वाणी ती कबीरी देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। मंदिरांच्या तिजोरीत सोने चांदी सडती ।। इथे गोरगरीब अन्नाविना रडती ।। करा देव-तिजोरीची निलामी साजरी।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचा

दोसतार - २५

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/11/2019 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दगडावर पडल्यावर पाण्याचा कसलासा खिसफीस खिसफीस आवाज येत होता . आत्तापर्यंत पाणी किती गार आहे ते समजले होते त्यामुळे पाण्याच्या धारेत ओंजळ धरल्यावर अगोदर बसला होता तसा शॉक बसला नाही. ओंजळीतले ते पाणी तोंडात घेतले. आहाहाहा... जगातल्या कुठल्याच सरबताला त्या पाण्याची चव आली नसती. जादुची चव होती. प्रत्येकजण ते पाणी प्याला. ताजेतवाने की काय तसे झालो. तेथून पाय निघत नव्हता पण आता आम्हाला यवतेश्वरला पण पोहोचायचे होते.. मागील दुवा: http://misalpav.com/node/45748 खरे तर अजून तेथे थांबावेसे वाटत होते.

Kingआख्यान:- डोलोरस क्लेबोर्न

लेखक शा वि कु यांनी शुक्रवार, 29/11/2019 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
नववीत गेलो आणि वाचनासाठी नवी दारं खुली झाली. वडीलांच्या अँड्रॉइड फोनवर पीडीएफ फाइल्स डाउनलोड करून मून रीडर किंवा adob reader ऍप वर वाचणे. यातून मोठया कटकटी दूर झाल्या, लायब्ररीत चकरा मारायला नकोत, पैसे देऊन नवी पुस्तकं पण घ्यायला नकोत. आणि पुस्तकांचा तर नुसता महापूरच. जवळजवल सगळी प्रसिद्ध पुस्तकं फुकट उपलब्ध.याआधी घरातली वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचायची असा प्रकार होता. आता मात्र जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा खुल्ला acces होता ! मग सॉंग ऑफ आईस अँड फायर झालं. ते आजपर्यँत हॅरी पॉटरच्या पुढे न गेलेल्या माझ्यासाठी फारच भारी अनि रोमांचक होतं. त्याच्या धुंदीत नववी संपली.