कविता: शब्द
शब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव
माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्दांना मेळ
अवधानांनेे झाला शब्दांवरच वार
कशी लावू आता शब्दांना धार
अविश्वासाने केला शब्दांचाच घात
शब्दांनी करायची अविश्वासा वर मात
शब्दांनी केला नात्यातच बुद्धिभेद
एकत्र येऊन सारू नात्यातील मनभेद
काव्यरस
दोसतार-३०
एकदाचे दप्तर भरून झाले. डबा घेऊन घरातून बाहेर पडलो. वाटेत योग्या सहावीतल्या तीन चार पोरांबरोबर चालताना दिसला . गणवेश आमच्याच शळेचे होते. असा एखादा गणवेश घालून चाललेला पोरांचा घोळका दिसला ना की गणवेशामुळे नाव माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. आपण आपसूकच त्या घोळक्यात सामील केले जातो. कधी होऊन जातो ते कळत पण नाही
मागील दुवा : http://misalpav.com/node/45845
सहावीतली मुले उंचीने एकदम लहान . त्यांच्यासोबत चालताना योग्याला काही ऐकायचे असेल तर वाकून चालावे लागते.
अल्याड पल्याडच्या वेणा
अल्याड पल्याडच्या वेणा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपूर्वा कळवळून किंचाळली ...
तिच्या पोटात भयंकर कळ आली होती. अगदी असह्य ! ती कळवळली.
ती आता लेबर रूममध्ये होती. तिला मधूनच कळा येत होत्या. कमी होत होत्या. अशा कळा की जगात त्यावाचून दुसरं काहीच नाहीये !
बाळंतपणाच्या कळा ! सगळ्यात असह्य. एखादा बॉम्ब फुटून त्याचे धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, त्याही पेक्षा जास्त. तरीही प्रत्येक स्त्रीला हव्याहव्याशा वाटणाऱ्या वेणा !
पण कळांमध्ये सातत्य नव्हतं.
शब्द वेध
श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली.
अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच.
हिएन्ना - म्युनिक - ऍमस्टर्डम फिरती मदत !!
नमस्कार मित्रांनो - मदत हवी आहे !! जानेवारी 10-18 युरोपात दौरा आहे. जानेवारी 12-15 ऑफिसचा event म्युनिक मध्ये.
मी आणि माझा मित्र दोघे सोबत आहोत. दोघेही शाकाहारी.
कृपया राहण्यासाठी/खाण्यासाठी स्वस्त-मस्त जागा आणि फिरण्याची ठिकाणं कळवा. रूपरेषा खालील प्रमाणे
10 मुंबईहुन ऍमस्टर्डम
11 जानेवारी - ऍमस्टर्डम फिरू शकतो
12 -15 म्युनिक मध्ये ऑफिसचा event
15 ला म्युनिकहुन व्हिएन्नाला येणार. बस कि ट्रेन कळवा ?
16 आणि 17 जानेवारीला व्हिएन्ना फिरू शकतो.
धन्यवाद !!
बोइंग ७३७ मॅक्स - अपघात की मनुष्यवध?
अडीच वर्षांपूर्वी म्हणजे मे २०१७ मध्ये बोईंग ७३७-मॅक्स वापरात आलं. दीडच वर्षांत म्हणजे ऑक्टोबर २०१८ साली पहिला अपघात झाला आणि पाच महिन्यात म्हणजे मार्च २०१९ मध्ये दुसरा कॉपीकॅट अपघात झाला! साडेतीनशे जीव मृत्युमुखी पडले!
जगातली सर्व ७३७ मॅक्स विमानं स्थानबद्ध केली गेली.
सुदैवानी विमान अपघात क्वचित होतात. यात 'सुदैवानी' हा शब्दप्रयोग तितकासा योग्य नाही. विमान बांधणीत, त्यांचा मेंटेनन्स करण्यात, रनवे बांधण्यात आणि विमानं उडवण्याच्या वगैरे सर्व कामात दैवावर विसंबून राहता येत नाही.
असीम आणि मीरा
लग्न लागलं आणि असीम उठला. त्याला आधीपासूनच लग्नाला यायचं नव्हतं पण ज्याचं लग्न होत तो त्याचा जेष्ठ सहकारी होता. असीमचा मुख्य उद्देश पुढे घोडसाळला जाणे होता. अनासायासे लग्न गुरुवारी होतं, म्हणून मग त्याने सुट्टीच टाकली होती. जेवायला जाताना त्याला मीरा दिसली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. तिनेसुद्धा असिमसारखा वेष घातला होता, जीन्स आणि त्याला साजेसं काहीतरी. असिमला थोडं ते अजीब वाटलं पण त्याने फार विचार नाही केला. त्याला हे सगळं सम्पवून पुढे जायचं होतं. त्याच्या बरोबरच्या लोकांसोबत असीम जेवला, जेवण काही फार फाडु नव्हतं पण पोट भरलं.
<मंजूर नाही>
क्रान्तितैच्या कविता म्हणजे मेजवानी असते. कितीदा तरी वाचून झाल्या असतील. तरीही पुन्हा वाचतांना फ्रेशच वाटत असतं!
तिची कविता नुसती वर काढूनही समाधान होत नाही. त्यासाठी हा एक विडंबनाचा प्रयत्न! यासाठीची प्रेरणा म्हणजे क्रान्तितैची एक अप्रतीम गझल..
दोसतार - २९
सायकल एष्टी बस इतकी लांब झाली होती. इतकी की आळीतल्या रामाच्या देवापुढच्या वळणावरून सायकल वळवायला शुक शुक करत मधे येणार्या तीन चार जणांना बाजूला करण्यासाठी त्याला सायकलवरून खालीच उतरावे लागले
मागील दुवा http://misalpav.com/node/45789
त्या लांबलचक बांबुचे एक टोक सायकलच्या दांडीवरून बरेच पुढे आलेले होते. हँडल वळवताच येत नव्हते. रहदारी साम्भाळत ,थोडे मागे पुढे करणे सायकल उचलून वळवणे अशी सरकस करत करत सायकल वळवत होता. त्यातच मधे कोणी आले की ही सरकस आणि तिथली रहदारी दोनहीही एकमेकात अडकायचे.
मिसळपाव