Skip to main content

(प्रच्छन्न)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 27/12/2019 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थात ती विडंबित कविता धूसर होऊन विरून जाते कधी उचकापाचक करता करता अवचित दिसते पुन्हा विडंबन ते प्रतिक्रियांच्या पल्याड नेते अन् नकळत हसू अवखळसे ओठांवर येते चिवट कवी हे घाव विडंबित सोशीत राहतो अन् पुन्हा नवा कच्चा माल पाहूनी मी प्रच्छन्न हसतो पैजारबुवा,

प्रसन्न

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 27/12/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
ते विस्मृत गाणे धूसर होऊन विरून जाते पण नेणीवेच्या अथांग डोही अवचित दिसते मग पुन्हा गीत ते शब्दांच्याही पल्याड नेते अन् नकळत अश्रु झरताना ओठांवर येते मग पुन्हा पुन्हा मी घाव सोसुनी लढत राहतो अन् कितीही हरलो तरी खळाळून प्रसन्न हसतो
काव्यरस

सोमा टक्रीकर -- एका कालवश मर्मस्पर्श

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 27/12/2019 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
(बॉल्टिमोर मराठी मंडळाच्या दिवाळी २०१९ अंकात मूळ प्रकाशित अद्भुत-भविष्य-रम्य कथा, जालावर अन्यत्र सहप्रकाशित) … (T)ouch … gives us our sense of 'reality'… rainbows, reflections in looking glasses, and so on (cannot be touched) … our whole conception of what exists outside us is based on the sense of touch. -- Bertrand Russell in ABC of Relativity ------- बॉल्टिमोर, सोमवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०३५. मागच्या शनिवारी, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सोमा टक्रीकर विलीन झाले, परंतु जालविश्वात या बातमीचे पाच लाखापेक्षा कमी पुनःस्पर्श झाले.

चित्रपट परीक्षण - पानिपतचे पानिपत !

लेखक kvponkshe यांनी गुरुवार, 26/12/2019 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
https://encrypted-tbn2.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS0jmiD28tffm_2izq… निर्माते कशासाठी चित्रपट काढतात ? लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ? खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून ? समाज प्रबोधन करण्यासाठी? वरील प्रश्नाचे खरे उत्तर "पैसे कमावण्यासाठी " हेच आहे. जेव्हा एखादा निर्माता शेकडो कोटी खर्च करून एखादा चित्रपट काढतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की त्यातून त्याचे शेकडो कोटी वसूल व्हावेतच, शिवाय अधिक शेकडो कोटींचा नफा व्हावा. आता उलट बाजू विचार करू.

कविता: शब्द

लेखक bhagwatblog यांनी गुरुवार, 26/12/2019 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी केला शब्दांवर घाव विसरलो शब्द राहिला नाही ठाव माणसांनी केला शब्दांचाच खेळ आता कसा घालू शब्दांना मेळ अवधानांनेे झाला शब्दांवरच वार कशी लावू आता शब्दांना धार अविश्वासाने केला शब्दांचाच घात शब्दांनी करायची अविश्वासा वर मात शब्दांनी केला नात्यातच बुद्धिभेद एकत्र येऊन सारू नात्यातील मनभेद

दोसतार-३०

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 25/12/2019 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाचे दप्तर भरून झाले. डबा घेऊन घरातून बाहेर पडलो. वाटेत योग्या सहावीतल्या तीन चार पोरांबरोबर चालताना दिसला . गणवेश आमच्याच शळेचे होते. असा एखादा गणवेश घालून चाललेला पोरांचा घोळका दिसला ना की गणवेशामुळे नाव माहीत नसले तरी काही फरक पडत नाही. आपण आपसूकच त्या घोळक्यात सामील केले जातो. कधी होऊन जातो ते कळत पण नाही मागील दुवा : http://misalpav.com/node/45845 सहावीतली मुले उंचीने एकदम लहान . त्यांच्यासोबत चालताना योग्याला काही ऐकायचे असेल तर वाकून चालावे लागते.

अल्याड पल्याडच्या वेणा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 24/12/2019 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
अल्याड पल्याडच्या वेणा ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अपूर्वा कळवळून किंचाळली ... तिच्या पोटात भयंकर कळ आली होती. अगदी असह्य ! ती कळवळली. ती आता लेबर रूममध्ये होती. तिला मधूनच कळा येत होत्या. कमी होत होत्या. अशा कळा की जगात त्यावाचून दुसरं काहीच नाहीये ! बाळंतपणाच्या कळा ! सगळ्यात असह्य. एखादा बॉम्ब फुटून त्याचे धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, त्याही पेक्षा जास्त. तरीही प्रत्येक स्त्रीला हव्याहव्याशा वाटणाऱ्या वेणा ! पण कळांमध्ये सातत्य नव्हतं.

शब्द वेध

लेखक मारवा यांनी मंगळवार, 24/12/2019 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
श्री मृगेंद्र कुंतल यांचा पसारा वरील आणि श्री कुमार यांचा शब्दकोशांवरील हे सुंदर धागे वाचुन मला शब्दवेध या नावाने एक धागा काढण्याची कल्पना सुचली. अर्थात मी भाषा विषयाचा अभ्यासक नाही व वरील लेखकांप्रमाणे माझा सखोल व्यासंग नाही. माझे फक्त शब्दांवर प्रेम आहे आणि त्यांचा धांडोळा घ्यायला मला आवडते. कदाचित मला माहीत असलेले काही शब्दांचे अर्थ बरृयाच जणांना नविन नसावेत पण माझ्यापुरते मला जे रोचक शब्द वाटले अर्थपुर्ण वाटले ते मला इथे तुमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात इतकेच.

हिएन्ना - म्युनिक - ऍमस्टर्डम फिरती मदत !!

लेखक नजदीककुमार जवळकर यांनी मंगळवार, 24/12/2019 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो - मदत हवी आहे !! जानेवारी 10-18 युरोपात दौरा आहे. जानेवारी 12-15 ऑफिसचा event म्युनिक मध्ये. मी आणि माझा मित्र दोघे सोबत आहोत. दोघेही शाकाहारी. कृपया राहण्यासाठी/खाण्यासाठी स्वस्त-मस्त जागा आणि फिरण्याची ठिकाणं कळवा. रूपरेषा खालील प्रमाणे 10 मुंबईहुन ऍमस्टर्डम 11 जानेवारी - ऍमस्टर्डम फिरू शकतो 12 -15 म्युनिक मध्ये ऑफिसचा event 15 ला म्युनिकहुन व्हिएन्नाला येणार. बस कि ट्रेन कळवा ? 16 आणि 17 जानेवारीला व्हिएन्ना फिरू शकतो. धन्यवाद !!