Skip to main content

मुंबई-पुणे-मुंबई (भाग २)

लेखक सौरभ नेवगी यांनी रविवार, 02/02/2020 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
१ फेब्रुवारीला लग्न समारंभ उरकल्यानंतर आतील पुण्यातला गोंधळ पाहिला आणि २ तारखेला भावासोबत outskirts मधली शांतता अनुभवली. ३ तारखेला रविवारी परततीचा प्रवास करायचा होता. रात्री उशीरापर्यंत बॅग भरायचा प्रोग्रॅम सुरू होता. २-३ दिवसाचे माझे कपडे मी ३१ आधीच पुण्याला पाठवले होते, आता ते परत बदलापूरला मलाच आणायचे होते. त्यात किलोभर चितळे भाकरवडी होतीच. २-३ lit पाणी, १ रेडबूलचा कॅन, अंडी असा सगळा ६-७ किलोचा संसार पाठीवर येणार होता. भाकरवडीला चिक्कीची सोबत लोणवळ्याला होणार होती. रविवारी ६:०० ला निघायच ठरवल आणि मी ६:३० नंतर भावाच घर सोडल.

'इमॅजिन' (कल्पना कर...)

लेखक कुमार जावडेकर यांनी शनिवार, 01/02/2020 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(जॉन लेनन यांच्या 'इमॅजिन' या गीताचा स्वैर अनुवाद) सहज कल्पना कर, स्वर्गच नसेल तर.. नरकही नसेल अन् होईल आकाश घर! (कल्पना कर, जगेल जग आजचा प्रहर) न देश, न देशभक्ती मारण्या-मरण्यासाठी न धर्मही जीवनी या भरण्यासाठी जहर (कल्पना कर, शांतता पसरेल दूरवर) भासेल एकले स्वप्न, येतील ज्यात सकल... अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर! (कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर) लोभ, मोह ना अपेक्षा, उपेक्षाही ना कुणाची निनादेल दाही दिशा विश्वबंधुत्वाचा स्वर! (कल्पना कर, होईल हे विश्व बलसागर) भासेल स्वप्न हे माझे, येतील ज्यात इतर... अन् भिंतींविना दिसेल जग नितांत सुंदर! (कल्पना कर, दृष्टीत येईल उंच शिखर) - कुमार
काव्यरस

भाषेतला आप आणि पर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/02/2020 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात जवळ जवळ पासष्ट बोली बोलल्या जातात. अनेक बोलीभाषेत पुस्तकेही निघू लागलीत. त्या त्या बोलीतले बरेच व्यासंगी लेखक आहेत. ते सातत्याने आणि विपुल लेखन करीत असतात. शोध व संशोधनात्मक निबंध लिखाणही करीत असतात. विविध चर्चासत्रांतून सादर करत असलेल्या निबंधांसाठीही ते खूप मेहनत घेतात. विद्यावाचस्पती शिस्तीच्या अभ्यासातून त्यांची शैक्षणिक जडणघडण झालेली असल्याने त्यांच्या लिखाणाला वजन प्राप्त होते. त्यांची मातृभाषा जी बोलीभाषा असते त्या बोलीबद्दल साहजिकच त्यांना आत्मियता असते. आपल्या भाषेवर ते भरभरून प्रेम करतात. ते रास्तच आहे.

भाग १५ अंधारछाया प्रकरण १४ - ‘अहो, या पोरटीला घरातून घालवा बरं! माझ्याने आता सहन नाही होत.

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 31/01/2020 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

चौदा मंगला अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. असं अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं. काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी.

दोसतार - ३५

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 30/01/2020 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला येत नसेल त्याने भौतीक शास्त्रातील न्यूटन चा नियम शिकवा म्हणजे तुम्हाला तो नीट समजेल काय सुषम " सुषम चा आणि भौतीक शास्त्राचा कायमचा युद्धाचा पावित्रा असतो हे आम्हीच काय पण बाइंनाही पण माहीत आहे हे आम्हाला आजच कळले. "आणि तू काय शिकवणार आहेस" " मी सातवीच्या वर्गाला समांतर रेषां शिकवणार आहे" एल्प्याच्या या उत्तरावर आम्हीच काय पण तारकुंडे बाईपण अचानक दप्तरात बेडूक दिसल्यासारख्या चमकल्या.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46021 एल्प्या हे असे काही म्हणेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. बाइंसारखेच आम्ही सगळेच चमकलो.

श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 30/01/2020 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || बाहेर एकदम जोरदार पाऊस कोसळतोय . नदीच्या दुथडी भरुन वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट अगदी इथवर ऐकु येतोय , नदी धुसरशीच दिसत आहे पण तिचं अस्तित्व अगदी सुस्पष्ट जाणवत आहे. अधुन मधुन जोरदार विजा कडाडत आहेत अन त्याच्या प्रकाशात निमिषार्धच नदी चा प्रवाह उजळुन निघतोय. आणि आपण हे सारं अनुभवतोय ह्या जुनाट शिवालयाच्या आसर्‍याला बसुन ! जुनेच पण प्रशस्त आणि आत्ता ह्या वेळेला तर अगदीच निर्जन. अगदीच नाही म्हणायला मंदिराच्या दुसर्‍या कोपर्‍यात बसलेले ते २ ४ सन्यासी आहेत , पण त्यांचीही काही बडबड नाही , ते त्यांच्या गांजासेवनात सुखाने तल्लीन झाले आहेत.

भाग १४ अंधारछाया प्रकरण १३ - ‘रक्ताची उलटी होतेय...मिरजेच्या मिशन हॉस्पिटलात न्या...कुठला कोण तो कुडबुड्या गुरूजी...‘मला तर फसवून तुम्हा त्या गुरूजीकडे नेलत!

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 30/01/2020 00:56 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

तेरा मंगला बेबीला कॉफी दिली. पुन्हा झोपवली कॉटवर. अंगावरची लाली कमी झाली. पण तिच्या हाताला हात लाववेनात! हातपाय सणकून तापले होते. कपाळावर हात ठेवून पाहिला. तर कपाळ थंड होते! ताप पाहिला तर साडे अठ्ठ्याण्णव काय करावे कळेना. झोपल्या झोपल्या कॉफी पिते म्हणाली, म्हणून दिली कढत कढत. डोळा लागला असे वाटून मी गेले स्वैंपाकघरात. आज जपाच्या माळा झाल्या नाहीत हिच्या. रात्री मग जागावे लागते, एकशेआठ माळा पुऱ्या करायला! दुपारी हे आले. जेवले. तरी ही झोपलेलीच होती. मुले दुपारच्या सुट्टीत खायला आली. तेंव्हा म्हटले, ‘चार घास खाऊन घेतेस का बेबी? तर म्हणाली, ‘नको पडू दे’.

मुंबई-पुणे-मुंबई

लेखक सौरभ नेवगी यांनी बुधवार, 29/01/2020 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
३१/०१/२०१९ घरच्यांचा विरोध पत्करून ३१ जानेवारीला पुण्यासाठी सायकल घेऊन पहाटे ५:४५ ला बदलापूर सोडल. अचानक पुण्याला जाण्यास कारण असे की, लंगोटी याराच्या बहिणीचं लग्न. या आधी पुण्याला ४ / २ चाकी घेऊन न गेलेला मी आता direct सायकल ने जाणार तेही एकटाच, याच सगळ्यांना tension (अगदी मलासुद्धा). तरिही मनाशी निश्चय पक्का करून सायकल घराबाहेर काढली. मधे ४-५ स्टॉप घेणार होतो. पहाटे रस्ता नीट दिसत नव्हता, परंतु कर्जत पर्यंतचा रस्ता तोंडपाठ होता. गुलाबी थंडी enjoy करत २ तासात कर्जतला पोहोचलो. चारफाट्याला १५ मिनीटं विश्रांती घेऊन चहा टाकला.

मला भेटलेले रुग्ण - २१

लेखक डॉ श्रीहास यांनी बुधवार, 29/01/2020 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

एक उनाड भटकंती भाग दोन

लेखक श्वेता२४ यांनी बुधवार, 29/01/2020 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक उनाड भटकंती सुरुवात

      त्यादिवशी सकाळी लवकरच उठले. मुलाला आवरुन डे केअर मध्ये पाठवलं. ऑफीसला येणार नसल्याचं कळवलं. याआधी ससुला 1 वर्षाचा असताना आमच्या 20 जणांच्या एकत्र कुटुंबासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली होती. पण वेळेअभावी कान्हेरी गुंफा बघायला जमलं नव्हतं. त्यामुळे आज आम्ही कान्हेरी गुंफा बघायला जायचं ठरवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेवणाची फारशी सोय नसल्याचा अनुभव असल्याने दुपारी जेवायला सोबत पराठे-दही-लोणचं-पाणी असं सगळं बॅकपॅकमध्ये भरुन घेतलं.