Skip to main content

मेळघाट २: नरनाळा किल्ला

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 06/04/2020 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी आता दुपारी ३ च्या सुमारास जायचे होते नरनाळा किल्ला बघायला त्याविषयी पुढील भागात. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- शहानूरच्या वनखात्याच्या रिसॉर्टवर दुपारी जेवण केले. इथले जेवण अगदीच साधे, शिवाय चवदारपण नाही. अर्थात जंगलात फिरायला यायचे म्हटले तर खायचे प्यायचे चोचले जरा बाजूलाच ठेवावे लागतात.

मै एक चिराग बन जाऊं

लेखक गणेशा यांनी सोमवार, 06/04/2020 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमता समस्त मिपाकरांची माफी, या अनेक महिन्यांमध्ये मला मिपावर येता आले नाही..लिहिण्याच सोडा काही वाचता ही आले नाही. मागे एकदा सांगितल्या प्रमाणे काम आणि नविन टेक्नॉलॉजी मुळे वेळ मिळणे खुप अवघड आहे, India deserves better चे पण पुढचे भाग लिहायचे राहिलेच आहेत, विषय आहेत पण लिहिन वेळ मिळेल तसे.. तुर्तास एक साधेसे...

कडूनिंब गुलकंद पाककृती

लेखक आदिवासि यांनी सोमवार, 06/04/2020 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
कडूनिंब गुलकंद पाककृती साहित्य - ताजा कडुनिंबाचा मोहोर ताज्या देशी गुलाबाच्या पाकळ्या खडीसाखर (सर्व साहित्य समप्रमाणात घ्या.) ताजा कडुनिंबाचा मोहोर

डॉल्फिन्स-बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 06/04/2020 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रक यक्षाच्या कथा -------------------------------- डॉल्फिन्स --------------------------------------------------------------------------------------------- (घरात अडकून पडलेल्या मुलांसाठी ) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ सोनाली कारमधून मागे पळणारी हिरवीगार दाट झाडं पहात होती. तिला कधी एकदा पोचतोय, असं झालं होतं. बाबांना जोडून सुट्टी आली होती. म्हणून त्यांनी कोकणात जायचं ठरवलं होतं. दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर- डॉल्फिन्स पहायला ! त्यांना पोचायला रात्र झाली .

लॉकडाऊन : तेरावा दिवस

लेखक गुल्लू दादा यांनी सोमवार, 06/04/2020 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझ्या तमाम पिझ्झा, बर्गर, वडापाव शिवाय जिवंत असणाऱ्या मिपाकरांनो. 'लॉक डाऊनमुळे बसलोत रिकामे घरी मिळत नाहीये साधी चाखायला पाणीपुरी घ्यावी का थोडी रिस्क आणायला श्रीखंड भीती वाटते उगाच सुजवतील भुखंड.' माझ्या अश्या गुणी मित्रांना दाबेली शिवाय रहावं लागतंय त्या मूर्ख विषाणूपायी. त्याचं नाव पण घेणार नाही मी मूर्ख कुठला. इतका त्रास देतात का राव? तो चीनच्या बाहेर यायचा नाही म्हणून आमचे मित्र गाफील राहिले. सांगून तर यायचं. आम्ही पहिलेच नसतं का हातं धुवायला चालू केलं मग. चिटर कुठला. समोर दिसायला पाहिजे तो फक्त........ चौपाटीची आठवण येतंच असेल म्हणा पण काय करणार?

काळ आला होता पण वेळ नाही...

लेखक महामाया यांनी सोमवार, 06/04/2020 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
रवींद्र दत्तात्रय तेलंग रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्‌टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली... ती सीमेंट फॅक्ट्री होती...

माणुसकीची कसोटी!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 05/04/2020 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीची कसोटी ! रिकी मनॅलो नावाचा एक धर्मगुरू सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. वातावरण स्वच्छ होते. हवेत चांगलाच गारठा होता. अशा वातावरणात सकाळचा फेरफटका आणखीनच सुखद होतो. रिकी स्वमग्नपणे रस्ता कापत होता... आणि अचानक मागून एक ट्रक रोरावत आला... त्याच्या अगदी शेजारी येताच ट्रकचालकाने ब्रेक दाबला. ट्रकचा वेग संथ झाला... आता रिकीच्या पावलाच्या वेगाने ट्रक त्याच्या बाजूने पुढे सरकत होता. क्षणभर त्याच्या मनाचा थरकाप झाला. त्या गारठ्यातही त्याला घाम फुटला, आणि त्याने वेग वाढविला. पण ट्रकला मागे टाकून पळणे शक्यच नव्हते. ट्रकनेही वेग वाढविला.

शशक- माकडांपासून सुटका!!

लेखक Cuty यांनी रविवार, 05/04/2020 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी काॅलेजला गेले त्यावर्षीची गोष्ट. काय झाले काय माहीत पण अचानकच गावात माकडांची संख्या खूप वाढली. जिकडेतिकडे माकडेच दिसू लागली. गावातल्या चौकात, वडाच्या पारावर, ईमारतींच्या गच्चीवर, चक्क देवळात आणि रस्त्यांवरही माकडे मुक्तपणे संचारू लागली. गावातील लोक आणि दुकानदारही त्यांच्या माकडचाळ्यांनी त्रस्त झाले. संध्याकाळी अंगणात माझी लहान भावंडे खेळत, अन या माकडांच्या टोळ्या घराभोवती हुंदडत. कधीकधी माकडे त्यांना वाकुल्या दाखवत, डोक्यावर टपली मारत, गालगुच्चा घेत. माझ्या मैत्रिणींच्या घरीदेखील हीच परिस्थिती. एकदा काॅलेजला जात असताना गर्दीत माझी ओढणी कुणीतरी मागून खस्सकन ओढली.

सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे.

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 05/04/2020 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
सोवळे ..तेव्हाचे आणि आजचे करोना सोवळे. करोना विषाणूच्या दहशतीने आम्ही शांतपणे घरी बसलो आहे. आमची सदनिका सहाव्या मजल्यावर. संध्याकाळी थोडावेळ सोसायटीच्या आवारात थोड्या फेऱ्या मारणे आणि औषधे किवा भाजीपाला आणण्यासाठी जवळच्या दुकानात जाणे एवढेच काय तो बाहेरचा संपर्क. सगळे सुरळीत चालले आहे असे वाटते आहे तेवढ्यात आमच्या water purifier ने लाल दिवा दाखवला. त्याचा फिल्टर राम म्हणण्याच्या बेतात आहे अशी त्याने आम्हाला समज दिली. आम्ही रीतसर तक्रार नोंदवली पण आता सर्व बंद आहे १४ एप्रिल नन्तर पाहू असा निरोप आला.

(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती

लेखक मायमराठी यांनी रविवार, 05/04/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
(ऐकाव्या + पहाव्या) च अशा मुलाखती. सध्या विरंगुळा एके विरंगुळा अणि विरंगुळा दुणे चौपट विरंगुळा हे पाढे जोरात सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, शरीरधर्म व देवपूजा इ. कार्यक्रम संपन्न झाल्यावर निवांत बसून जीव रमवायच्या नानाविध प्रयत्नांत थोडी भर घालेन म्हणतो. २००६ च्या ' वो लम्हे ' मधील ' क्या मुझे प्यार है..' किंवा 'दिल तो बच्चा है जी' मधील ' अभी कुछ दिनों से...' ऐकलंय का? तू नळीवर slow interview शोधून बघा. मुलाखत आवडणाऱ्यांना मेजवानी आहे. आपणा पैंकी अनेकांनी बघितलंही असेल. तरीही इतरांकरता निलेश मिश्राबद्दल सांगायचा मोह आवरत नाही.