Skip to main content

श्री सो.डी.माहात्म्य

लेखक अभिदेश यांनी शुक्रवार, 08/05/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
श्री सो.डी.माहात्म्य अध्याय पहिला कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसलेले आहेत. मुलं सुद्धा त्यांच्या त्यांच्या उद्योगात . समोर नंदी नेहेमीप्रमाणे आळसावलेलाय . आज अचानक पार्वतीला प्रश्न पडलाय, म्हणाली " हे नाथ, हे मी काय बघतीये. गेले काही दिवस अचानक पृथ्वी वरचे मळभ हटलंय . सगळं कसं स्वच्छ , सुंदर , निर्मळ. हे अचानक असं कसं काय घडलं नाथ ? " शंकरांच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटलं.

अंडा मसाला आणि गार्लिक नान

लेखक प्रशांत यांनी शुक्रवार, 08/05/2020 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः - कांदा (२) - खोबरं (अर्धी वाटी) - काजू (१५/२०) - गोडंबी (१५ /२०) - अदरक ( दोन मोठे तुकडे) - लसूण ( ७/८) पाकळ्या - कोथिंबीर - तिखट १ चमचा - मीठ १ चमचा - हळद १ चमचा - गरम मसाला १ चमचा

मन्याचे लॉकडाऊन

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 08/05/2020 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरोना व्हायरस जगभर पसरू लागल्याच्या बातम्या मन्याने पेपरमध्ये वाचल्या होत्या. ऑफिसमध्येही दबक्या आवाजात या विषयावर चर्चा सुरु झाली होती. मन्या तिकडे दुर्लक्ष करायचा. कारण ऑफिसमधल्या लोकांना चर्चेसाठी कायमच विषय हवा असतो. आणि एकंदरीत चर्चा,बातम्या वगैरे बघता, कोरोना हा श्रीमंतांचा रोग आहे अशी मन्याची समजूत झाली होती. साधारण परदेशवारी वगैरे केलेल्या लोकांना हा रोग होतोय अशी चर्चा होती. आता मन्याने उभ्या आयुष्यात विमानतळसुद्धा एकदा आणि तेही बाहेरून बघितलं होतं. त्यामुळे कोरोना काही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असे म्हणून मन्या बऱ्यापैकी बिनधास्त होतं.

वणवा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 08/05/2020 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
असा पेटतो वणवा उरी घर्षती झाडे, आणि भणानून उठती दु:खाचे धूसर वाडे. रात्र वेशीला अडली अंधारच इथे सजलेला, अग्नीच्या तप्त तमांतून मोगरा कसा भिजलेला? कुणी हाक देऊनी स्वर्गी वणवा असा रोखावा, वनमेघ दाटूनी विवर्त वळीवाचा पाऊस यावा. -कौस्तुभ
काव्यरस

सुटकेस ५

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 08/05/2020 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस ४ ----------------------- स्टेशनला गेलो आणि गाडी पार्क केली. मग तोबा गर्दीत सलीमची वाट बघत बसलो. तिकीट काऊंटरच्या आसपास भटकलो. साला नक्की कुठे असेल या विचारात असतानाच तो पुढे येऊन टपकला. "चलो.." म्हणून मला सोबत येण्याची खूण केली. मी त्याच्या मागे मागे एका उड्डाणपूलाखाली अंधाऱ्या जागेत गेलो. तेथे एक भिकारी भीक मागत बसला होता. त्याच्याकडून कसलीशी पिशवी त्याने उचलली. आणि " ये ले" म्हणून माझ्याकडे दिली. "क्या है इसमे..?" मी पिशवी चापचत विचारले. आतमध्ये तर जुने फाटके कपडे कोंबून बसवले होते. "कोकेन.." तो शांतपणे म्हणाला.

आत्म दीपो भव

लेखक Kaustubh bhamare यांनी शुक्रवार, 08/05/2020 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्ध,,,,, काय दिले तू मानवजातीला?,,,, शांती,,, ती तर केव्हाच कैद झाली आहे रक्तपिपासू,साम्राज्यवादी,शोषित भांडवलशाहीच्या महत्वकांक्षेत,,,, संयम,,, नजर टाकून पहा कुचकरून टाकलेल्या कळ्यांकडे अहंकारी पुरुषी वासनेने संयमाच्या कधीच चिंधड्या उडविल्या,,,, हास्य,,, पहा बर तुला सापडते का? भुकेने तडफडणाऱ्या निरागस बालकांच्या चेहेऱ्याआड,,, सत्य,,, असत्यतेचा नंगानाच चालणाऱ्या स्वार्थी बाजारात सत्य,,,,सत्य केव्हाच कवडीमोल ठरले,,, ज्ञान,,, मदमस्त सत्ता आणि मोह,लोभित मक्तेदार उपभोगत आहे ज्ञानाला बनवून आपली दासी,,, अहिंसा,,, खोट्या अहंमसाठी एकमेकांच्या नरडीचे घोट घेणे हेच वर्तमानात हिंसेचे तत्वज्ञान होऊ

shinchan :एक उत्तम स्ट्रेस बस्टर

लेखक Prajakta२१ यांनी शुक्रवार, 08/05/2020 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या लॉकडाऊनमुळे टीव्ही बघण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे घरून काम करून आणि बाकीची कामे, फोनाफोनी करून झाल्यावर तेवढाच विरंगुळा उरतो टीव्ही सोडून करण्यासारखे खूप आहे हे कळते तरी वळत नाही असो पण सारख्या न्यूज चॅनेलवरच्या करोनाच्या घाबरवणाऱ्या बातम्या,सासू सुनांच्या कौटुंबिक भांडणाच्या अमरत्व लाभलेल्या सिरिअल्स ,त्यातच पौराणिक देवादिकांच्या अमरचित्रकथा ,तेच ते चित्रपट (उदा. सोनी -सूर्यवंशम ,झी-हम आपके है कौन ,हम साथ साथ हे आणि राजश्री production चे सिनेमे ,कलर्स -कारण जोहर चे सिनेमे ) ते संपले कि दक्षिण भारतीय डब केलेले अतर्क्य आणि अचाट सिनेमे ह्यातून बघायला काहीच उरत नाही.

अस्त

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 07/05/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिसांची चहू चिंतने भ्रमितपणाची बहू लक्षणे विषासम त्या प्रवासातले क्षणिक गोडवे अस्त पावले अनाठाई त्या रूचक चिंता स्वप् नसुखांच्या रजई विणता सूर निराळे गवसण्यापरी तारेवरचा नवा डोंबारी नको म्हणाया धजते ना मन धडगत नाही रीते रीते पण बेधुंदपणाचि सूटली आवड दिनपणाचि जूडली कावड क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा नको जपाया स्वप्नांच्या लाटा अधांतरी क्षितिजाच्या मागे विझून गेले लख्ख पोरगे
काव्यरस

श्वेत साडी (एक कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 07/05/2020 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या सुळक्याच्या त्या कड्यावर तो उभा होता. गावाशेजारी तो विस्तीर्ण कडा पसरलेला होता. कड्याची अवघड आणि घनदाट वाट तुडवत तो इथपर्यंत आला होता. आपल्याला इकडे येताना कोणी पाहू नये याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. आपल्या मरणानंतर आपला मृतदेहही कोणाला सापडू नये अशी त्याची मनोमन इच्छा होती. तो द्विधा अवस्थेत इथपर्यंत आला. कड्याच्या टोकावर पोहोचेपर्यंत त्याचा आत्महत्येचा निश्चय पक्का झाला होता. तो आत्महत्या का करतो? कशामुळे करतो? एवढ्या टोकाचा निर्णय त्याने का घेतला? याची सगळी उत्तरे त्याच्या मनात तयार होती.

सुटकेस ४

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 07/05/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस ३ ------------------------ ह्रदयाचे ठोके धडाधड पडत होते. डोक्यात घण वाजत होते. जीवन आणि मृत्यू मध्ये असल्यासारखे हे क्षण अगदीच पछाडून सोडत होते. गाडीला किक मारून मी शंकराचे एक प्रशस्त मंदिर आहे तिकडे निघालो. संकटकाळी आता तोच वाचवणार! धूप, उदबत्त्या, फुले यांनी मंदिर अगदी दरवळून गेले होते. भाविक भक्तीत तल्लीन होऊन शंकराचे दर्शन घेत होते. आणि मी एका दगडी खांबाला टेकून उदासवाणा बसलो होतो. एका उजळ चेहऱ्याच्या साधूने मला खायला प्रसाद दिला.