हाक फोडी चांगुणा..
आज सकाळी उठल्या उठल्याच रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी कळली आणि सुन्न व्हायला झालं. कालच म्हणजे "सतरा मे"ला रात्री साडेअकराच्या सुमारास ते गेले. ज्येष्ठ साहित्यिक,नाटककार,रंगकर्मी,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची बहुरंगी ओळख होती. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. इतके दिवस बातम्यांत ऐकू येणारा कोरोना आता परिचिताला झाला होता.
मी तरुण वयात होते. एका दिवाळी अंकात त्यांची "पावसातला पाहुणा" ही कथा छापून आली होती. विलक्षण सुंदर गूढकथा होती ती! मला-आमच्या घरातल्या सर्वांनाच-आवडली होती.
मिसळपाव
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले.
रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.