Skip to main content

<मीच एकटा सर्वज्ञ कसा ?>

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 16/06/2020 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? या एका प्रश्नासरशी अहंमन्यतेच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन विनम्र होतं; सुरुवातीला थोड चुकल्याचुकल्यासारखं वाटते, पण अहंकार हाच अहंमन्यतेचा आधार आहे, एकदा निराहंकारी झालो की सगळा माज संपला ! कुठला वाद-विवाद नाही; कसलं भांडण नाही, कोणलाही काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेशष नाही. कुठल्याही विरुध्दमताला खोडुन काढण्याचा अट्टहास नाही, कोणताही गर्व नाही, की निर्बुद्ध मीपणाचे प्रदर्शन नाही. कोणतीही टोकाचा आग्रह नाही, "स्वतःचे ते सोवळं- अन दुसर्‍याचे ते ओवळं" असलं अज्ञान नाही, कुठे डोकं आपटायला नको, की शेवटी प्रत्येक धाग्यावर होणारी स्वतःची फजीती नाही. कुठे अक

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १२ - दैनंदिन व्यावहारिक जीवन

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 16/06/2020 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात अध्यात्मिक साधकांच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाविषयीचे भगवान रमण महर्षींचे मार्गदर्शन आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: हिंदू परंपरेत अध्यात्मिक साधकांसाठी आश्रम व्यवस्थेची महती सांगितली गेलेली आहे.

ती कळ्या देऊन गेली..

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 16/06/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ती कळ्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली... कवडसे तिरपे उन्हाचे सांडलेले गणित वेळेचे प्रयत्ने मांडलेले छेद त्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली.. शब्द होते, सूर होते भोवताली गीत जुळले अन् अचानक सांज झाली गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली.. क्षण जरी गेले उडोनी कापुराचे दरवळे पण दार अजुनी गोपुराचे कोपरा उजळून गेली, चांदणे घेऊन गेली..

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 16/06/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही.

शरीर..

लेखक पाटिल यांनी मंगळवार, 16/06/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
ह्याचं शरीर ह्याला पुरेपूर ओळखून आहे. फार जुनी सोबत आहे..! ह्याचं शरीर चालतं, बसतं, लोळतं, लाडावतं, कधी बासरीसारखं झंकारतं.. शरीर ह्याच्या इच्छा विनातक्रार झेलत, ह्याच्यापाठोपाठ पळतं...तेव्हा हा कृतज्ञ नसतो शरीराबद्दल.. पण तेच आजारलं की मलूल होऊन पडून राहतं, तेव्हा मात्र ह्याला दगाफटका झाल्यासारखं वाटतं. ह्याचं शरीर थरथरतं. पिकल्या पानांबरोबर हल्लकफूल गिरक्या घेतं. पाचोळा तुडवतानाचा आवाज ऐकत ऊर्जावान होतं. कधी वेल्हाळ गाण्याबरोबर आपोआप डुलायला लागतं.. शरीर घारींसोबत आकाश तोलतं. कधी सुनसान हायवेवर, सुसाट बाईकवर, वारा कापत भिंगरी होतं. पावसात भिजून लगदा होतं. रखरखत्या ऊन्हात पाणी धरून ठेवतं..

तू गेल्यावर

लेखक मनोज यांनी मंगळवार, 16/06/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर पाणी नाही रखरख आपले शिवार झाले मेघ गरजले नाही बरसले तू गेल्यावर तुळशी वाचून उदास नुसते अंगण दिसते कुठे रांगोळी नाही सजले तू गेल्यावर ओळख माझी तुझ्या मुळेच ही जगास झाली माझे असणे मागे हरवले तू गेल्यावर भात शिजून ना दरवळ आला संध्याकाळी नाही चुलीला त्या पेटवले तू गेल्यावर एकांती मी स्तब्धच बसतो नदी काठावर नाही कुणी मग मला शोधले तू गेल्यावर घरपण घराचे निघून गेले कळा लागली माझ्या सवे छत रडू लागले तू गेल्यावर नाही उमजली किंमत इतकी तू होती तर उणे तुझे ते आई भासले तू गेल्यावर

दोसतार - ५०

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 16/06/2020 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
छाती भरून आली . आपण खरेच शिवाजी महाराजांचे कोणीतरी सैनीक आहोत असे वाटत होते. त्याच धुंदीत घरी आलो. रात्री मामा ,आईला सांगत होता. विन्याला या दिवाळीत किल्ला करता येणार नाही म्हणाला म्हणून मुद्दाम हा किल्ला दाखवला. गण्या एल्प्या टंप्या मी आमच्या मनातली दिवाळी कधीच संपणार नव्हती.
दिवाळीची सुट्टी संपली . शाळा सुरू झाली. सुट्टी संपल्याच्या म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शाळेत पटकन जावे आणि अजिब्बात जाऊ नये असे आलटून पालटून दोन्ही वाटत होते. वस्तु ज्या स्थितीत आहे त्याला त्या स्थितीत रहावेसे वाटते. हा न्यूटनचा नियम इथेही लागू होतो.

मैत्र: मेधा पूरकर

लेखक पारुबाई यांनी मंगळवार, 16/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस माझ्या बहिणीने मला पुण्यात चालणाऱ्या ‘मैत्र’ नावाच्या ग्रुपबद्दल सांगितले. हा ग्रूप बायकांकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींची लेक्चर्स आयोजित करतो. माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. किती नामी कल्पना आहे! माझा चेहरा पाहून माझी बहिणीने त्या ग्रुपबद्दल आणि तो ग्रुप चालवणाऱ्या तिच्या मैत्रिणीबद्दल, मेधा पूरकरबद्दल, सांगितले. माझी उत्सुकता वाढतच गेली. ही कल्पना तिला सुचली कशी, तिला हा असा ग्रुप का सुरु करावासा वाटला असेल हे जाणून घेण्याकरता मी मेधाला भेटायचे ठरवले.

अॅन अफेअर वुईथ यू ..!

लेखक पाटिल यांनी सोमवार, 15/06/2020 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद सूत्र प्रथम अध्याय: व्हर्जन २.० मला तू आवडतेस. बssरं... हसताना हे असे डोळे बारीक करतेस, ते आवडतं. हम्मss.. हे असले, तांदूळ निवडण्यासाठीच खास बनवलेले, बकवास फ्रेम्सचे चष्मे घालून वाचत बसतेस, ते आवडतं. ऐकतेय.. चालू दे तुझं.. 'मग ?

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 15/06/2020 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात मंत्र, जप तसेच नामस्मरणाविषयीचे भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: दीक्षा देत असताना सद्गुरूंनी शिष्याला प्रदान केलेल्या एखादा शब्दाला किंवा श्लोकालाच मंत्राचे स्वरूप प्राप्त होते. सद्गुरूंना घडलेल्या साक्षात्कारातून किंवा त्यांनी केलेल्या ध्यानधारणेतून त्यांच्याजवळ अध्यात्मिक शक्तीचा जो संचय झालेला असतो, त्यापैकी काही भाग मंत्रस्वरूपात शिष्याकडे संक्रमित केला जातो.