मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती कळ्या देऊन गेली..

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ती कळ्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली... कवडसे तिरपे उन्हाचे सांडलेले गणित वेळेचे प्रयत्ने मांडलेले छेद त्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली.. शब्द होते, सूर होते भोवताली गीत जुळले अन् अचानक सांज झाली गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली.. क्षण जरी गेले उडोनी कापुराचे दरवळे पण दार अजुनी गोपुराचे कोपरा उजळून गेली, चांदणे घेऊन गेली..

वाचने 6827 वाचनखूण प्रतिक्रिया 21

In reply to by मनोज

मन्या ऽ Sun, 06/21/2020 - 11:18
मला कविता नीट म्हणता (ऐकवता) येत नाही. पण आज पहिल्यांदाच कविता मोठ्या आवाजात म्हणता (ऐकवता) आली. कविता अप्रतिमच आहे.. हे वे सां न :)

चांदणे संदीप Tue, 06/16/2020 - 15:31
कविता वरूनच गेली वर, मला घेऊन गेली! ;) (नंतर निवांत वाचतो) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अरे? तुम्ही इथेच आहात काय? मला वाटले ती चांदणे घेउन गेली रच्याकने :- कविता आवडली.. ती गेली तरी जाताना बरेच काही देउन गेली आहे. पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

गणेशा Wed, 06/17/2020 - 09:03
गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली..
बरोबर असंच करायला पाहिजे होते, :-)) :-)) -- मुळ कविता आवडली.. पहिल्या कडव्यात 'ती' म्हणजे रात्र वाटली.. सकाळ झाली आणि चांदण्या भरल्या रात्री ला ती उचलून निघून गेली.. पण दुसऱ्या कडव्यात पुन्हा सांज झाली त्यामुळे ती एक व्यक्ती वाटली तिसऱ्या कडव्यात तीच्या आठवणी.. त्या कळ्यांची आताशा फुले झाली..

In reply to by गणेशा

धन्यवाद! ती येते आणिक जाते... या अजरामर कवितेचा इतका प्रभाव आपल्या सर्वांवर (त्यात मीसुध्दा आले) आहे ना, त्यामुळे ती म्हणजे ती हे पटकन लक्षात नाही येत. :)

In reply to by प्राची अश्विनी

सत्यजित... Sat, 06/20/2020 - 19:21
प्रभूंनी हे गीत लेखनाच्या 'प्रतिभे'स उद्देशून लिहिल्याचे बर्‍याच जणांना माहित नसावे! आपण उल्लेख केलेला पाहून,हे वाचलेले आठवले.

पहाटवारा Wed, 06/17/2020 - 22:33
मस्त जमलिये .. तुमच्या कवीता नुसत्या वाचनीय नसतात तर त्यात गेयता असते .. उत्तम गीतकार बनू शकाल ! -पहाटवारा