गुलाबी कागद निळी शाई....5 चंद्रवेळ
गुलाबी कागद निळी शाई..4 अलवार
Hi
दोन दिवस झाले अजून तुझं उत्तर नाही. काय झालं? तू काल ऑफिसला पण नाही आलास? Is everything ok??? सारखं वाटतंय फोन करावा किंवा निदान मेसेज तरी. तुझ्याकडे माझा नंबर जरी नसला तरी माझ्याकडे तुझा आहे. (कसा मिळवला विचारू नकोस.:))
पण असंही वाटतंय मला टाळत तर नाहीस ना? काही चुकीचं लिहिलं होतं का मी पत्रात? आठवत नाहीये. दुखावलं का मी तुला? If so then sorry. मेल किंवा मेसेज असता तर मी काय लिहिलं ते वाचता तरी आलं असतं.
वारी नाही ...
वारी नाही बारी नाही
दिसणार हरी नाही
विठ्ठला रे तुझ्या विना
दुसरा कैवारी नाही
साल भर खपायचे
वावरात झिजायचे
एका दर्शनाने देवा
दु:ख सारे जिरायचे
पावसाच्या सरी माथी
पाया खाली घाट वाट
लाख लाख तूच सवे
मैल गेले पटापट
आला गाव गेला गाव
खाणे पिणे तमा नाही
मुखी नाव चित्ती रूप
बाकी काही जमा नाही
पाहताच शांत झाली
काळजाची घालमेल
दिसे रूप असे डोळा
आनंदच खोल खोल
काय पाप झाले देवा
नाही आता परवणी
घर झाले बंदीशाळा
डोळ्या मध्ये जमा पाणी
घोर किती जीवा माझ्या
नाही येणे माहेराला
विनवणी हीच माये
तूच यावे भेटायाला
स्वच्छ एकटेच तळे : आस्वाद
- डॉ. सुधीर रा. देवरे
स्वच्छ एकटेच तळे
विसावले चांदण्यात.
- शंकर रामाणी
शंकर रामाणी यांची ही फक्त दोन ओळींची कविता. या दोन ओळीतील एकूण पाच शब्द म्हणजे ही कविता.
स्वच्छ - शुचिर्भूत. कलंक नसलेले. डाग नसलेले. नितळ.
एकटेच - एकांत. समाधी लागलेले. चिंतन.
तळे - पाण्याचा साठा. पाणी म्हणजे जीवन. जीवनाचा साठा. तृप्त. विसावले - शांतता. शांती. तृप्तता. आयुष्याच्या सुरूवातीला खूप कष्ट
करूनच विसावता येते. खस्ता खावूनच विसावता येते. तसे
नसेल तर विसावण्याला आळशी म्हणतात. सुस्त म्हणतात.
चांदण्यात - शीतलता. सौहार्दता.
कवितेत तळे आहे. तलाव नाही.
कोविड-कोविड गोविंद गोविंद
आली एकादशी
ग्रासे जरी कोविड
मुखी तरी गोविंद
वारकरी
हाती ग्लोव्हज्
मुखी मास्क
एकची टास्क
नाचूरंगी
सॅनीटाझर ची उधळण
वैष्णवां ना ताप
डोळ्यांपुढे बाप
पांडूरंग
कसले हे वर्ष
यंदा नाही वारी
तूच देवा तारी
भक्तजना
एकमेका आता
नाही लोटांगणे
उभी घटींगणे
पोलीस ते
युगे चार मास
राबताती अथक
सफाई मदतनीस
डाॅक्टर,नर्स,पोलीस
रात्रंदिस
तुझ्यात पांडूरंग
म्हणोनी वारकरी
पोलीस पाय धरी
होत धन्य
काव्यरस
(नदीम-) श्रवणभक्ती
आम्ही नदीम-श्रवणच्या संगीताचा बारकाईनं अभ्यास केला आहे.
... अर्थात नदीम-श्रवणच्या संगीताचा 'फार काही न' अभ्यास केला तर अधिक चांगलं होईल असं आमच्या ज्येष्ठ बंधूंचं मत आहे!
साधी गोष्ट आहे. आमच्या आई-वडिलांचा काळ शंकर-जयकिशनचा; तर बंधूंचा काळ आर. डी. बर्मनचा; अन् आमच्यावर वेळ आली नदीम-श्रवण ऐकण्याची. ('काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' असं यावर आमचे बंधू म्हणतील असा आमचा तर्क आहे. आमचं त्यावर 'काळ काही सांगून येत नाही' असं उत्तर तयार आहे.)
पण प्रत्येक काळ वेगळा असतो. आमचे आई-वडील शंकर-जयकिशनच्या लाखेच्या तबकड्या ग्रामोफोनवर लावायचे (…त्यांना त्या लाखमोलाच्या वाटायच्या!). ज्ये.
खेळ मांडीयेला, कोरोना भिववी दारी - भाग १: क्रिकेट
(जसे कोरोनामुळे जगभरात सर्वसामान्यांचे जीवन काही ठिकाणी थोडेसे विस्कळीत तर कांही ठिकाणी जवळ जवळ उध्वस्त झाले आहे, तसेच थोडेसे वेगवेगळ्या खेळांचेही झाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जागतिक खेळांत मोठ्या प्रमाणांत बदल अपेक्षित आहेत. त्याबद्दल थोडेसे.......
मिसळपाव