Skip to main content

ढोकळा पीठ

लेखक Bhakti यांनी सोमवार, 17/08/2020 12:13 या दिवशी प्रकाशित केले.

मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/08/2020 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ पहिल्या १०८ दिवसात जे १०,००० गेले त्यातले ५२% मुंबईतले होते, नंतरच्या १०,००० मुंबईचा टक्का घसरून १९% म्हणजे गेल्या ३७ दिवसातील १०,००० मृत्यू पैकी ८१ % उर्वरीत महाराष्ट्रातून आलेत.

कोरोनास करुणा येईल तुझी !

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 16/08/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो मंडळी, या, उरा उरी भेटूया. नको म्हणताय? नाहीतरी आजकाल तुम्ही एकमेकांना उरा उरी कुठे भेटता ! समस्त मंडळी छान ढेरी बाळगून असतात त्यामुळे उरा उरी च्या ऐवजी ढेरा ढेरी भेटणेच होते, नाही का? कमीत कमी हस्तांदोलन तरी करूयात. तेही नको? लांबूनच नमस्कार करताय? म्हणजे तुमचे नाव सुशील दुष्यंन्त सिंग आहे वाटते?

सायकलायण : २. पुणे ते रायलिंग पठार (लिंगाणा)

लेखक गणेशा यांनी रविवार, 16/08/2020 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलायण : २. पुणे ते रायलिंग पठार (लिंगाणा) 2019. _______________________________ ऑक्टोबर आला की सोनकी च्या मोहक फुलांनी सारं डोंगर रान भरुन जातं. हिरव्यागार वनराईत, कधी अवचीत पावसाची रिमझीम येते तर लगेच त्या मागुन शुभ्र ढगांनी साऱ्या वाटा अडवल्या जातात. कुठे हळुवार अवखळ छोटे छोटे झरे आपल्या अस्तित्वाची उगाच जाणीव करुन देत असतात. निसर्गाचे सह्याद्रीवर अतोनात प्रेम..

करोनाच्या संधीचं ‘सोनं’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 16/08/2020 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एकीकडे आक्‍खं जग करोनाशी लढत बरबाद होत आहे. असंख्य लोक आपल्या जिवाला मुकत आहेत. आपल्या नातलगांना, मित्रांना गमावत आहेत. कधी नव्हे इतक्या मानवी अस्तित्वाच्या आणीबाणीच्या वेळी चीन सारख्या हुकुमशाही देशाला भारतात अतिक्रमण करण्याची दुर्बुद्‍धी होते.(आपल्यामुळे जगभर करोना फैलावला या मानसिकतेने चीनने खरं तर जगापुढे खजील असायला हवं होतं.) त्यासाठी करोना काळात भारताला रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा करार करावा लागतो. हाच मुहुर्त साधून फ्रांसकडून राफेल येतात. नेपाळ आणि पाकिस्तान त्यांच्या नव्या नकाशात भारताचा भाग दाखवतात.

॥ कृष्णतृष्णा ॥

लेखक मी-दिपाली यांनी शनिवार, 15/08/2020 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रलोकीचे दिव्य फूल ते द्याल मजला का श्रीहरी। हट्ट पुरवण्या भामेचा मग लावला पारिजात दारी ॥ क्षणिक ठरले सुख भामेचे हरिस प्रिय मी रुक्मिणीहुनी। गेले ते अवसान गळोनी सडा पाहता तिच्या अंगणी ॥ प्रासादी ना रमली मीरा प्रभूभजनी दंग जाहली। मनी वरोनी गिरीधारिसी विषप्यालाही सुखे प्याली॥ लावण्यासवे पाहुनी कृष्णा कुब्जा लपवी शापित याैवन। हरखुनी गेली उमगे जेव्हा शाम होता तिजसाठी पण॥ रंगुनीया रंगात साऱ्या एक झाला रंग अवघा । राधा होई का निळी हे अजुनी न कळे श्रीरंगा॥ कदंबतळी रासलीलेचे विलोभनीय दृश्य दिसे। हरेक गोपिकेच्या संगे कृष्ण दिसे...कृष्ण दिसे॥

कोकणदीवा

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 14/08/2020 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
शिवतीर्थ रायगडावर गेले लि अपरिहार्यपणे भेट देण्यापैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे "टकमक टोक". गडापासून निघून भेदकपणे पुढे घुसलेल्या या टकमकाच्या थेट टोकावर जाउन उभारले की भर्राट वारा छतीत भरुन समोर गगनचुंबी सह्याद्रीची शिखरे बघायची. त्यात एक त्रिकोणी आकाराचे शिखर चटकन नजरेत भरते. टकमक टोकाची दिशा थेट या शिखराकडेच आहे.हाच आहे "कोकणदिवा".

पुलंचा एक सुरेख लेख !

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 14/08/2020 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लोकांनी वाचला असण्याची शक्यता आहे म्हणून तो खफवर टाकणार होतो; पण लेखाचा कंटेंट इतका भारी आहे की तो सरकत्या पोस्टींबरोबर सहज हरवून गेला असता. त्यामुळे इथे पेस्ट करतोयं. पुलंसारख्या हुशार, चतुरस्त्र आणि इतक्या निर्विवाद विचारसरणीच्या व्यक्तीचं कौतुक कलौघात फिटणारं नाही याची नोंद रहावी म्हणून हा लेख. _______________________________________________ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही.

असा बालगंधर्व पुन्हा न होणे

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/08/2020 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या काळात बालगंधर्व माहिती नसलेला मनुष्य सापडणे जरा कठीणच. बालगंधर्व चित्रपटामुळे त्यांचं कार्य आताच्या पिढीला कळलं त्याच बरोबर त्यांचा स्वभाव कलेप्रती असणारी निष्ठा, प्रेक्षकांसाठी उच्च तेच सादर करण्याचा स्वभाव सुद्धा माहिती झाला. त्यांचे असेच काही अपरिचित प्रसंग इथे सादर करतोय.

अपलोड-वेणा

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 14/08/2020 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
सिंग्युलॅरिटीच्या या गोठल्या वर्तमानकाळात संगणकेश्वराच्या आज्ञेबरहुकूम माझा सायबोर्गावतार आटोपता घेण्यासाठी अपलोडतोय महास्मृृतिकोषात माझ्या जाणिवा, नेणिवा, अन् होलोग्राफिक अस्तित्वखुणा. ई-जैवकचरा होऊन वितळेन मग पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात हजर होईल माझा डिजिटलावतार कधीही, कुठेही संगणकेश्वराच्या मर्जीनुसार सायबरअमरत्वाच्या या दुर्धर अटळ अपलोड-वेणा माझ्या एकेका सर्किटनसेतून ठिबकू लागल्यायत अनावर.
काव्यरस