Skip to main content

चुका

लेखक rushikapse165 यांनी गुरुवार, 20/08/2020 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो,तेरा वर्षांचा.बाल्यावस्था संपून मी नुकताच किशोरावस्थेत प्रवेश केला होता.मनात विचारांच काहूर माजलं होत.चेहर्‍यावरती दाढी-मिश्यांच्या कोवळ्या खूणा उमटल्या होत्या.मला त्याचे त्यावेळी खूप नवल वाटायचे.दिवसातून कित्येक वेळा मी आरश्यासमोर उभा राहायचो.नकळतच हात गालांवरुन फिरायचा,आणि मी स्वत:शीच हसायचो. सारं काही बदलत होत,शारीरिकच नव्हे तर मानसिक बदलही होत होते.एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणार्‍या भावना अचानकच बदलू लागल्या.सुरुवातीला अस का होतय?काहीच कळत नव्हत.एखाद्या मुलीकडे,माझ्या जुन्या मैत्रिणींकडे नकळतच खेचल्या जाऊ लागलो.त्यांच्याबद्दल मनात फक्त आता मैत्रीची भावना उरली नव्हती,ती

शालेय जीवनाची गतस्मृती बाबत कविता

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 20/08/2020 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
मला आज शाळेत परत जायचं आहे त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे.. पूर्वी वाहून न्यायचो पुस्तकाने भरलेले दप्तर ... फुटके ढोपर आणि गुडघे घेऊन.... आज त्याच वाटेवर अनुभवाची फाटकी बोचकी घेऊन थकलेली पावलं ओढत चालायचं आहे.. धूळ जमलेला फळा...आणि कट्टी करून गप्प झालेल्या त्या घंटेला.. शाळेच्या बाहेरचे प्रश्न विचारायचे आहे... माझ्या भूगोलाच्या अभ्यासक्रमात ,"पृथ्वी गोल असते" पण ," हे माणसाचं जग नक्की कसं असतं ? " हे का नाही शिकवलं??

अव्यक्त स्पंदने

लेखक तेजल दळवी यांनी बुधवार, 19/08/2020 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात.. कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही.. मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते.. कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..

मध्यमवर्ग

लेखक पंचमहाभूते आणि थोडं यांनी बुधवार, 19/08/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
मन मुंबई लक्ष्मी लॉटरी... मन खडखडीत तिजोरी... मन वैरी... मन डायरीतले मोरपीस... मन आहेराचा शर्ट पीस... मन कासावीस... मन मंदिरातला गाभारा... मन हातामधला गंडादोरा... मन भरारा... मन इमान धैर्य न्याय... मन दोन दगडावरती पाय.. मन हाय हाय...

“WHO ला काय कळतं?"

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी बुधवार, 19/08/2020 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका राजकीय मुखपत्राचे संपादक काहीतरी बोलले आणि त्यावरूनच बरेच विनोद, मिम्स असल्या गोष्टीचं सत्र सुरु झालं. पण त्यांच्या बोलण्याचं मूळ सुद्धा आपल्यात अजाणतेपणी रुजलेल्या समजुतीत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे “डॉक्टरला काय कळतं?” ह्याचं एक्स्टेन्शन “WHO ला काय कळतं? का म्हणे? डॉक्टरला काही कळत नाही तर २ दिवस अंगावर दुखणं काढून झालं की रात्री अपरात्री डाक्टर का आठवतो मग? ते राहू दे, त्याबद्दल पुन्हा केव्हातरी बोलू. पण गेल्या काही महिन्यात जेव्हा जगावर हे महासंकट आलं तेव्हा WHO मध्ये बसलेल्या त्या तज्ज्ञ लोकांवर किती दबाव असेल, जबाबदारीचं ओझं किती असेल ह्याचा विचार केलाय कुणी?

गणेशोत्सव, गणपती बसवायचा मुहूर्त ,किती दिवस बसवावा गणपती?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 19/08/2020 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.

अननसाचा शिरा

लेखक मृगतृष्णा यांनी मंगळवार, 18/08/2020 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पहिलीच पाककृती लिहीत असल्याने गोडाने सुरुवात करावी म्हणलं ..

रावण नाडीचा माझा अनुभव - सन २०१०मधील किस्सा

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 18/08/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.

रावण नाडीचा माझा अनुभव - सन २०१०मधील किस्सा

सन २०२० मधे अशा काही घटना घडून आल्या कि त्यामुळे माझ्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या लेखनाला पुन्हा संपादित करून सादर करावेसे वाटले. पुन्हा नव्या माहितीने व फोटोंनी तयार केलेला तो हा लेख...

अंतहीन

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 17/08/2020 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे सगळं सुरू झालं ते मिथिला पालकरच्या इंस्टा रील पासून काल रात्री बाहेर पाऊस बरसत असतांना, इन्स्टाग्रामवर तिने sing song saturday मध्ये 'जाओ पाखी' गाण्याच्या काही ओळी गुणगुणल्या होत्या. बाहेर पाऊस आणि तिचा गोड बासुंदी आवाजात म्हणलेल्या त्या दोनच ओळी खूप आवडून गेल्या.

ढोकळा पीठ

लेखक Bhakti यांनी सोमवार, 17/08/2020 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
ढोकळ्याचे पीठ बनवण्यासाठी साहित्य: एक किलो हरभरा डाळ, अर्धा किलो तांदूळ एकत्र दळून आणणे. 50 ग्रॅम खाता सोडा, 50 ग्रॅम लिंबू सत्व, 100 ग्रॅम पिठीसाखर मिक्सरवर बारीक करून पिठामध्ये मिक्स करणे. ढोकळा पीठ तयार.ढोकळा करताना पीठ भिजवताना त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकावी.कुकरला शिटी न लावता वाफवून घ्यावा. 1