Skip to main content

गणपतीची लोकगीतं

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 22/08/2020 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
यावे नाचत गोरीबाळा हाती घेऊनी पुष्पांच्या माळा सर्वे ठायी मी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा ट चौदा विधयेचा तूं माता पिता सर्वे ठायी हाय तुजी सत्ता | चार वेदा ध्यावे वेळोवेळा ृ यावे नाचत गोरीबाळा | साही शास्त्रे अठरा पुराण तुझ्यापासून झाले निर्माण | भक्त देव येती मंडपाला यावे नाचत गोरीबाळा | मुळारंभी सत्व धरी पाया | संगे घेत सरस्वती माया.

श्रीगणेश लेखमाला २०२० - विली वोंका कॅडबरी काँटेस्ट (Willy Wonka Cadbury Contest)

लेखक अनुराधा काळे यांनी शनिवार, 22/08/2020 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
1 अहो! मुंबई म्हणजे घड्याळाच्या काट्यांवर आणि लोकलगाड्यांच्या चाकांवर रुळांवरून सतत धावणारी! घड्याळ, किल्ल्या, पाकीट, रुमाल, टिफिन सांभाळत जीव मुठीत घेऊन आठवडाभर लोकलमध्ये कसाबसा शिरणारा, बसायला चौथी सीट मिळण्याची अपेक्षा न करणारा तो मुंबईकर! चाकरमान्या! आता तर गर्दी दसपट! असा हा मुंबईकर लोकलने शनिवारी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पाठ फिरवूनच.

वार्ता सुखाची घेऊन....

लेखक Vivekraje यांनी शनिवार, 22/08/2020 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
वार्ता सुखाची घेऊन , आता यावे घरी देवा..| ओढ भेटीची लागली, होई तगमग जिवा..|| काही कळेना जीवाला, मना धाव घेऊ कोठे..| ओढ तुम्हा दर्शनाची, धीर काळजात वाटे..|| तुमच्या येण्याची चाहूल, देवा आम्हा सुखावते..| अवघी चिंता दुःख सारी, जशी दूर घालवते..|| आहे संकट हे मोठं, नाही माणसाच्या हाती..| नाही श्रीमंतीचं मोलं, होते गरीबाची माती..|| वार्ता सुखाची घेऊन , यावे वाजत गाजत..| नको दुःखाची किनार, कुणा ओल्या पापण्यात..|| नाव तुझं मंगलमूर्ती, विघ्नहर्ता तुझी कीर्ती..| तुझ्या येण्यानं ही सारी, देवा उजळावी धरती..|| जरी झाली चूक थोडी, देवा स्वीकारून घ्यावी..| रीती परंपरा उत्सवाची, देवा पुन्हा सु
काव्यरस

श्रीगणेश लेखमाला २०२० - पाककृती - खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या)

लेखक पियुशा यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 खुसखुशीत करंज्या (साठ्याच्या) गणपती गौरींच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत साठ्याच्या करंज्यांची रेसिपी देत आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२० - || श्री गणराया ||

लेखक Giriratn Raje यांनी शनिवार, 22/08/2020 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 जय देव, जय देव श्री गणराया, हो स्वामी गणराया, आरती ओवाळू, भावार्थी ओवाळू तुज बाप्पा मोरया ||ध्रु. ||जय देव जय देव......

श्रीगणेश लेखमाला २०२०- प्रस्तावना

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 22/08/2020 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर्स.. सालाबादप्रमाणे गणरायांच्या आगमनाचा दिवस आला आहे. आज आहे मिपा परिवाराचा १४वा वर्धापनदिन! आणि हाच तो दिवस जेव्हा येते मिपाची श्री गणेश लेखमाला. दरवर्षी आपण एका संकल्पनेभोवती लेखमाला गुंफतो आणि ती वाचकांसमोर सादर करतो.

नेवरी/नेवर्‍या/करंजी

लेखक देवीका यांनी शुक्रवार, 21/08/2020 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
गणराया निघालाच आहे , तर गौरीचे आगमन आता थोड्याच दिवसात होणार आहे. आमच्या घरी, गोव्यात गौराईला नेवरी करायची पद्धत आहे. इतर वेळी सुद्धा, मोदकांबरोबर बहिण म्हणून 'नेवरी' करतातच. पण पाच सवाष्ण स्त्रियांना, नेवरी ओटीत द्यावी लागते. आता, जुनी प्रथा आहे. पदार्थ बनवण्याची आवड आणि उत्साह असल्याने तर त्या( प्रथेच्या) निमित्ताने आनंद म्हणून केली जाते व सर्वांनाच खाउ घालतो. हि सगळ्याच घराची पद्ध्त नाही. गौरी बसल्या की, पाच ते दहा गोडाचे पदार्थ असतातच. पण हा मुख्य पदार्थ. तर नमनालाच घडीभर तेल झालेय. मी, माझी आई जशी करते तसेच लिहिले आहे. रेसीपी काही नवीनच नाही. मोदकाचीच आहे पण आकार वेगळा ..

Food - Kitchen Affairs - १. चहा

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 21/08/2020 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
किचन मध्ये पुन्हा थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न आता करावा म्हणतो आहे. कधीकाळी रुम वरती थोडाफार स्वयपाक केल्याचा अनुभव होता.. पण त्या नंतर कित्येक वर्ष मात्र किचन मध्ये काहीच केले नाही.. बेसिक गरज : किचन हे स्वच्छ असावे .., फोटो देताना पण किमान निदान स्वच्छता दिसलीच पाहिजे. (अवांतर - नाहीतर मध्ये फेसबुकवरती, केतकी चितळे ने साबण कमी वापरुन त्याचा परिपुर्ण वापर कसा केला पाहिजे हे सांगायला बाथरुम मधला साबन कापण्याचा विडीओ दिला, आणि तिचे अतिशय घाणेरडे बाथरुम बघुनच किळस आली. कसे कळत नाही बरे लोकांना. असे निदान पाककृती विभागात झाले नाही पाहिजे, किचन छानच हवे.

हरतालिका

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 21/08/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती. कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !

जिंदगी फिर भी.....

लेखक ज्येष्ठागौरी यांनी शुक्रवार, 21/08/2020 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी फिर भी..... लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी.