Skip to main content

लबरे़ज

लेखक ज्येष्ठागौरी यांनी शनिवार, 12/09/2020 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
लबरे़ज... आज अचानक एक खजिना हातात लागला कोणाच्यातरी कृपेनं आणि मायेनं!निमित्त होतं आर डी बर्मन ह्यांच्यावर असलेला quintessential sunshine इतकं समर्पक नाव असलेला हा कार्यक्रम!

पाती..

लेखक चिनार यांनी शनिवार, 12/09/2020 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरी नारायण दशमी आहे. विदर्भातल्या एक-दोन जिल्ह्यात फारच कमी कुटुंबांमध्ये हा सण असतो. 90 टक्के विदर्भात हा प्रकार माहितीसुद्धा नसेल. आमच्या मूळ गावातल्या घरी आज सूर्यनारायणाची पूजा असते.कित्येक पिढयांपासून हे अखंड सुरू आहे. हळूहळू कुटुंब रुंदावलं, लेकरं गावाबाहेर पडलीत, संबंध कमी झालेत, तरी बहुतांश कुटुंबीय आपापल्या घरी नारायण दशमी करतात. हे व्रत तसं कडक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला कूळ बदललं तरी हे व्रत करावं लागतं.वडिलांच्या आत्याबाईंना वयाच्या पंच्यात्त्तरीपर्यंत नारायण दशमी करताना मी बघितलेलं आहे.

अलिबाग राईड..

लेखक अन्या बुद्धे यांनी शनिवार, 12/09/2020 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
घर ते अलिबाग मार्च 13 ला शेवटली शतकी राईड झालेली. नंतर करोनाने छळ मांडलेला. हपिस बंद असल्याने सक्तीची विश्रांती. पण तरी कुठेही जाता येत नव्हतं. पावसात एकतरी मोठी राईड करायची होती पण रहाणार कुठे आणि खायचं काय? या प्रश्नाने हरवलं होतं. कारण हॉटेल सेफ नव्हती राहिली. छोट्या 40-50 km च्या राईड्सवरच समाधान मानत होतो. सहज मोगलीला कॉल केला की तो इकडे यायचा होता त्याचं काय झालं? तर तो म्हणाला अलिबागला जायचा विचार सुरुए. तिथे काही झाडं लावायचीत. एखाद्या चित्यासारखी या ऑफरवर झडप घातली. रहायचा प्रश्न सुटला. खाणं सोबत घेतलं की तो प्रश्न मिटला. लॉकडाऊनला कंटाळलेला बंड्या तिसरा भिडू आला.

Once in a lifetime....!

लेखक डॉ श्रीहास यांनी शनिवार, 12/09/2020 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 12/09/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाची लिंक शिवप्रतापाची झुंज ( भाग १) "बेगमसाहीबा, अंदर आनेकी ईजाजत है ?" अलीने महालाच्या दाराबाहेर उभा राहून प्रश्न केला. "हां, अंदर आवो! तशरीफ रखो" महालात करडा आवाज घुमला. बुरख्याच्या आडचे तिक्ष्ण बदामी डोळे अलीवर रोखले गेले. अली बैठकीवर बसला आणि महालातील ती करारी बाई ताडकन उठली आणि फेर्‍या मारु लागली. कोण होती हि राजस्त्री ? हि होती मरहुम महमद आदिलशहाची बीबी, बडी बेगम. वास्तविक हिचे नाव बडी बेगम नव्हते.

वेढा

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 12/09/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंकिता. . . . . . .

डोक्याला शॉट [चतुर्थी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शुक्रवार, 11/09/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

सुप्रभात!

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 11/09/2020 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात सध्या २ आठवडे झाले सकाळी सकाळी उठून सायकल चालवायला जातेय. थंडीची चाहूल लागतेय पण पाऊस अजून पूर्ण गेला नाहीये असं काहीस वातावरण आहे. संध्याकाळहून आकाश भरून येत आणि धो धो पाऊस पडून जातो. पण सकाळी अगदी मस्त मोकळं आकाश असतं. पहाटे खरं तर उठायचा कंटाळा येतो पण आताशा बाहेर गेल्यावरच वातावरण बघायची, अनुभवायची सवय झालेय त्यामुळे हल्ली कमी कंटाळा येतो . ६.३० च्या दरम्यान मी बाहेर पडते तेव्हा सूर्य उगवलेला नसतो पण स्पष्ट दिसायला लागलेलं असतं. हलके हलके धुकं पडायला सुरवात झालेली असते. वातावरण एकदम प्रसन्न असतं.

चांभारगड उर्फ महेंद्रगड ( Chambhargad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 11/09/2020 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्री नदीच्या तीरावर वसलेले महाड हे एक प्राचीन बंदर होते. इ.स.पुर्व २२५ मध्ये महाडची पहिली नोंद आढळते. त्यावेळी ते महिकावती नावाने प्रसिध्द होते. ईसवी सनाच्या पहिल्या शतकात ईथे कुंभोजवंशीय बुध्दधर्मीय राजा विष्णूपुलित राज्य करत होता. महाडच्या तीन कि.मी. वर गंधारपाले लेणी व दक्षीणेस तीन कि.मी.वर कोल येथील लेणी महाडचे प्राचीनत्व सिध्द करतात. बौध्द काळापासून महाडला महा-रहाट" म्हणजे मोठी बाजारपेठ म्हणत. ( आजही आपण बाजारहाट असा शब्द वापरतो )  या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी मान्यता आहे.

शोध

लेखक Prajakta Sarwade यांनी शुक्रवार, 11/09/2020 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले, ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी पण पाऊसात माञ ओळखीचा गंध परिमळे ना सोबती कुणी माझ्या, ना मी कोणाची सोबती पुसत सारया दिशांना, कापत अंतरातले अंतर स्वतः च्या दिशेने स्वतः ला दिशा देत चालले गाफिल राहिली माझ्यातली कविता माझ्यामध्येच, अन माझेच शब्द आता मला ओळखेनासे झाले डोहातल्या चांदण्यापर्यत मौन माझे पोहचले सारे शब्द अलगद तुझ्या ओंजळीत येऊन ओसरले -प्राजक्ता ( मी इथे नवीन आहे, आणि ही पाहिलीच पोस्ट आहे , काही चुकलं तर माफ करा)