Skip to main content

दोन घडीचा डाव.....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 06/10/2020 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
*दोन घडीचा डाव...* *"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!! चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो.

गडकिल्ले / डोंगर भटकंती धागे संग्रह.

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 06/10/2020 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
गडकिल्ले/ डोंगर भटकंती धागे आता हळूहळू लॉकडाऊन संपून व्यवस्था पूर्वीसारखी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वजनिक वाहने सुरू होऊन प्रवासाचे निर्बंध उठल्यावर भटकंती करता येईल. तोपर्यंत वाचनासाठी. गडकिल्ल्यांचे धागे मी पूर्वी मायबोली आणि मिसळपाव या दोन साइटसवर शोधले होते. त्यांची वर्गवारीही केली होती जाण्याच्या मुख्य ठिकाणाप्रमाणे.

कोळंबी लोणचं

लेखक मी_देव यांनी मंगळवार, 06/10/2020 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज जवळपास ३ वर्षाने मिपा वर आलो.. खुप मोठा ब्रेक झाला. असो.. लागणारे घटक:
  • १/२ किलो कोळंबी (सोललेली आणि मधला धागा काढलेली)
  • 1 टीस्पून. हळद
  • 2 टीस्पून. तिखट
  • 1 टेस्पून. आलं लसूण पेस्ट
  • 100-150 मिली मोहरी तेल
  • 1 टेस्पून. मोहरी
  • २ टीस्पून. हिंग
  • पाऊण कप लसणीचे मध्यम आकाराचे तुकडे
  • अर्धा कप आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे
  • 3 टेस्पून.

वेळणेश्वर २०२०

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 06/10/2020 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासून घरात बसून खुपच कंटाळा आलेला होता. मुलीचेही ऑफिसचे काम घरूनच सुरु आहे. अशातच १ तारखेला माझ्या लग्न झालेल्या मोठ्या मुलीचा ठाण्याहून फोन आला. आम्हा दोघांना तीन दिवसांची सुट्टी आहे. कुठे फिरायला जायला मिळेल का. तुम्ही आणि आणखी कोणी येत असेल तर जाऊ सगळे मिळून. आमच्या शेजाऱ्यांना व मैत्रिणीला विचारले तर तेही लगेच तयार झाले. १० मोठे व एक छोटी मुलगी अशी अकरा जणांची टीम तयार झाली. मुंबईच्या जवळची ठिकाणे शोधली तर खूप हॉटेलचे अव्वाच्या सव्वा दर मिळाले. जाण्याचे मन होईना. मग थोडे लांबच्या ठिकाणांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पूर्वी एकदा वेळणेश्वरला गेलो होतो.

(...मारीला म्यां डोळा ;)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 05/10/2020 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा http://misalpav.com/node/47605 अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीव

...पाहिले म्यां डोळा

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 05/10/2020 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी. अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी. संपतील एकदाची आत्ताच की, ध्रुपदत राहतील व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात आज उद्या परवा?
काव्यरस

आभाळ

लेखक सरीवर सरी यांनी सोमवार, 05/10/2020 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळ माझे जवळी मजवर बरसेल खात्री अलगद धावे मृगजळी थेंब पाझरे रिक्त गात्री गच्च धरले उराजवळी मुक्त होते स्वप्नरात्री शोधत माती कोवळी थांगपत्ता नाही नेत्री आभाळसर गर्द निळी झेपावली नदी पात्री भेटेल सागर जळी पूर्णत्व मागे सहयात्री. -सरीवर सरी

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 02/10/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं! शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही.

पन्हाळघरदुर्ग ( Panhalghar Fort)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 02/10/2020 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडच का निवडला ह्यामागे अनेक भौगोलिक कारणं आहेत. रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, दौलतगड पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची प्रभावळ असल्याने युध्दशास्त्राच्या दृष्टीने रायगड अधिकच बळकट झाला होता. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. रायगडाभोवती उभा केलेले किल्ल्यांचे कडे नीट अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल कि मानगड ते दौलतगड या दरम्यान कोणता गड दिसत नाही.