Skip to main content

बॅंक- एक भयाण अनुभव

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 18/12/2020 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज महत्वाचे काम होते बॅंकेचे. काहीही करून ते आजच पूर्ण करायचे होते. काम तसे पाच मिनिटाचेच होते. पण पुर्वानुभव लक्षात घेता चांगला एक - दीड तास बाजूला काढून ठेवला होता. गाडी चालू केली की लक्षात आले पेट्रोल संपले आहे. बहुधा माझ्या मुलाने संपवले असावे. रोजचे दोन - दोनचे 'पॅक' संपतात म्हणजे काय ? एवढे काय फिरायचे असते काय माहिती ! एकचा नवीन पॅक टाकून मी गाडी सुरु केली. मुख्य रस्यावर पोहचलो तर स्त्यावर ही मोठी गर्दी. कसाबसा बॅंकेच्या गेटपर्यंत पोहचलो. तिथे एक वॉचमन निर्विकार चेह-याने माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. गेट उघडायला तो तयारच होईना.

पुन्हा पानिपत - प्रकाशन समारंभ

लेखक मनो यांनी शुक्रवार, 18/12/2020 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल. YouTube: https://panipat-signup.web.app/live Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE Twitter: https://twitter.com/BhandarkarI उपस्थित मान्यवर --------------- शिवचरित्रकार श्री.

शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षेसाठी शिकणे का शिकण्याचे परीक्षण

लेखक राजा वळसंगकर यांनी शुक्रवार, 18/12/2020 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
खालील परीक्षेत 5 पैकी 2 मार्क मिळाले तर संस्कृत भाषा अवगत आहे असे प्रमाणपत्र द्यावे का? योग्य पर्याय निवडून उत्तरं द्या : (कुठलेही पाच)
  1. "यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति .... " वाक्य पूर्ण करा.
  2. वसुधैव कुटुम्बकम् मधे कुटुंबकम् हे दक्षिण भारतातल्या गावाचे नाव आहे. बरोबर का चूक?
  3. "सत्यमेव जयते" चा अर्थ .... असा होतो. (सत्य + मेवा संधी करा, पत्यातली सत्ती आहे, सत्याचाच विजय होतो)
  4. गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः हा श्लोक ... भाषेत आहे.

बेंगळुरूचा कार्तिक -२

लेखक पॉइंट ब्लँक यांनी गुरुवार, 17/12/2020 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज पिलेकाम्मा देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मुनेश्वर ह्या महादेवाच्या अवताराच्या पूजा पाहुत. प्रत्येक पूजेसोबत चेहर्‍यावरचे भाव कसे बदलातात पहा.

'W' च्या पाठलागाची चित्तरकथा !!

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 17/12/2020 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा अंगाला, (मेंदूला म्हणू या हवं तर) चिकटलेली 'मास्तरकी' जाता जात नाही याचा अनुभव आज आला. आता काही वेळापूर्वी 'धमाल' बघत होतो आणि सिनेमा बघता बघता मला माझ्या क्षेत्रातला 'W' डोळ्यासमोर दिसायला लागला. *** मुलगा किंवा मुलगी दहावी मस्त पर्सेंटेज मिळवून पास झाल्यावर शुभेच्छा द्यायला येणार्‍यांपैकी कोणीतरी ही 'W' ची फ्रेम भेट म्हणून देतो. या 'W'चा अर्थ युपीएससी-एमपीएससी- आयआयटी-नीट-जेइइ -टोफेल जीआरइ -अशा क्रमाने जसा घ्याल तसा असतो. पण टार्गेट 'W' नसते. टार्गेट असते 'W' च्या खाली असलेले १० कोटी!!

ज्ञात अज्ञात पंढरपूर २ समस्त कलगीवाले थोरली तालिम

लेखक Ashutosh badave यांनी गुरुवार, 17/12/2020 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
४ मे • talim पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा. भारतभूची कुस्ती परंपरा अतिप्राचिन. भगवान राम अन् कृष्णापासून ते छत्रपती शिवराय अन् धर्मवीर संभाजी महाराज हि या कुस्तीपरंपरेचे उपासकच.

बेंगळुरूचा कार्तिक -१

लेखक पॉइंट ब्लँक यांनी बुधवार, 16/12/2020 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिक महिना दक्षिण भारतामध्ये श्रावण महिन्याइतकाच महत्वाचा मानला जातो, विषेशतः महादेवाच्या पूजेसाठी. दर सोमवारी महदेवाच्या सर्व मंदिरांमध्ये महादेवाची विशेष पूजा-अर्चा केली जाते. बेंगळूरूच्या व्हाईटफिल्डमधील काही मंदिरांमधील पूजा आणि उत्सव चित्रस्वरुपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. एका धाग्यात सगळं लिहलं तर तो खुप मोठा होईल, म्हणुन, छोट्या छोट्या भागांमध्ये लिहित आहे. सुरुवात करुया दिवाळीपासून. आपल्याकडे जसे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होते तसं इथे पिलेकाम्मा देवीच्या मंदिरात महागौरी पूजन करण्यात आले होते.

तोत्तोचान –एका चिमुकलीचे भावविश्व

लेखक Bhakti यांनी बुधवार, 16/12/2020 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरशः कोरोना काळात या पुस्तकाने एक सुंदर अशी आत्मशांती दिलीये.लहान मुलांचे निरागस भावविश्व सर्वांनाच आवडते.त्यांच्या असंबंध बडबडीने आपला वेळ फुलपाखारांसारखा रंगेबेरंगी होतो. अशा चिमुकल्यांना मात्र शाळा नावाचे दुसरे घर असेच मोकळे पाहिजे तर ती खऱ्या अर्थाने रुजतील.

एका विटीत दोन कोल्या..

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/12/2020 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एकमेकाला चिकटलेलं जुळं.. इवसं वा दिव्यांग जन्मताच कोणी मुक्‍ती देतं गळ्याला नख लावून रस्त्यात जीवंत हेळना वा उसनं संगोपन करून कोणी तिकीट लावतं जत्रेत फक्‍त चरितार्थ नव्हे खोर्‍याने पैसे ओढण्यासाठी... चार हात... चार पाय.. दोन तोंडं.. पाठीलापाठ चिकटली म्हणून मादी देह एक.. आणि दोन भिन्न गर्भाशयांसाठी दोन भिन्न योन्या संबधोत्सुक... संभोगोत्सुक... पुन्हा इवसंच जन्माला घालण्यासाठी की काय... - एक नर घिरट्या घालतोय!... एका विटीत दोन कोल्या... (आणि जत्रेत व्यावसायिक तिसरी..) मारता येतील म्हणून... - सुधीर रा.