Skip to main content

तरच मग कविता कर...

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
जपून वापर जरा शब्द करू नकोस उधळमाधळ उडून जातील कस्पटासमान घोंगावेल टीकेचे वादळ मनातल्या प्रतिमांना ओत साच्यात जरा जपून झिजत चाललेत कंगोरे तीच तीच कविता करून निसर्गाची हाक तशी अधूनमधून कानी येते सतत बोलावणे आले तर औषध घेणे भाग पडते तसे तुझे होऊ नये म्हणून सांगतो दम धर फारच दाटून आले असेल तरच मग कविता कर अत्त्यावश्यक सूचना - १. फारच दाटून आल्याने हे विनोदी शीघ्रकाव्य केले आहे. तेंव्हा ह.घ्या. २. कविता विनोदी आहे हे सांगितले आहेच. तेंव्हा जमेल तेवढे हसावे ही विनंती. ३. माझ्या यापुढील कवितांना याच कवितेतील ओळी फेकून मारू नयेत.:):)
Taxonomy upgrade extras

और एक

लेखक अप्पासाहेब यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
घाल झिम्मा , खेळ फुगडी, धु लुगडी सुंदरीची खा पिझ्झा, चाव चिज, झोक वाईन ईटलीची घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची काट पत्ते, हाण गुद्दे, कर बर्बादी सगळ्यांची ह्याला पोचव , त्याला नागव , धर डुक विषारी घाल खिशात, भर ब्यांकत, चेप माल सर्कारी ह्याची पेटव , त्याची खाजव, खेच टांग नानाची ह्याला दाब , त्याला चोप, कर एन्काउंटर मुड्द्यांची काप बकरं, मुर्गाळ मुंडी , लाव भांडणे जातीची आज साळा, उद्या क्वालिज , मार शिट्टी ईद्येची काल साकर , आज वाईन, येसीझेड हाये उद्याच्याला ह्याची आयात, त्याची निर्यात, किरकेट चा पैका दावणिला माप अल्याड, मोज पल्याड, कर लौबी बिल्डरची घे फावडे , हाण कुद्ळ, जिमीन आपल्

१७६० .

लेखक तर्री यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
१७६० ह्या आकड्याचा वापर मराठीत इतका का बरे होतो ? ऊदा.: तुला १७६० वेळा सान्गितले तरी समजत नाही......... हा आकडा कोठून आला ? .....तर्री.

गमभन का?!

लेखक टीकाकार-१ यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
अआइई किंवा अबकड का नाही?

ही धार पहिलटकरीण ...

लेखक अप्पासाहेब यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
ही धार पहिलटकरीण , नाकास दर्प ओला काल ठेविला तो 'ओपनर ' कुठे रे गेला गलासात आज माझ्या ओतु नकोस सोडा चखण्यात मात्र घाला कांदा अजुन थोडा अंड्यास कोंबडीच्या सोली हलकेच आता फर्साण शेवगाठी अन बोंबिल भेळ भत्ता सलाम आन्टीला तो, जल्लाद फार्मुल्याला घोट एकुलाच जिर्ता , आत्मा फरार जाला नवटाक शेरभराची शीडात भरेल वारा मी डोलतो असा हा, पाहीजे कुणां किनारा (च्यामारी , आपल्याला बी जमतयां की )

संगीतकार दत्ता डावजेकर

लेखक जुना अभिजित यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन सकाळमधली ही बातमे वाचली आणि पुल, सुरेश भट निर्वतल्यावर झालं होतं तस पुन्हा एकदा डोकं सुन्न झालं. दत्ता डावजेकर गेले. अजून काय लिहू. :-( अभिजित

रेशमाच्या बाबांनी

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 20/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम आमच्या परमस्नेही विसोबा खेचरांचे आणि समस्त मिसळपाव पंचायतिचे हे संकेत स्थळ चालू केल्याबद्दल मनापासुन आभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.. आम्ही सभासद व्हायच्या आधीच आमच्या नावांने इथे शिमगा चालू असलेला बघून आम्ही धन्य झालो..असो.. सध्या जालावर आम्हाला फारसा चांगला कच्चा माल मिळत नसल्यामुळे आमची गोची झाली आहे..म्हणून वेळ काढायला .. जालावर मराठी गाणी ऐकत होतो .

ती सांज रंगलेली

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 19/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
ती सांज रंगलेली धुंदीतल्या क्षणाने चोरून प्रीत नेली ओठातल्या स्मिताने वारा उनाड वाहे उडवीत कुंतलाना नजरेस रोखलेल्या स्वप्नास झाकताना काठावरी झर्‍याच्या एकांत स्वर भुकेला तरुसावल्या सलीली निशःब्द सोबतीला हातात हात दोन्ही गुंफून बोलण्यास ते ओठ विलग होती शब्दास शोधण्यास परिते मुकेच राहे पहिलेच प्रेमगान डोळ्यात धृवपदाच्या ओळी निळ्या लिहून सोडून कर कधी ती गेली मला कळेना तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 19/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.) संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले. या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते.