Skip to main content

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-१

गुरुवार, 13/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
बायकोसोबत मार्केटिंगला जाणं म्हणजे एक सुखद अनुभव असतो... म्हणजे आपापल्या बायकोसोबत. ही गोष्ट कोणीही नाकारु शकणार नाही विशेशत: जर त्यांच्या बायकांसमोर विचारलं तर... मी आणि माझी पत्नी एकदा मार्केटिंगसाठी गेलो होतो. जसंकी नेहमी होतं ती पुढे चालत होती आणि मी आपला मागे मागे... काही घेण्यासारखं आहेका ते बघत होतो. एका दुकानावर लावलेल्या एका जाहिरातीने माझं लक्ष आकर्षित केलं. लिहिलं होतं, " लसून शिलण्याचं यंत्र .... फक्त दहा रुपए'. "यंत्र' या शब्दाने माझी उत्सुकता चाळवली गेली ... तसे तर आजकल कोणत्याही गोष्टीचे यंत्र मिळतात ... मी दुकानदाराजवळ गेलो... त्याला मी ते "यंत्र' दाखवायला सांगितलं...

तुझ्याशिवाय माझे जीवन, आता जीवन उरले नाही.........

लेखक विवेकवि
गुरुवार, 13/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आता मला कळून चुकलंय की सारं काही संपले आहे आता चेह-यावरचं हसूसुध्दा माझ्यावरतीच रुसलं आहे तरीही प्रयत्न करतोय पुन्हा ऊभा राहण्याचा तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुन खाली उतरण्याचा आता भोवतालच्या जगात तु हरवली आहेस आणि माझ्या जगात मीच मला शोधत आहे रडण्यासाठी आता डोळ्यात अश्रु उरले नाहीत तुझ्याशिवाय माझे जीवन आता जीवन उरले नाही............ -श्रीकांत लव्हटे ह्या॑ची हि कविता आहे.

अश्रु ....

लेखक विवेकवि
गुरुवार, 13/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल अश्रु करतात नेहमीच गांलावर खेळ मग प्रत्येक संध्याकाळ होते सुरेख कातरवेळ तुझा चेहरा आजही मनाच्या आरशात हसत आहे तुझ्या आठवणींबरोबर आजही जगत आहे आठवणींच्या धुक्यात मन स्वत:ला हरवून बसतं मग वास्तवात आल्यावरही स्वत:ला शोधत राहतं नकोत मला तुझ्या आठवणी असं रोजच म्हणतो आहे तरीही तुझ्या आठवणींबरोबर आजही जगतो आहे तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण रोज एकटयानेच अनुभवतो वास्तवाला विसरुन स्वत:ला स्वत:त हरवून बसतो मन म्हणतं ते क्षण तुझ्या नशिबी आले हे काय कमी आहे हाच विचार करत आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे तु गेल्यावर वाटलं सर्व संपलं स्वत:लाही संपवून टाकावं पण विचार केला प्रेम अमर असतं मी का त्याला सं

स्मृती आणि स्वप्ने

लेखक व्यंकट
गुरुवार, 13/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
( थॉमस फ्राईड्मनच्या द वर्ल्ड इज प्लॅट पुस्तकातील एका परिच्छेदाचा स्वैर अनुवाद. लेखकानी सबंध पुस्तक त्याच्या अमेरिकन देशवासियांना उद्देशून लिहिले आहे. ) ( आमचे मित्रवर्य श्री. नितीन सुपेकर ज्यांनी काही वर्षापूर्वी आमची ह्या पुस्तकाशी ओळख करून दिली त्या बद्दल त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करीत हा अनुवाद करत आहे ) आर्थीक तूट, देशाचे एकूण उत्पादन, बेकारीचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण अशा परंपरागत आर्थीक आणि सामाजीक आकड्यांच्या आधाराने विश्लेषक नेहेमीच विविध राष्ट्रे आणि समाजाच्या तुलना करीत राहीलेले आहेत. हे आकडे महत्त्वाचे आणि ( राष्ट्रीय आणि सामाजीक परिस्थीतीचे) निदर्शक आहेत.

ऑफीस स्पेस

लेखक व्यंकट
गुरुवार, 13/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीस स्पेस हा माझ्या असंख्य आवडत्या हॉलिवूडपटांपैकी एक. सिलिकॉन व्हॅलीत घडणारी कथा वाय. टू. के. चा फुगा जेव्हा फुगला होता त्या काळातली आहे. पिटर गिब्बन्स (रॉन लिव्हींग्स्टन) हा एक गाय-नेक्स्ट-क्युब वाटावा असा सॉफ्टवेअर इंजिनीअर इनिटेक नावाच्या कंपनीत चाकरी करत असतो.

त्रुटी....

लेखक अभिज्ञ
बुधवार, 12/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मा.सरपंच मिसळपावग्राम, थोडे आपल्या नजरेस आणू इच्छितो, प्रकार शीर्षक लेखक प्रतिसाद अंतिम लेखन काथ्याकुट तुम्हाला काय वाटते?