Skip to main content

'केशवा' अजब तुझे अवतार!

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.चे विडंबनाचार्य केशवसुमार ह्यांनी दोन दिवस मि.पा.करांना अत्यवस्थ करुन सोडले आणि नंतर पुन्हा झकास विडंबनाने एंट्री मारुन एक सुखद धक्का दिला त्याबद्दल त्यांना हे विडंबन सादर! शब्दप्रभू गदिमांचे शब्द 'उध्दवा अजब तुझे सरकार' ही आमची प्रेरणा! 'केशवा', अजब तुझे अवतार!

ब्रेकिंग न्यूज

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?
break सौजन्य = ई-ढकल.

धर्म-शिक्षणाचे धडे द्या.........

लेखक संजीव नाईक यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म-शिक्षणाचे धडे द्या......... जून महिना उजाडला की, आपल्या पाल्याला शाळा- कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची एकच धांदल उडते. त्यातल्या त्यात पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची वाढती फॅशन अलिकडे पालकांमधे, विशेषतः शहरामधील पालकांमध्ये वाढलेली आहे. परंतु हे पालक एक गोष्ट विसरतात की, शिक्षणाबरोबर संस्कार हे ही महत्वाचे असून हे संस्कार धर्माद्वारेच मुलाबाळांमध्ये उतरु शकतात. धर्मासंबंधी शाळांमध्ये हल्ली फक्त सुरवातीला प्रार्थना म्हणण्यापलिकडे मुलामुलींचा धर्माशी संबंध येत नाही. या पलिकडे आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, पाठांतर, निरुपण वगैरेसाठी काहीही शिक्षण दिले जात नाही.

शिकवा नही किसीसे...

लेखक फटू यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो... रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं.

नवे भन्नाट अर्थ

लेखक मनापासुन यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मराठीमधे अनेक उपदेश कथा आहेत्...उपदेश सोप्या भाषेत कसा द्यायचा हे त्या कथा लिहीणाराला सहज जमुन जाते. या कथा केवळ आपणाला ठाउक असणारा उपदेश सांगतात असे नव्हे. त्यातुन आपणाला माहीत नसणारा नवा उपदेश ही तेवढाच मोलाचा असु शकतो. तो कळण्या साठी फक्त आपण आपला द्रुष्टीकोन बदलणे जरुरीचे आहे... इथे एक गोष्ट सांगतो..पहा तुम्हाला अशा इतर गोष्टी आठवता का? तुमच्या बुद्धी साठी हा एक नवा खेळ / चॅलेन्ज समजा.... हितोपादेश या पुस्तकात एक चिमणीची आणि माकडाची गोष्ट आहे... एक माकड पावसात भिजले होते.. त्याला थंडी वाजत होते.

हा माझा जीव तिच्या...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल जसा जवळ येऊ लागला तसे मिपाकरांना कसे फुल करवे ह्या विचारत होतोच, तेव्हड्यात चतुरंगशेठचे निवेदन वाचले... आणि डोक्यात किडा आला...१ एप्रिलला अजून ४-५ दिवस बाकी होते.. पण डोक्यात आलेला किडा गप्प कसा बसून देईल.. म्हणलं सगळे जण १ एप्रिलला एप्रिल फुल करतील आपण जरा आधीच करावे..आणि मग आमचा निर्णय प्रकाशित केले.. पण धडाधड आलेल्या प्रतिसादामुळे घाबरलो..म्हणलं जस्त नको ताणायला..फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो..

छोट्या डॉनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 29/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो,आज दि. २९ मार्च रोजी आपला छोटा डॉन उर्फ हरिप्रसाद याचा वाढदिवस आहे. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. मिसळपाव परिवारातर्फे छोटा डॉन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! डॉनराव हॅप्पी बर्थ डे बरं का! आता पार्टी कधी देणार :)

पाठीवरचा तो हात!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"आले, आले बरं का!" गर्दीत कोणीतरी म्हणाले. "कुठे आहेत, कुठे आहेत?" बरेच आवाज. "ते काय, अँबेसिडर मधून उतरताहेत." गुरुशर्टावर बिल्ले लावलेली काही स्वयंसेवक मंडळी पुढे सरसावत, "तुम्ही जरा बाजूला सरका हो, त्यांना यायला सुध्दा रस्ता नाहीये! नाहीतर असं करा ना, तुम्ही सगळे आत का नाही जाऊन बसत? ते तिथंच येणार आहेत." कोणीही फारसं मनावर घेतलं नाही. ते स्वाभाविकच होतं. सगळ्या गर्दीच्या टाचा उंच झाल्या!

विद्रोही कविता आणि सामाजिक जाणीव

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 28/03/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. विद्रोहींच्या भाषेत भाड्या, आलो रे.. माझ्या मते समाज्यातील सर्व घटकांसाठी लेखन असावे हे मला मान्य आहे. परंतु कविता करताना वेगळे भान ठेवावे असे वाटते. समाजाला दलदलीतून वर आणण्याचे काम कवीचे आहे. सातत्याने विचित्र लिखाण करून आपणच आपल्या समाजाचे नुकसान करतो आहोत असे वाटते. खोटे सांगावे असे माझे म्हणणे नाही. समाजासमोर चांगले आलेच नाही तर ? काही कविता पाहून खेद वाटतो - तरूण, नवख्या कवीने अभ्यास म्हणून जरी वाचले तरी त्याला वाटेल - पहायला गेलो सर्वसमावेशक सागरा, भेटून धन्य झालो तुला, हे गटारा.