Skip to main content

नावात काय नाही?

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला. 'मोडक बोलतोय. आई आहे?' 'थांबा हं. देते.' असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला. त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, 'ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?' 'बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही...' मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं.

सदस्य नाम कसे बदलावे?

लेखक सरपंच यांनी रविवार, 20/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन असतांना एवढं मराठी पाहून बिचकलो.मराठी लिहीता येते की अशी शंका होती. म्हणून सदस्य नाम इंग्रजीत लिहीले. मराठी लिहीले पण ते भलतंच लिहील्या गेलंय. आता ते बदलावं म्हणतो. अश्या अनेक प्रश्नांवर सदस्य नाम बदलने हा एक उपाय आहे. १) यासाठी प्रवेश केल्यानंतर डाव्या समासात माझे खाते वर टिचकी मारा. २)त्यानंतर आपल्या सदस्यनामाच्या खाली संपादन वर टिचकी द्या. ३)तेथे खाते सुचना च्या चौकटीत सदस्यनाम नावाची छोटी चौकट आहे.

संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 20/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय. १.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप साहित्यः ४ टे.स्पून बटर ३पातीचे कांदे स्लाईस करून ४५० ग्रॅम गाजर १ टे.स्पून धने पावडर ५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक १/२ कप गोड घट्ट दही चवीनुसार मीठ, मिरपूड २-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि.
Taxonomy upgrade extras

शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?

लेखक देवदत्त यांनी रविवार, 20/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन.. शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी) स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते.

भाषा आणि प्रमाण

लेखक नीलकांत यांनी रविवार, 20/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.

एक अशीही केस...

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 20/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काळा असल्यावर सर्वांनाच आवडतो पांढ-याच्या नशीबात बायकोचाही नसतो