Skip to main content

मांसाहार व अन्नटंचाई

लेखक ऐश्वर्या राय यांनी मंगळवार, 22/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मांसाहारामुळे अन्नटंचाईच्या समस्येला कसा मोठा हातभार लागत आहे त्याबद्दल माहीतीपूर्ण दुवे: http://blog.wired.com/wiredscience/2008/04/food-riots-begi.html http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/index.html आजची पिढी ही पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत मांसाहाराकडे जास्त वळलेली आहे आणि रोज त्यात भर पडत आहे.

विश्वकर्मा नीलकांत

लेखक आनंदयात्री यांनी मंगळवार, 22/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अरे हो हो हो ... सांगतो .. असे शीर्षक का ते सांगतो ... "विश्वकर्मा नीलकांत" असे धमालराव आमच्या कांताला संबोधत असतात, कारण दिवसभर (ऍटलिष्ट धा तास तरी) मिपा आमच्या साठी विश्व असते हो. आम्ही दिवसभर इकडे वावरतो, चकाट्या पिटतो, एकमेकांची खेचतो, एकमेकांची सुख दु:ख्खे वाटतो झालच तर आत्मानंदी गुरु वैगेरे पण मिळवतो :).

आबांच्या राज्यात...

लेखक अजय जोशी यांनी मंगळवार, 22/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मागून मागून मागणार काय? आबांच्या राज्यात वीजच नाय. तासून तासून तासणार काय? आबांनी कोणाची ठेवलीय काय?

ध मु चे लग्न

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 22/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये.

(गजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 22/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले! तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

मेक्सिकन गंबो

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 22/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
इथे एका मेक्सिकन उपहारगृहात एकदा मेक्सिकन गंबो खाण्याचा योग आला. अचानक समोर आलेला हा पदार्थ आवडला, त्यामुळे जरा घरगुती पद्धतीने मूळ कृतीच्या थोडीफार जवळ जाईल इतकी पाककृती तयार केली आहे. तीच इथे देते. खरे तर गंबो म्हणजे काही वेगळे नाही, उसळ, भात आणि भाज्या एकत्र करून जे काही बनेल ते म्हणजे ही पाककृती. भाज्यांच्या प्रमाणात उपलब्धतेप्रमाणे थोडेफार बदल केले तरी हरकत नसावी. भेंडी हा यातील एक पारंपारिक घटक आहे. जे उगाचच भेंडी आवडत नाही , आवडत नाही असे म्हणतात त्यांना अजिबात न कळता भेंडी खायला घालायची असेल तर ही पा.कृ. जरूर करा! साहित्य - १.

सारे प्रवासी गाडीचे

लेखक भोचक यांनी सोमवार, 21/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.