अरे हो हो हो ... सांगतो .. असे शीर्षक का ते सांगतो ... "विश्वकर्मा नीलकांत" असे धमालराव आमच्या कांताला संबोधत असतात, कारण दिवसभर (ऍटलिष्ट धा तास तरी) मिपा
च आमच्या साठी विश्व असते हो. आम्ही दिवसभर इकडे वावरतो, चकाट्या पिटतो, एकमेकांची खेचतो, एकमेकांची सुख दु:ख्खे वाटतो झालच तर आत्मानंदी गुरु वैगेरे पण मिळवतो :). आता काही जण आम्हाला पडिक वैगेरे म्हणुन पण हिणवतात, पण आम्ही काय ते मनावर घेत नाही, म्हणो बापुडे !
तर असे हे मिपा आमच्या आयुष्यातला महत्वाचा घटक झाला आहे, आमची आणी एक प्रतिमा आहे तिकडे, एक प्रतिविश्वच म्हणा ना ! तर आमच्या या विश्वाचा विंजिनीयर नीलकांत .. म्हणजे आपला कांता हो ! त्याने आमचा एक मोठा हट्ट पुर्ण केलाय, आमच्या खरडवह्या त्याने एकदम टकाटक करुन दिल्यात. काय आनंद सांगु, अवर्णनीय. एखाद्या सुग्रण गृहिणीला खुप दिवसांनी ओट्याला बसवलेल्या किचन ट्रॉलीचा आनंद, एखाद्या कॉलेजकुमाराला नव्याने मिळलेल्या क्यामेरावाल्या मोबाइलचा आनंद, एखाद्या तरुणाला आपल्या गोडश्या गर्लफ्रेंडला मित्रात मिरवण्याचा आनंद कित्ती कित्ती असेल नाई !! तसाच आम्हालाही आमच्या मिपावरच्या या सुधारणेचा खुप खुप आनंद झालाय.
:)
विश्वकर्मा नीलकांत - तुमचे खुप खुप अभिनंदन !!!!!!!
आणी शतशः धन्यवाद सुद्धा.
याचबरोबर शशांक, ओंकार या पडद्यामागच्या जादुगारांना सुद्धा धन्यवाद. :)
आणी हो याचबरोबर आपल्या घराची ओसरी अगदी आनंदाने आम्हाला खेळायला देणार्या तात्यांचे पण धन्यवाद. :)
* * *
लै झ्याक
आनंदयात्र
:)
अभिनंदन !!!!!!!
अभिनंदन
अरे वा..
छान छान नीलकांत!
धन्यवाद.
पडद्यावरील,
हो