Skip to main content

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

लेखक छोटा डॉन यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.

आपली बस

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा. सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात. सदू : बस आली बस. दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस! (तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.) दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे. सदू : मग दुसर्‍या सीटवर बसु या का ? दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे. सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ? दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्‍या आयांसाठी आहे.

लेखात दिलेला दुवा(link) हा नविन खिडकीत कसा उघडावा ?

लेखक सरपंच यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
1) संगणकाच्या उंदरावर(माऊस) उजवी टिचकी मारून 'नव्या खिडकीत उघडा' हा पर्याय निवडा. २) दुव्यावर उंदराने टिचकी मारताना डाव्या हाताने शिफ्ट बटन दाबून ठेवायचे, दुवा नव्या खिडकीत उघडतो.

अर्धे अक्षर आणि हलंत (पाय मोडणे.)

लेखक सरपंच यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
' सुस्वागतम ' मधील शेवटचा म अर्धा हवा. तो कसा लिहायचा ? -- १) शब्दाच्या शेवटी येणार्‍या अक्षराचा पाय मोडायचा असल्यास .h किंवा +h असे टंकावे . उदा. अतिपरिचयात् लिहायचे झाल्यास atiparichayaat.h असे किंवा atiparichayaat+h असे टंकावे. २) सुस्वागतम असे लिहून झाल्यावर पुन्हा "म" दाबणे ="म्म" असे दिसते, त्यातला दुसरा "म" काढून टाकला की = "म्" असे दिसते. सर्व व्यंजनांना हे लागू पडते.

संवाद

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोधपर व मनोरंजक संवाद
: - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - प्रवेश घ्यायला : - मिळाला ? : - नाही. : - का ? : - कोटा आडवा आला : - बरं झालं, आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळ्या! : - आठळ्याही तुम्हीच खा, मी जातो 'तिकडे'. : - भटो भटो : - ओ : - कधी आला ? : - परवाच : - काय आणलं ? : - चॉकलेटं : - उभी कापू का आडवी ? : - नका कापू, तुमच्यासाठीच आणलीयेत. : - मजा आहे ना तिकडे ? : - मजा नाहीये, पण सजा पण नाही. : - भटो भटो : - ओ : - कुठे गेला होता ? : - 'तिकडे', मुलाकडे. : - काय केलेत तिकडे ? : - नेहेमीचेच, आराम

मिपाचा सिंहगड कट्टा

लेखक इनोबा म्हणे यांनी रविवार, 27/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, येत्या रविवारी दि.४ मे रोजी मिपाचा कट्टा सिंहगडावर भरवायचा मनसुबा आहे. या कट्ट्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गडावर मोकळ्या हवेत मिपाच्या सदस्यांचा 'मुशायरा' आयोजीत करण्याचा विचार आहे. तरी या 'ऐतीहासिक कट्ट्यास' उपस्थित राहू इच्छिणार्‍या सदस्यांनी आपापली नावे/मते जाहिर करावी. इच्छूकांनी आपले भ्रमणध्वनी क्र. कळवावे. :-C : ९३७२-९३७२-१८

जीए

लेखक हेरंब यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.
Taxonomy upgrade extras

माणुसकीचा झरा

लेखक शितल यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.

मला मनाचे पटले नाही

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शनिवार, 26/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मला मनाचे पटले नाही वाद आमचे मिटले नाही मला नेहमी ऐकू येते मनातही जे म्हटले नाही राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? अभिलाषेचे वादळ आले पाय काधी लटपटले नाही फक्त ठेवले नावा पुरते नाते मी विस्कटले नाही शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही अनिरुद्ध अभ्यंकर