Skip to main content

बहु असोत सुंदर संपन्न की महा....

लेखक उदय ४२ यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,आज महाराष्टर् दिन्...आपण सर्व मराटी जन या राज्याला ,आपल्या भाषेला प्रणाम करुया.तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

लुब्रा स्वभाव

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव

भरला बघून पेला मी हंगरून गेलो
गोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या  या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.

आवाज

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला.

महाराष्ट्रदिवसाच्या शुभेच्छा

लेखक चेतन यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा आणि हुतात्म्यांना आदरांजली मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त) सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचावे... -- जनरल डायर.

अस्थीपंजर

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 01/05/2008 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल शरपंजर

ग्लासातील संपलेली भर
उजाडले बघ, पुरे अता कर

कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर

'नीळकंठ', 'शंकर्‍या' उचला
मेल्याला, टाका रस्त्यावर 

ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर

हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या  धरणीवर...

श्रध्दा

लेखक भावना यांनी बुधवार, 30/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, माणसामधले माणुसपण जाते जगण्यामधले जीवन जाते माणसाविना माणसाचे खरचं का कुठे काही अडते ? श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, मनाची कवाडे भकास होतात श्रध्देच मन निराश होते प्रेमाला माणुस पारखा होतो पण कुणाला असा किती फरक पडतो ? श्रध्दा कुणावरही असु शकते, देवावर मानवावर अथवा भावनांवर पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, देव , माणुस भावना सगळेच

स्वय॑पाक घरातील घडामोडी

लेखक शितल यांनी बुधवार, 30/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आपल्याला (निदान मला तरे)काही पदार्थ करायला जमत नाहीत (विशेषः आपण पदार्थ प्रथमच बनवित असताना )तर कधी काही तरी वेगळेच होऊन जाते, म्हणजे कसे जाना था चीन,मगर जा पो॑चे जपान ! माझी तर फजिती ही होतेच होते.

पोरी...

लेखक खट्याळ मुलगा... यांनी बुधवार, 30/04/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमात पडण्या अगोदर विचार करा..
प्रेमाच्या गावात घसरला पाय... पोरीच्या जातीचा भरोसा काय... एकाला हाय ... दुसर्‍याला बाय.... आणि तिसर्‍या बरोबर पळुन जाय...
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))
Taxonomy upgrade extras