Skip to main content

बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र.

लेखक अभिज्ञ यांनी मंगळवार, 06/05/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र. येत्या शुक्रवारी,दि.९ मे २००८ रोजी, संध्याकाळी ७ वा. आयोजित करीत आहोत. स्थळ-डेनीज रेस्टॉरंट,जयदेवा उड्डाणपुलाजवळ,जे.पी.नगर,बंगलोर. सर्व रसिक आणि उत्साहि मि.पा.करांना तीर्थ प्रसादाचे जाहिर निमंत्रण.

काय चाललेय हे?

लेखक कैलासराजा यांनी मंगळवार, 06/05/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो,मी या मिसळपावाच्या गाडीवर आजच आलो आहे. मला एक विषय तुमच्या पुढे ठेवयचा आहे.मी एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतो. हल्ली लोकांचा अओढा देवाधर्माकदे खुप वाधला आहे.याचे कारण काय असेल?असुरक्षितता की फॅशन?की श्रद्धा?या युगात हे योग्य आहे का?नारायण नागबळी सारखे विधी करण्यासाठी जी झुंबड उडते याचे कारण काय असावे?

बोंबील आख्यान !!!

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 06/05/2008 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विनंती: "मासे तुमचं अन्न असेल" किंवा "मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल" तरच कृपया हे वाचावे. -- आज्ञेवरून !!! --------------------------------------------------------------------- झर्र…झर्र…झर्र…झर्र… ऑफीसमधे काम करताना खिशातला मोबाईल फोन थरथर करून थांबला. मनात म्हणलं समस (SMS) दिसतोय. फोन पाहिला तर दीपाचा समस होता "I got bombeel !" कामाच्या गडबडीत त्या वाक्याचा अर्थ समजायला १-२ मिनिटे लागली. मग एकदम हजार tube lights पेटल्यासारखा डोक्यात प्रकाश पडला. सगळ्या लिंक्स लागल्या.

पाककृती : बटर चिकन आनि व्हेज बिर्याणी!

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 06/05/2008 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
ह्म्म.. मिपावर प्रथमच लेख लिहीत आहे.. आणि त्यातून रेसीपी! दोन्ही स्वातीताई आणि पेठकर काकांच्या अंगणात न विचारता घुसखोरी केल्यासारखं वाटतय! :) असो.. तर ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचं होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..) त्यातून प्राजूचा अस्सल कोल्हापूरी थाळीचा फोटो पाहील्यावर राहवेच ना त्याला.. म्हणून हा बेत.. बटर चिकन ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे. अस्सल नॉन्-व्हेज नसेल. कारण त्या पण नॉन्-व्हेज करत नव्हत्या. पण निनादसाठी करायला लागल्या. तर त्यांची ही रेसीपी.

गटवार तात्काळ चर्चा अर्थातच चॅटींग.

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 05/05/2008 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळाने अनेक विषयात आघाडी घेतली आहे. तात्काळ आणि तात्काळीक चर्चा म्हणजेच चॅटींग असे एक शिरपेच मिसळपाव वर असावा असे मला वाटते. खरडवही मध्ये एकास एक अशी चर्चा होते आणि ती इतरांना पाहता / वाचता येते. व्यक्तिगत निरोप ( पोस्टहापिस) हे दोघातील संवादाचे चांगले रुप आहे. काथ्याकूट, जनातलं, मनातलं हे संकेतस्थळावरचं दिर्घवेळ आणि स्थायी असणारे रुप आहे.

समर्पित हो

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 05/05/2008 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
यशाच्या वाटेकडे डोळे लावुन बसू नकोस आजच्या कुवतीचा अभिमानी होऊ नकोस. स्वप्रतापे स्वबळे तू अवघेचि जिंकुन घे जिंकण्यासाठी जिंकण्याची अभिलाषाही जिंकुन घे. प्रकांड हो प्रबुद्ध हो चंड हो प्रचंड हो प्रकर्षाने प्रारब्धावर तुच तू प्रसन्न हो. प्रकाशाचा पुंज हो तेजाची मुर्त हो भोवतीच्या तमसावर ज्योतिर्मयी शर हो. स्वतंत्र हो समृद्ध हो समर्थ हो सनाथ हो अंगीकृत कार्याला सर्वस्वी समर्पित हो.
(सदासर्वदा) तो मी नव्हेच
Taxonomy upgrade extras

मिसळपाव वर काय आहे?

लेखक ऋचा यांनी सोमवार, 05/05/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्ताच मिसळपाव वर सभासद झाले आहे. इथे नक्की काय आहे?

(किंमत)

लेखक चेतन यांनी सोमवार, 05/05/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं) कारणे होतीचं तशी लिहायला प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या प्रश्न हा साधाच होता पण तरी लागला तो काहीतरीच कारणे द्यायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे) काळजी त्यांची नका करू एव्हढिही की काळजी लागेल ही खटकायला बंद कधीही नाही केले मी उमलायचे आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला भाव नाही तुला थोडासाही दिला काजवे लागले दिवसाचं चमकायला माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी जेव्हा भूक ही लागेल बोलायला