Skip to main content

भारतीय संस्कृती आणि अमेरिकन पोरी.......

लेखक काळा_पहाड यांनी बुधवार, 07/05/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आयपीएलच्या टी२० ने म्हणे प्रोत्साहनपर नाचायला अमेरिकेतुन पोरी मागवल्या. आल्या तेव्हा काय अवस्था होती बिच्चाय्रा पोरींची!! करायला काम नाही. खायला अन्न नाही. ल्यायला कपडे नाहीत. अरारा. लई वंगाळ वाटलं बघा जीवाला. गेले दोन चार दिवसात मातुर परिस्थितीत बराच पडलाय म्हणायचा ! पोरी कशा आंगभर कपडे नेसुन नाचू लागल्यात. बरं वाटलं. तरी म्हटलं माझा भारत देश एवढा कद्रू कधीपून झाला जो पाहुण्या पोरीबाळींना चोळी लुगडंबी देईना झाला. भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो.......... तोमीनव्हेच

'' मरावे परी लग्न नाही करावे ''

लेखक विवेकवि यांनी बुधवार, 07/05/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या वाढदिवसा निमित्त हे एक नविन विड॑बन मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी मना सज्जना तोच चंडी उठावी तिची त्या क्षणी जिभ वेगे सुटावी चहा पाजुनि थंड डोके करावे पति चांगला ऎसे नांव मिळावे त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा प्रभाते मनी बायकोला भजावे तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे पगारास हाती तिच्या सोपवावे कमावुन जास्ती तिला तोषवावे तिचें पाय रात्री जरासी चुरावें मका तेल ते चोळुनि जें मुरावे निजायास गादी उशी शाल द्यावी अशी चाकरी नित्य संपन्न व्हाव
Taxonomy upgrade extras

सहवास

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 07/05/2008 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणाला लागून असलेली खोली साफ करतांना नजर सहज खिडकीबाहेर गेली. एक चिमुकला लव बर्ड खिडकीला लागून असलेल्या वेलासमोर उडतांना दिसला. गर्द निळ्या पिवळ्या रंगाचे मऊशार स्वेटर घातलेला. इतका चिमुकला कि तळहातावर बसवून चारी बोटांनी हळूवार लपेटता यावा. त्याची आपली काहीतरी लगीनघाई सुरू होती. मधूनच सुर् कन उडून जायचा. परत येतांना चिमण्या चोचीत एखादेच लहानसे पीस किंवा काडी घेऊन यायचा. तो जरा दूर गेल्यावर खिडकीच्या काचेजवळ जाऊन पहिले. वाटले होते त्याप्रमाणे हा सारा उद्योग घरटे बांधण्याचाच होता. वेलीवर फांद्यांच्या बेचक्यात नुकतेच सुरू केलेले बांधकाम दिसत होते. बांधकाम कसले!

पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

लेखक मन यांनी बुधवार, 07/05/2008 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
"आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात. साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही . आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार. साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?" छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या (चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं.

काही खावेसे वाटते पण खाणार नाही

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 07/05/2008 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही गरगरीत पोटाचा ढेर वाढू देणार नाही काही खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही |धृ| बासुंदी श्रीखंडपुरी आमरस रत्नांगीरी पुरणपोळी तुपे माखली चाखती घरोघरी चिकनकरी मटनमच्छी चोपती काहीबाही शेवटी आइसक्रीमात रसगुल्ले घालुन खाई सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही पण खाणार नाही |१| केक थोरला गोडसा आहे समोर ठेवला चॉकलेट लोण्याची छान नक्शी काढला आत भरले असती अक्रोडाचे तुकडे काही त्याकडे मी आससुनी पुन्हा एकदा हो पाही सारे खा|वेसे वाटते पण खाणार नाही
Taxonomy upgrade extras

मत

लेखक कालिन्दी यांनी बुधवार, 07/05/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मन्ड्ळी, मी इथे नविन आहे. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. मी या पूर्वीही मीपा वाचत होते. पण सद्स्य नव्हते. मीपा छान आहे. त्यात वाद्च नाही. पण एक गोष्ट वाचताना लक्ष्क्षात आली कि इथे नवीन पेकी कोणी प्रतिक्रिया टाकली की जुने लोक ती सरळ उडवून लावतात किन्वा सरळ ignore करतात . आणी जुन्याना मात्र support kartat. त्यामुळे इथे लिखाण करु नये अशी भिती वाटत रहाते.

प्रॉन्स ग्रीन पुलाव

लेखक प्रभाकर पेठकर यांनी मंगळवार, 06/05/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मध्यम आकाराची कोलंबी - ५०० ग्रॅम्स (थोडी मोठी चालेल पण फार लहान नको.) नारळ - अर्धा पुदीना -अर्धी मूठ कोथिंबीर - एक मुठ हिरव्या मिरच्या - ३ किंवा ४ लसूण - ८-१० पाकळ्या आलं १" लिंबू - १ मीठ चवीनुसार. मोहरी - २ टेबलस्पून. केळीची कोवळी पाने ४ (शक्यतो कर्दळीच्या पानाच्या आकारा एवढी) सुवासिक बासमती तांदूळ - २ वाट्या (अंदाजे ४०० ग्रॅम) वनस्पती तूप - ४-५ टेबलस्पून काळी मिरी - १०- १२ नग तेल फोडणीसाठी. (दोन चमचे) तयारी: कोलंबी सोलून साफ करून घ्यावी.
Taxonomy upgrade extras