Skip to main content

गुळपापडीची वडी

लेखक वरदा यांनी बुधवार, 14/05/2008 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
सोप्पी चटकन होणारी आणि पौष्टीक आहे ही वडी ४ वाटी गव्हाचे पीठ्/कणीक २ वाट्या गुळ १ १/२ वाटी पाणी ८-१० खारका, ५-६ बदाम दोन्ही वाटून थोडा तळलेला डींक २ चमचे खसखस पाऊण वाटी साजुक तुप (वडी मऊ किंवा कडक आवडत असेल त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण कमी जास्त करा) कणीक तुपावर खमंग भाजून घ्या, गुलाबीसर रंगाची होईपर्यंत. गुळ पाणी एकत्र करुन एक तारी पाक करा. खूप दिवस ठेवायच्या असतील वड्या तर आणखी घट्टं पाक करा. सगळा गुळ आवडत नसेल तर अर्धा गुळ अर्धी साखर घातली तरी चालेल. आता भाजलेली कणीक पाकात घाला ढवळा आणि किंचित तुप लावलेल्या ताटात थापा. वड्या पाडा आणि खा. खूप गरम असताना वड्या पाडल्या तर तुटु शकतात.

बीन सॅलेड

लेखक वरदा यांनी बुधवार, 14/05/2008 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
ही पा. क्रु. तुम्ही वाचलीच आहे आधी मी इथे फक्त नंतर सापडावी म्हणून टाकतेय बीन सॅलेड १०-१५ फरसबीच्या शेंगा २ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने १/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट) १/४ कप रेड व्हिनेगर १ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उकडलेला) तेवढेच छोले (उकडलेले) पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो.. चु. भु. द्या. घ्या.

रेखाटन

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 14/05/2008 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काही रेखाटनांमधील हे एक आवडते रेखाटन.हे रेखाटन फार जुने आहे.(दि. ८ नोव्हेंबर २००२).यापुढील काही रेखाटने लवकरच देण्याचा प्रयत्न करीन. माध्यमः एच. बी. पेन्सिल, नोटपॅडचा साधा कागद

लहानपण देगा देवा

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 14/05/2008 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
जे नसत त्याचा हव्यास हा तर खास मानवी स्वभाव! आज मी 'लहानपण' हा शब्द शब्दशः बालपण या अर्थाने वापरतो आहे. लहान असताना कधी एकदा मोठे होऊ, कधी कर्ते होऊ, आपण आपले निर्णय घेऊ असे वाटत असते. एकदा मोठे झालो की राहुन राहुन वाटते की लहान होतो तेच बरे होतो. पण तसे होणे शक्य नसते. मात्र मोठेपणाच्या शापाला उ:शाप असतो तो घरातल्या वडीलधार्‍यांचा. जो पर्यंत घरात मोठी माणसे आहेत तोपर्यंत आपण लहानच की! आपले दप्तर शाळेतुन आल्यावर भिरकावायचो तसेच कधीतरी मोठेपणीही आपले कामाचे कागद 'बाबा, जरा हे उचलुन ठेवा, लागले की घेईन' असे म्हणत तिर्थरुपांकडे सोपवुन मोकळे होण्यात एक वेगळाच आनंद असतो.

औट घटकेचा पाहुणा...

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/05/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच. तर झालं असं.... आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली.

म्हणी व वाकप्रचार यांचा उगम.

लेखक गणपा यांनी मंगळवार, 13/05/2008 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या नेहमीच्या बोलण्यात बरेच वेळा आपण म्हणी, वाकप्रचार याचां उपयोग करतो. बर्‍याच वेळा आश्या म्हणी व वाकप्रचार यांच्या मागे काही धटना, गोष्टी धडलेल्या असतात. आपल्या पैकी कुणाला जर आश्या गोष्टी आठवत असतील तर त्याची इथे देवाण-घेवाण करु. (जर असा घागा आधीच कुणी चालू केला असेल तर सरपंचाना हा धागा उडवण्याची नम्र विनंती. ) सुरुवात मीच करतो. ऊंटावरचा शहाणा. एका खेड्यात एक शेतकरी राहात होता. त्याच्या जवळ म्हैस होती. ही भली मोठ्ठी शिंग होती तिला . ती शेतकर्‍याची एकदम लाडकी होती.

व्हेज मांचुरिअन

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 13/05/2008 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
मांचुरियनला जरी आपण चायनीज म्हणत असलो तरी ती चिनी आवरणातली भारतीय सुंदरी आहे. साहित्य भज्यांसाठी- १ वाटी किसलेला कोबी,१ वाटी किसलेली गाजरे,१ टे स्पून आलं मिरची लसूण पेस्ट,१ टीस्पून सोया सॉस, प्रत्येकी १.५ ते २ टे स्पून मैदा व कॉर्नफ्लोअर ,मीठ,अजिनोमोटो चवीनुसार,१/२ वाटी भात(शिळा असल्यास उत्तम) तळणीसाठी तेल कृती- कोबी,गाजर एकत्र करणे.मैदा+कॉर्नफ्लोअर त्यात घालणे.आलं,लसूण मिरची पेस्ट घालणे,सोयासॉस घालणे,मीठ आणि अजिनोमोटो चवीनुसार घालणे.

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 13/05/2008 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो. तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते....

रंगपंचमी (उत्तरार्ध)

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 13/05/2008 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्र व घटना काल्पनीक) रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच. इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून.