Skip to main content

माणदेशातील शिलेदार वारुगड

लेखक व्लॉगर पाटील यांनी मंगळवार, 02/02/2021 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
माणदेशातील शिलेदार वारुगड । मराठी vlog सातारा फलटण महादेव डोंगर रांगेत असलेला गिरिदुर्ग प्रकारातील, जवळपास ३००० फूट उंच असलेला किल्ला म्हणजे "वारुगड". विजापूरच्या वाहुतुकीवर नियंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी २ किल्ले बांधले , एक संतोषगड आणि हा वारुगड. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी पासून जवळ असेलेला हा किल्ला. वारुगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १० ते १५ मिनटे लागतात आणि जर जाधववाडी मार्गे आलो तर जवळपास २ तासाचा ट्रेक आहे. गडावरती जाण्यासाठी सिमेंट च्या पायरचा बांधकाम सुरु आहे. गडाच्या मुख्य दरवाजा जवळ भक्कम तटबंदी , दोन बुरुज व दरवाज्याचे अवशेष आहेत.

हाक आभाळाची येता

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 01/02/2021 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते जुन्या व्रणावर रोज नवी जखम करते अनावर भोवंडून शिणलेल्या प्राणासाठी वाटेवरच्या झाडाची साथ वाटे मला मोठी त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर इवल्याश्या कंठातून काढी तरल लकेरी हाक आभाळाची येता झेपावते दिगंतरी
काव्यरस

"श्रीपाद श्रीवल्लभ लीला वैभव" पोथी परिचय-

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 01/02/2021 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
संत महंतांच्या जीवनावर आधारित काव्यातून किंवा गद्यातून केलेले लेखन पोथी लेखन म्हणून मानले जाते. अद्भूत रम्यता, पारलौकिक अनुभव, चरित्र नायकांचे अचाट किंवा अवास्तव वर्णन त्यांच्या भक्तगणांना मान्य असते. ते श्रद्धा भावनेने पोथी लिखाण वाचतात, पारायणे करतात. त्यांनाही अदभूत अनुभव येतात. ते खाजगीत सांगितले वा बोलले जातात. पण मुद्दाम ते सार्वजनिक करून सांगण्याचे साहस करायच्या भानगडीत पडत नाही... असो. एक पोथी माझ्या वाचनात आली.

अहिराणीचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/02/2021 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा. बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या.

प्रवास (भाग 5)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 01/02/2021 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास भाग 4 https://www.misalpav.com/node/48169 भाग 5 प्रवास भाग 5 आनंद (?) खोलीबाहेर पडला तो थेट मागच्या दाराने घराबाहेर गेला. त्याची पावलं भराभर पडत होती. तो भिकुच्या झोपडीजवळ आला. झोपडीमध्ये शिरण्याअगोदर त्याने एकदा मागे वळून वाड्याकडे बघितलं आणि मग तो त्या झोपडीत शिरला. *** मनाली खोलीत शिरली आणि तिने अगोदर मोबाईल हातात घेत किती वाजले आहेत ते बघितलं. दुपारचे बारा वाजून गेले होते. ते पाहून मनालीला धक्काच बसला. मनाली : बारा वाजून गेले? अरे बापरे!

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 31/01/2021 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.