Skip to main content

पोरखेळ !

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 23/05/2008 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
"Child's Play Is Serious Business" ह्या उक्तीवर आधारित… Anita Wadley ह्यांच्या "Just Playing" कवितेवरून स्वैर अनुवादित… ----------------------------------------------------------------- रचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर वाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर ! शिकतो आहे मी, 'भार' आणि 'तोल' असेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १ हाती माझ्या बाहुली, भातुकलीचा खेळ नजर म्हणे तुमची, "आवरायला वेळ" ! 'जपणं' नि 'सांभाळणं' शिकवतो खेळ बनू उद्या 'आई'/'बाप' आम्ही एखादवेळ....
Taxonomy upgrade extras

साडेतीन शहाणे

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 22/05/2008 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे? माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना. १. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास २. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी ३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर ४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही.

फोडणे-वाढवणे

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 22/05/2008 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जेंव्हा देवाला वगैरे जातो व नारळ फोडतो. पण नारळ फोडण्याच्या कृतीस नारळ वाढवणे असे म्हणतात. जेंव्हा बांगडी फुटते तेंव्हा सुद्धा बांगडी फुटली असे न म्हणता बांगडी वाढली असे म्हणतात. ज्या गोष्टी आपण अक्षरशः फोडतो, त्याला वाढवणे हे गोंडस नाव का द्यावे याचा बोध काही केल्या झालेला नाही. देवाच्या ठिकाणी फोडलेल्या नारळाला 'नारळ वाढवणे' असं म्हणायचं; तेच निवडणुका लागल्या की वर्तमानपत्रात बातमी येते की 'अमूक अमूक यांच्या हस्ते भागातल्या प्रचाराचा नारळ फुटला.' त्याला मात्र नारळ वाढवला असे म्हणायचं नाही.

सार काही क्षम्य असतं

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 22/05/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं....... हे इतके रम्य असते की त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ; क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं......... माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं... आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन मी किती रागावलोय ; याचा अंदाज घेणं..... तुझं हे असं पहाणं...... हे इतके रम्य असतं की त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......

वडाप

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 22/05/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
वडाप.. सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने.. तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या.

नेहमीच धडकी भरते...!

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 22/05/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींच्या प्राणाची तुळस बहरलेली पाहून आम्हांला मात्र धडकी भरली :) भरदार तुझ्या दिसण्याने नेहमीच धडकी भरते... ! झाडु घेउनी उभा ज़री बिन् दिक्कत ही अवतरते... ! तो तुझाच - खोलीमधला कुरतडला गाउन, सदरा... ! अन् तुझ्याच हाय कृपेने भार्येचा चढतो पारा... ! या मंत्रभारल्या वेळी मी इथे एकटा नाही... ! ते तुझेच - उंदिर,झुरळे मावश्या नि बोके काही... ! ही शांत, सुभगशी संध्या पण किंचित उदासवाणी... ! ओट्यावर, ज़मिनीवर ना सांडले दूध वा पाणी... ? झटक्यात उगवशी केव्हा मी वडे,भजी तळताना... ! मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना...

सुंदरा मनामधे..

लेखक ऋचा यांनी गुरुवार, 22/05/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
हा दुवा पहा http://www.youtube.com/watch?v=e7zWwlSZPHo ही लावणी मला अगदी लहानपणा पासुन म्हणजे १० असल्यापासुन आवडते. (१० ही कविता होती मराठीत) ह्यातीम उपमा फारच सुंदर आहेत.

लेमन राईस

लेखक शितल यांनी गुरुवार, 22/05/2008 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १. भात २ वाटी, (शीळा असल्यास उत्तम) २. मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिरवी मिरची, लि॑बु, तेल, साखर, मीठ, तुप, कोथ॑बीर. कृती :- भात मोकळा करून घ्यावा, फोडणीसाठी तीन चमचे तेल घ्यावे, तेल तापल्यावर त्या मध्ये हि.मिरची चे बारीक तुकडे टाकावेत, न॑तर कडिपत्ता टाकावा, मग मोहरी, जीरे टाकुन भात त्याफोडणीत भात घालावा, मीठ, साखर घालावे (अ॑दाजे स्वतःला लागणार्‍या गोडी नुसार), लि॑बु पिळावा (जास्त दाबुन नको नाहीतर सालीचा कडवटपणा ही त्यात उतरेल) व भात छान परतावा. (साधारण दोन वाट्याला अर्धा लि॑बु लागेल, लि॑बाचा आकारावर आणि आ॑बटपणावर ते अवल॑बुन आहे.