Skip to main content

मिजास - अलक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 03/02/2021 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिजास - अलक ------------- परश्या डोकं धरून , झाडू बाजूला ठेवून कचऱ्याच्या घाण वास मारणाऱ्या ढिगाजवळ बसला होता . कचऱ्याचे ढीग उपसून उपसून त्याला त्याचं स्वतःचं आयुष्यच कचरा झाल्यासारखं वाटत होतं . रस्त्याने जाणाऱ्या , चांगले कपडे घालून मिरवणाऱ्या जनतेकडे पाहून , आपण असे फिरू शकत नाही याचं त्याला नैराश्य आलं होतं . कचरेवाल्या राधाबाईने जवळ येऊन त्या तरुण पोराच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व ती म्हणाली , " चांगली कापडं घालनाऱ्या मान्सांपेक्षा आपण भारी हावोत . आपण हावोत म्हून तर त्यांची मिजास चालतीया ! "

जाणीव - अलक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 03/02/2021 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
जाणीव - अलक ---------------------------- खच्यॅक - टपोरीने त्वेषाने भाल्याच्या पोटात चाकू खुपसला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या . भाल्याच्या शरीरात वेदनेचा एकच आगडोंब उसळला . त्याला प्रकर्षाने जाणवलं , ' शरीरात चाकू खुपसल्यावर फारच नकोशी , जीवघेणी कळ येते . टपोरीच्या भावाच्या पोटात आपण चाकू खुपसला होता तेव्हा त्यालाही असंच झालं असेल ! ... ' याची जाणीव त्याला झाली तेव्हा फार उशीर झाला होता .

हर दिन नया था हर

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 03/02/2021 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। पैसंठ गुजरे अब छासठ का युवा हूँ। आप सबको धन्यवाद और प्रभूसे स्वास्थ की दुआ करता हूँ।