Skip to main content

आम्‍ही आणि आम्‍ही लावलेले दिवे

लेखक विकी शिरपूरकर यांनी सोमवार, 23/06/2008 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
संकलनः विकास शिरपूरकर फिल्मोग्राफी 1. आमिर खान बॉलीवूड मध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान चित्रपटांमध्ये चॉकलेटी हिरोच्या रूपात स्थिरावला. प्रत्येक चित्रपट करताना त्याबद़दल प्रचंड 'चुझी' असलेल्या आमीरने आपल्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीत खूप कमी चित्रपट केले. एरवी कोणत्याही पुरस्कार व प्रसिद्धीपासून दूर राहणारा आमीर सध्या आपला ब्लॉग लिहायला लागल्यापासून बराच चर्चेत आला आहे.

तुला समजलो, आणि समजली तुझी स्वच्छता

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 23/06/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा कविवर्य अनंत ढवळे यांची नितांत सुंदर, अप्रतिम गझल तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता

श्वास श्वास मळमळून यावा तुला बिलगता
खूप दूरवर दिसते आहे तुझी मलिनता

वासाभवती फिरत राहिलो खूपवेळ मी
तुला समजलो,  आणि समजली तुझी स्वच्छता

किती दूरवर आल्यावरती बरे वाटते?
मैलभराचा प्रवास निघतो मोजू बघता..

तुझ्याप्रमाणे जगेन मी ही, तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वच्छ राहता..?

विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी
विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....!

केशवसुमार

माझी चतुर्थी

लेखक ऋचा यांनी सोमवार, 23/06/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मी घरी (खालापूर येथे) गेलेले. माझ्या घरातुन महड येथे जाण्यास १५ मिनिटे लागलात. काल मी विचार केला घरी बसण्यापे़क्षा जरा मढास जाऊन यावे. ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . (मी नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण देवळात जी शांतता असते त्याला तोड नाही.) गाडी काढली आणि निघाले.जरा लवकरच निघालेले कारण चतुर्थी,अंगारकी,एकादशी.. अशा दिवशी भक्तगणांचा उत्साह ऊतु जात असतो. पण माझा इतका विरस झाला ..... तिथे जाऊन मला असे दिसले की महड फाट्याचे तोंड वाहनतळ झाले आहे. त्याच्या समोर "हाळ" नावाचे गाव आहे तिथे बस स्टँड झाला आहे.

बरक्या फणसाचे गरे

लेखक हर्षद बर्वे यांनी सोमवार, 23/06/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ओळ्खीच्या खात्रीलायक कोकणातल्या आंबेवाल्यांकडून किंवा आपले कोणी कोकणात असेल तर त्यांच्याकडे सांगून एक छानसा कलींगडाच्या आकाराचा "बरका फणस" कच्चा असताना घरी आणावा. कच्चा असताना अशासाठी कारण ह पिकला की अतिशय मऊ होतो.आणि लगेच फोडावा लागतो.

'सनई चौघडे '( चित्रपट ) एक फसलेला रिऍलीटी शो......

लेखक प्रगती यांनी सोमवार, 23/06/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे ) रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे. या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही :( सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्‍या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून "कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्

(दिवस असे हे ढकलायचे __)

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 23/06/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
(दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे !!) चालः दिवस तुझे हे फुलायचे ! झोपाळ्यावांचून झुलायचे !! --------------------------------------------------------------------------- दिवस असे हे ढकलायचे! रडत रखडत जगायचे !! ऑफिसला रोज जाणे ! करता रोजची कामे ! बॉसला पुरुन उरायचे !! जळणे शेजार्‍या वर! सोसेना कलिगचे काम घरातले प्रोब्लेम सोडायचे !! होता पहाट वेळी! उरकावी कामांची यादी !! मनात उत्साह भरायचे !! स्वप्नांच्या या खिडकीपाशी ! घे तू श्वास जराशी ! उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !!
Taxonomy upgrade extras

सुखाचा शोध

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 23/06/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
न मागता मिळणे मागुन मिळणे अन मागुनही न मिळणे मनाचा खेळ मिळाल्याची चिकित्सा पुर्तीची अपेक्षा आनंदाचा स्तर भावनांचा कल्लोळ प्राप्तीचा आनंद मागण्याची खंत नाकारल्याचे दु:ख सारीच अपेक्षा सुखाचा शोध अगम्य तो बोध दु:खाचे भय अन दु:खाचीच उपेक्षा
काळा पहाड
Taxonomy upgrade extras

आपली मराठी चालली हो-----परदेशी.

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 23/06/2008 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजच पेपरात ही बातमी वाचली आणि (नसलेले)डोके अधिकच बधीर झाले.८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सानफ्रान्सिसकोला भरणार आहे,असा निर्णय सोळा सदस्यांच्या़ कमिटीने घेतला आहे्. हे सदस्य कोण आहेत,किती विरोधी मतदान झाले वगैरे तपशील सां गितले गेले नाहीत याचाच अर्थ काहीतरी गोलमाल आहे.दुसरे असे की संमेलने ही 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय'भरवायची असतात.अमेरीकेत असे कितीसे मराठी हया संमेलनास हजर राहू शकतील?अमेरीकेत ५ दिवस राहण्याच खर्च ७० ते७५ हजार रु.येणार,आपल्याकडील कितीजण हा खर्च करु शकतील?

म सा सं - पैशे कोण देणार??

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 23/06/2008 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
अ भा म सा महामंडळ या विनोदी संस्थेच्या झालेल्या सभेत, येते मराठी साहित्य संमेलन हे अमेरीकेत घ्यायचे ठरवले आहे. अमेरीकेतही अनेक मराठी साहित्यप्रेमी राहतात त्यामुळे तेथील रसिकांनाही सहित्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळावा ही गोष्ट समजू शकते. पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते.

दुसरी बाजू ऐकली पाहिजे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/06/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
ताई म्हणे बाळूला जावून सांगते आईला तुच मारीलेस मला ऐकून हे आई म्हणे ताईला दुसरी बाजू ऐकली पाहिजे कोकरू म्हणे लांडग्याला जावून सांगते मर्कटाला तुच खाणार मला अन करीशी नुसता बहाणा ऐकून हे मर्कट म्हणे कोकराला दुसरी बाजू ऐकली पाहिजे प्रवीण मारे प्रमोदला पोलीस सांगती कोर्टाला ऐकून हे जज्ज सांगे कोर्टाला दुसरी बाजू ऐकली पाहिजे अपराधी अन निरपराधी बाजू मांडती अपुली आईची प्रीती मर्कटाची भीती अन जज्ज्याची कार्यपद्धती वापरूनी ते ते मध्यस्थी अपुल्या निर्णयास येती शेवटी योग्य निर्णय मात्र ठरवित असते नियती श्रीकृष्ण सामंत