Skip to main content

रोठ

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 08/07/2008 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
:SS साहित्य--एक वाटी बारीक रवा,बारीक चिरलेला कांदा,मिरची व कोथिंबीर,एक वाटी आंबट ताक,मीठ,पाव टी स्पून खायचा सोडा(पूड),एक चमचा तेल,निर्लेपचे भांडे कॄती---रवा घेऊन त्यात ताक व थोडे पाणी घालून फेटावे, नंतर कांदा,मिरची व कोथिंबीर घालावी.अर्धा तास मिश्रण तसेच ठेवावे.भांड्याला थोडे तेल सर्व बाजूने लावून घ्यावें. नंतर मिश्रणात सोडा घालून ते एकवार फेटून लगेच भांड्यात ओतावे.ओव्हनमध्ये किंवा गॅसवर १० ते १५ मि.ठेवावे.मिश्रण फुगून येइल.ताटात ते घेऊन वड्या पाडाव्यात.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावे. झटपट नाश्ता तयार!

मरण मला पाहून हंसले

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/07/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून मी पाहिले माझेच मरण मला पाहून हंसले हंसण्याचे काय कारण पुसता म्हणाले ते आलीच वेळ नेण्याची, न विसरता असते मी सदैव सर्वांच्या मागे सावली होऊन पहाते कोण कसा वागे झडप घालते पाहून तो गाफील जो न समजे जीवन असे मुष्कील खातो मी सदैव हेल्थी फूड ठेवीतो माझे मी आनंदी मूड घेतो मी नियमीत व्यायाम का मी नये राहू इथे कायम जनन मरण असे निसर्गाचा नियम घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त मरणे हे तरी असे उद्याचे सत्य श्रीकृष्ण सामंत

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 08/07/2008 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते. मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन ’रामायण’ आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच.

बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 07/07/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
अमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो. बाबारे, कुणी तरी म्हटला हा, "सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां." तुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे!),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा. माणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा.

विवाहाची पद्यातली आमंत्रण पत्रिका

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 07/07/2008 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
तारूण्याच्या उंबरठ्यावर सुनीत-स्मिताचं स्वप्न एकमेकांच्या सुखदु:खात व्हायचंय त्यांना मग्न ! त्यांच्या अशा प्रेमांकुराची वाढ व्हावी निर्विघ्न , म्हणून योजलंय आम्ही चौघांनी आज त्यांचं लग्न ! दिवस आहे १९ ऑक्टोबर रविवार आहे सुट्टीचा मुहुर्त आहे गोरज वेळ संध्याकाळी सहा चा ! त्यांना द्यायला आशिर्वाद वेळेवर यायची घ्या दक्षता

रशियात दुमदुमला 'जय शिवाजी' चा नारा

लेखक चिन्या१९८५ यांनी सोमवार, 07/07/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .खालील लेख माझ्या ब्लॉगवर व माबोवर मार्चमधे टाकण्यात आला होता. मिसळपावच्या सदस्यांनाही आमच्या उपक्रमाबद्दल कळावे म्हणुन येथेही टाकत आहे. निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | अखंडस्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी || या भुमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही | महाराष्ट्र धर्म राहीला काही | तुम्हांकरीता || यशवंत,किर्तीवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,नीतिवंत अशा जाणत्या राजा शिवछत्रपतींची ,सोमवार दिनांक २४ मार्च रोजी जयंती होती. अशा या महाराष्ट्र गौरवाच्या .. नव्हे ,नव्हे संपुर्ण भारत गौरवाच्या दिवशी आम्ही उत्सव साजरा करायचा असे ४ वर्षापुर्वीच ठरवले.

सारखे शिंकीत जाशी ...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 07/07/2008 15:25 या दिवशी प्रकाशित केले.

राजा बढे यांच्या चांदणे शिंपीत जाशी...  या गीताने आम्हाला पुर्वी एकदा प्रेरणा दिली होती तेव्हा चाळ ही हदरून जाते ची निर्मिती झाली होती
आज आम्हाला पुन्हा एकदा ह्याच गीताने प्रेरणा दिली

TAROT भविष्याची चाहुल घेणे

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 07/07/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रॅक्टिकल विचार करणारी माणसे किंवा भविष्यावर विश्वास नसणार्‍यांचे एक ठाम मत असते की आपण आपले भविष्य घडवत असतो. 'आपले भविष्य आपल्याच हातात !!' परंतु पाश्चिमात्य देशातील भविष्य पाहणारेही 'आपले भविष्य आपल्या हातात !!' असे म्हणत असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. भविष्याची चाहुल घेणार्‍या या एका नवीन आणी आपल्याकडेही हळुहळु प्रसिध्द होत असलेल्या या टॅरोट कार्डस पध्दतीची ओळख. आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता माणसाला सतत असते.
Taxonomy upgrade extras

पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पाटी

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 07/07/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच पुण्यात जाऊन आलो आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लागून एक पाटी लिहिली होती : वहातुकीचे नियम पाळा (स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली :) इकडे यायचे टाळा ! ---------------पुणे वहातुक नियामक मंडळ---------- भन्नाट "डोकॅलिटी" पुणेकरांची !