Skip to main content

((माउस))

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 24/07/2008 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा ही एक प्रयत्न माउस हाताळण्याचा अर्थात प्रेरणा श्री.
Taxonomy upgrade extras

श्रावण बिर्याणी

लेखक स्नेहश्री यांनी गुरुवार, 24/07/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझी खास मैत्रिण गेल्यावर्षी Deuthchland(Germany)ला गेली होती श्रावणाच्य सुमारास. पण श्रावणांत कांदा लसुण खात नसल्याने काय स्पेशल करायचे हा प्रश्नच होता आणि म्हणुन एक प्रयोग म्हणुन ह्या " श्रावण बिर्याणी" चा शोध मी लावला. आता श्रावण महिना सुरुन होणार म्हणजे कांदा-लसुण बंद.

मेथीची दाणे लावुन पातळ भाजी (खांदेशी)

लेखक योगिता_ताई यांनी गुरुवार, 24/07/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुंदनच्या आग्रहाखातीर.... साहित्य: मेथीची पालेभाजी बारीक चिरलेली - २ वाटी शेंगदाणे - १/२ वाटी हिरवी मिरची - ६ ते ७ (चवीनुसार) लसुण पाकळ्या - ५ ते ६ कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार फोडणी साठी - जिरे, मोहरी मीठ चवीनुसार तेल कृती : शेंगदाणे व मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे , कोथिंबीर, लसुण पाकळ्या, जिरे एकत्र मिक्सरवर बारीक वाटण करुन घ्यावी. कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात वरील वाटलेली चटणी घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी टाकुन २ मिनीटे चांगले परतावे.

(माउस)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 24/07/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा

ज्वारीचे नूडल्स

लेखक योगिता_ताई यांनी गुरुवार, 24/07/2008 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
चायनीज पदार्थ आवडणाऱ्या, भाज्या, भाकरी न खाणाऱ्या मुलांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी पौष्टिक पदार्थ करून पाहा. ...... साहित्य - दोन वाट्या ज्वारीचे पीठ, कोबी, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची प्रत्येकी एक वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे, मोड आलेले मूग, मटार, भिजवलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, रिफाईंड तेल एक डाव, चवीपुरते मीठ, लसूण- आलं पेस्ट दोन चमचे. कृती - आपण भाकरीसाठी जसे पीठ मळतो तसे चवीपुरते मीठ घालून ज्वारीचे पीठ मळावे.

ठिणगीच्या शोधात

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 24/07/2008 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
"दहावीचा अभ्यास" हा माझा शाळाशाळातून चालणार्‍या कार्यक्रमातील काही वेताळ अनुभवापैकी हा एक.संबोधन चालू असताना माझे मुलांवर बारीक लक्ष असते.कुठे ठिणगी पडते आहे का? त्या वर्गातील शेठ मंडळीपेक्षा(८५%+ ची हुशार(?) मंडळी) अशा ठिणगीमध्ये मला जास्त रस असतो. भांडुप मधील एक बेताची शाळा . मुलांमध्ये प्रोटीन आणि हिमोग्लोबीनची कमतरता दिसत होती. कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगी आली व पाया पडली.

सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

लेखक फटू यांनी गुरुवार, 24/07/2008 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या जेव्हा कुणी समोरून क्षणी निघून जातं माझ्या जणू ती व्यक्ती तू असल्याचा भास होतो राजा तुझी मुर्ती वसली आहे दोन्ही पापण्यांत माझ्या सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या असलो जरी मी अफाट दुनियेमध्ये मिसळलेला आतून मात्र मी आहे पुर्ण हरवलेला अन एकला या एकाकी जगामध्ये मला सोडून गेली तू राजा सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या जरी आजही होते पापण्यांची उघडझाप माझ्या त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा ती सारी स्वप्नं राज्य करतात
Taxonomy upgrade extras

दारु

लेखक मिनल यांनी गुरुवार, 24/07/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
परवा शनिवारि पुण्यात टिळ्क रोडवर खाद्डी करता गेले होते. तिथे एका हॉटेलात एक मुलगि सिगारेट होधत होती...आणि छान हवेत वलय सोडत होति..बघुन आश्चर्य वाटले..(बाई आणी सिगारेट अशि सवय डोळ्याला आणी मनाला झालि नाहिये :() नंतर एका हॉटेल मध्ये मुलिंना दारु पिताना पण बघितले...पुणेरि असल्यामुळे हे बघायचि सवय नव्हति.. मनात विचार आला खरच आपलि संस्क्रुति बद्लत आहे का? बायकांनी दारु सिगारेट पिणे योग्य आहे का? माझ्या मनाला पट्त नाहिये...तुमचि मद्त हवी आहे.......

तहान !!

लेखक निसर्ग यांनी गुरुवार, 24/07/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
बघा ही मनी पिते कशी पाणी

पाउस..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 24/07/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला. तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..! कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला. मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras