Skip to main content

"कवडसा"

लेखक मनीषा यांनी बुधवार, 30/07/2008 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीतूनी उतरे अलगद असा देई उजेडाचा वसा अंधारलेल्या खोलीला प्रकाशाचा एक कवडसा | गोल, शुभ्र, उजळसा धरती वरती चंद्र जसा अंधाराला छेदुनी आला प्रकाशाचा एक कवडसा | सप्तरंग सामावे कसा भूमिवरी ना दिसे ठसा तेजाचा तो मोहक तुकडा प्रकाशाचा एक कवडसा | अंधार निराशेचा असा दाटे फार मनी कसा उजळीत येई नवीन आशा प्रकाशाचा एक कवडसा |

"ठेविले अनंते तैसेचि रहावे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 30/07/2008 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.कदाचित, "ठेविले अनंते तैसेचि रहावे." असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला. अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा. अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता. अनंताला दोन तीन बहिणी होत्या.

यु मी और 'हम'............

लेखक राधा यांनी मंगळवार, 29/07/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचक मंडळीना नमस्कार. 'व्यक्ती आणि व्यक्ती'(२ भाग) व 'वाघ्या' या लिखाणानंतर आता थोडा काही वेगळ लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. आधीच्या प्रतिक्रिया वाचुनच हे लिखण करते आहे , म्हणुनच पुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियांची साथ हवी आहे. इतक्यातच काजोल आणि अजय देवगण यांचा ' यु मी और हम' पिक्चर बघीतला. तो कसा बनला आहे किंवा अभिनयाबद्दल मला नाही लिहायच हा पण त्याची 'कथा' मात्र मनात घर करुन गेली. 'alzimer'हा रोग झालेल्या एका स्त्री ला तिचा नवरा नव्हे ' जीवनसाथी' कसा आधार देतो ते यात दाखवले आहे.

मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 29/07/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा. संपर्क : प्रा.

तुझे नि माझे मिटू दे अंतर

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 29/07/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
दहनाभुमिवर फुले वहाया येशील ना तू माझ्या नंतर मधले सारे विरून जाऊ दे मिटून जाऊ दे आपुले अंतर अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन अश्रु तुझे ते प्रेम बोलतील पुन्हा स्मृतींचे मेघ दाटतील वेळ निघुनी असेल गेला पाचोळ्यावर पाउस ओला उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण हिशोब कसला झाले गेले आठवणींचे काहूर उरले रंग उडुनी गेला आता दोनच अश्रु जाता जाता असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ मागे
Taxonomy upgrade extras

तुझ्या गळा, माझ्या गळा..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 29/07/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या गळा, माझ्या गळा, सीबीआय चौकशीच्या माळा. दाद मागायची कोणाला ? चला रे आता कोर्टात चला. तुज "पोटा", मज "मोक्का". आणखी "टाडा" कोणाला? लाज वाटते का तुम्हाला ? मला कुणाची, देशाला.
Taxonomy upgrade extras

सोड्याची खिचडी

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 29/07/2008 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती. साहित्य- ४ वाट्या तांदुळ, १ वाटी सोडे, २ चमचे हळद, ४ चमचे तिखट, मीठ, तेल, हींग, लिम्बु/ चिन्चेचा कोळ, २ बारीक चिरलेले कांदे,गरम मसाला, आले-लसुन पेस्ट ,लवंग्,दालचीनी, गरम पाणी, कोथिंबीर्,खवलेले खोबरे कृती- करण्यापुर्वी १/२ तास तान्दुळ धुवुन ठेवावेत व सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे जरा छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसुण पेस्ट, गरम मसाला ,मीठ लावुन लिंबु पिळुन वा चिन्चेचा कोळ घालुन १० मिनीटे ठेवावे. एका तव्यात तेल तापवुन त्यात हिन्ग व थोडा कांदा परतुन घ्यावा.

जी.एम.आर.टी. ला सहल- कोणकोण येणार

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/07/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जी.एम.आर.टी. ला सहल काढायचा बेत ठरतो आहे. जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप : http://www.misalpav.com/node/2738 जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल: http://www.misalpav.com/node/2738#comment-38198 मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल.

तवसाळं

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 29/07/2008 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
धनंजयाचे केळ्याचे सांदण वाचून आणि (कट्ट्यातला फोटो)पाहून मला सांदणाच्या बहिणीची आठवण झाली.मी आमच्या त्सेंटा आजीला गुर्कन कुकन अर्थात काकडीचा केक ह्या नावाने तवसाळं खिलवले आहे.(तवस- काकडी) साहित्य- जाड रवा १/४ किलो, एका नारळाच्या वाटीतले खोबरे, १/४ किलो गूळ, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचे तुकडे, १/२ वाटी काजू/ बदाम तुकडे,वेलदोडा पूड, १/४ चमचा सोडा किवा १/२ चमचा बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ. १ मोठी काकडी. खिरे नव्हेत.