मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोड्याची खिचडी

पद्मश्री चित्रे · · पाककृती
श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती. साहित्य- ४ वाट्या तांदुळ, १ वाटी सोडे, २ चमचे हळद, ४ चमचे तिखट, मीठ, तेल, हींग, लिम्बु/ चिन्चेचा कोळ, २ बारीक चिरलेले कांदे,गरम मसाला, आले-लसुन पेस्ट ,लवंग्,दालचीनी, गरम पाणी, कोथिंबीर्,खवलेले खोबरे कृती- करण्यापुर्वी १/२ तास तान्दुळ धुवुन ठेवावेत व सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे जरा छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसुण पेस्ट, गरम मसाला ,मीठ लावुन लिंबु पिळुन वा चिन्चेचा कोळ घालुन १० मिनीटे ठेवावे. एका तव्यात तेल तापवुन त्यात हिन्ग व थोडा कांदा परतुन घ्यावा. त्यात मसाला लावुन ठेवलेले सोडे नीट परतुन घ्यावेत. दुसर्‍या भांड्यात तेल तापवुन त्यात लवंग्,दालचीनी,हळद,तिखट,गरम मसाला ,मीठ टाकुन त्यात उरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यावर तांदुळ टाकुन ते ही परतुन घ्यावेत. २/३ मिनीटांनी त्यावर तव्यातील सोडे टाकावेत व मिश्रण ही नीट परतावे. मग त्यात ६ वाट्या पाणी घालुन भात नीट शिजु द्यावा. भात मोकळा शिजुन वाफ आली की त्यावर कोथिंबीर्,खवलेले खोबरे टाकावे. गरमागरम सोड्याची खिचडी तय्यार.

वाचने 7678 वाचनखूण प्रतिक्रिया 16

मनस्वी 29/07/2008 - 15:39
मस्त पाककृती फुलवा.. धन्यवाद!
श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती.
अजूनही येउदेत ना! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

श्रीयुत संतोष जोशी 29/07/2008 - 18:34
नमस्कार, छानंच आहे. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

संदीप चित्रे 29/07/2008 - 20:45
थंडीच्या दिवसांत सोड्याच्या खिचडीने सुरू झालेली रविवारची सकाळ .... अहाहाहा !!! -------------------------- www.atakmatak.blogspot.com

यशोधरा 29/07/2008 - 22:21
फुलवा, अख्खे सोडे घातले तर नाही का चालणार?

In reply to by यशोधरा

पिवळा डांबिस 30/07/2008 - 04:09
अख्खे सोडे घातले तर नाही का चालणार? तुम्ही घाला, आम्ही खिचडी खायला जरूर येऊ!! यशोधराबाई, मार्केटात जाऊन सोड्याचा भाव विचारलाय का हल्ली कधी? अहो महाडचे पांढरे आणि सरळ (गोल नव्हेत!!) सोडे १००० रुपयांच्या खाली मिळत नाहीत.... लॉटरी लागलेली दिसतेय एका मुलीला!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

पद्मश्री चित्रे 30/07/2008 - 12:14
अख्खे सोडे घातले तर नाही का चालणार? अग अक्खे सोडे लांब अस्तात ते मिळुन येत नाहीत भातात..आणि महाग पण कित्ती! शिवाय, १२ महिने नाही मिळत ते. डीसेंबर्-जानेवारीत येतात ते अस्सल्..मग येतात ते कोलम्बी यंत्रात वाळवुन ,सरळ केलेले.. त्याला ना चव ना वास..

चित्रा 30/07/2008 - 05:32
मस्त! अमेरिकेत कुठे मिळत असतील सोडे? कोणाला काही कल्पना आहे का?

In reply to by चित्रा

प्रियाली 30/07/2008 - 06:07
चित्राने आधीच विचारला आहे. ;) चीन्यांच्या दुकानात मिळतील का? (नाही अमेरिकेतलं सगळं चिन्यांकडूनच येतं, मिळालेच सोडे तर चीनी दुकानातच मिळतील अशी अटकळ आहे) ;)

In reply to by प्रियाली

धनंजय 30/07/2008 - 09:02
सुकी सुंगटे/कोळंबी ना? ही चिनी दुकानांत बघितली आहेत. त्यातही काही विशेष असेल तर कोणी फोटो चिकटवता का? म्हणजे चिनी/कोरियन/थाई दुकानांची चक्कर मारून शोधता येईल.

In reply to by धनंजय

पिवळा डांबिस 30/07/2008 - 16:43
सुकी सुंगटे/कोळंबी ना? ही चिनी दुकानांत बघितली आहेत. सुंगटा खंयसरपण मिळतंत, अगदी रँन्च ९९ मध्ये सुद्धा!! पण चांगले सोडे हंयसर अमेरिकेत मिळणंत नाय!!!

यशोधरा 30/07/2008 - 07:33
>>>तुम्ही घाला, आम्ही खिचडी खायला जरूर येऊ!! कधी येताय, बोला काका! :) लॉटरी नाही लागली तरी पाहुणचारात काही कमी नाही ठेवणार!! :)

मंदार वाईकर 30/07/2008 - 08:03
सोड्याच्या खिचडी बरोबर बोंबलाच कालवण्........वा!

विसोबा खेचर 30/07/2008 - 08:56
वा वा! ही खिचडी म्हण्जे आमचा वीक पाईंट! :) या सुंदर पाकृबदल धन्यवाद फुलवा...! (सोडेप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन 30/07/2008 - 11:03
ही खिचडी म्हण्जे आमचा वीक पाईंट! :) या सुंदर पाकृबदल धन्यवाद फुलवा...! - असेच म्हणतो. वा, काय आठवण करून दिलीत!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

II राजे II (verified= न पडताळणी केलेला) 30/07/2008 - 11:21
सोड्याची खिचडी :? आम्हाला फक्त खायाचा सोडा व पिण्याचा सोडाच माहीत आहे,,,, हा कुठला सोडा आहे ??? जरा फोटू टाकता का ह्याचा ??? नाय तर आम्ही करत फणसबी तयार करण्याची तयारी करु :) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

पद्मश्री चित्रे 30/07/2008 - 12:01
येत नाहीए फोटो चढवता....