Skip to main content

मीनाकुमारी यांचा वाढदिवस.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 01/08/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर सप्रे नमस्कार ! आज मीनाकुमारी यांचा वाढदिवस आहे , त्या निमित्ताने मागे त्यांचे काढलेले एक स्केच इथे जोडत आहे , यावेळी लेख नाही लिहू शकलो - क्षमस्व ! काल महंम्मद रफी यांची २८ वी पुण्यतिथी होती त्या निमित्ताने काही या आठवड्याच्या अखेरीस जमल्यास लिहून मिपा वर देण्याचा प्रयत्न करीन ! तोवर या सोज्वळ नटीला आमची श्रध्दांजली ! उदय सप्रे

जीवनगाणे

लेखक घाटावरचे भट यांनी शुक्रवार, 01/08/2008 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
रौद्रभयंकर महाप्रवाही अस्तित्वाला झोकून देणे ओबडधोबड अन काटेरी वाटेवरती चालत जाणे परिणामांची ना करिता पर्वा संग्रामी लढत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे संघर्ष नसे चुकलेला जगती परमश्रेष्ठ परमेशालाही कधी जगाशी कधी स्वतःशी समरकाल हा येतच राही ईर्ष्येने होण्याच्या विजयी क्षणक्षण कणकण झिजत राहाणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे नसे वावगे बाळगणे वेडी स्व्प्ने निजहृदयात संभवलेल्या असंभवाचे बीज असे त्या स्वप्नांत 'दुराग्रही हा...दुराग्रही हा' म्हणून स्वतःला हिणवून घेणे खुळ्या जरी स्वप्नांसाठी या लढणे माझे जीवनगाणे या स्वप्नांपुढती प्राणांना येई कवड्यांचे मोल कारण

रिता गाभारा .....

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 01/08/2008 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
देहात माझीया हा चंद्र वितळून गेला । अन अंतरी मोगराही सुगंध मिसळून गेला । झुकवुनी लाख पाहिले नजरेस मी माझीया । तीर तुझ्या नजरेचा काळजास वेधून गेला । बेरंगी दुनियेचा ना कायदा मी मोडला । इशाराच एक तुझा मज हाय रंगवून गेला । वेचियेली मी दुःखेही माझ्या दोहो करांनी। फासा दुर्दैवाचा मज दान देऊन गेला । ओळखले नसे कधीही माझ्याच मी जगाला । सौख्याचा क्षण मजला नेहमीच फसवून गेला । गर्दीत अनोळख्यांच्या मज मैत्र एक भेटला । जीवलगच तो जीवाचा मग घाव घालून गेला । लाविले कसास माझ्या मी प्रत्येक श्वासाला । क्षणाक्षणांनी काळही मजला परखून गेला । शोधियले त्रिखंडात मी त्याच सर्वेश्वराला । -हुदयीचा गाभारा प

यश आणि अपयश

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 01/08/2008 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. " प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं. भेटल्यावर मला म्हणाले, " थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या. गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली.

निरागस

लेखक स्मित यांनी शुक्रवार, 01/08/2008 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या स्थनिक दैनिकात वाचलेली हि बातमी..... नाताळच्या दरम्यान बरीच स्नता ()(उत्तर द्रुव) साठी लहानग्यानी लिहिलेली पत्रे पोश्तात जमा होतात. एक पत्र असे होते........ Dear God Heaven We don't have money. Dad is jobless and mama is sick. Please send us 500$ so that we can celebrate Christmus. Yours, John पोश्ट-मास्तरने ते पत्र रोटरी क्लब कडे पाठवले.

विरह

लेखक ल्ल्या यांनी शुक्रवार, 01/08/2008 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेतल्या प्रियकराची प्रेयसी त्याला सोडुन गेली आहे..( कायमची नाही..) तेव्हा बघुया काय म्हणतोय प्रियकर...... विरह सहन होत नाही विरह तिचा आता मला... दोन दिवसात येते म्हणाली महीना आता होत आला, कसं रहावस वाटत तिला माझ्यावाचुन इतका वेळ दुर... प्रत्येक क्षण तुटतोय मी इथे हे सांगायला झालोय तीला आतुर.... जातांना ती तशी देऊन गेली होती दोन दिवसांच आगाऊ प्रेमं.. पण... दोन दिवसांचा महीना होईल, याचा कुठे होता मला नेम.. हीच्या आठवणीत मी इथे दिवसभर कुढायचं... एकच वेळा जेवायच,आणि रात्रभर जागायच... हीने मात्र मस्त मनसोक्त्त हींडायच.. चापुन-चुपुन खायच..आणि डाराडुर झोपायचं.. बघा ना...
Taxonomy upgrade extras

कविता कसली करू तुजवरती

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 31/07/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--प्रशांत) करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती निष्टा माझी दरवळेल होवूनी सुगंध राहिल तुझी अभिलाषा होवूनी बेबंध करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती दिवस तो येईल होवूनी मी नशिबवान मिळेल मला तुझेच फक्त अलिंगन सूर शहनाईचे सजवतील मिलनाची धुन करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती तुजवीण दुनिया भासे सदैव सूनी तुझे नी माझे श्वास गाती गूंजन मिळूनी करू दे मज तुजवर प्रीती कविता कसली करू तुजवरती श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

आमचे डि.डि. जोशी सर,

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 31/07/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कलाशिक्षक दि. दा. जोशी यांचे निधन पुणे, ता. २२ - न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे माजी कलाशिक्षक दि. दा. जोशी (वय ७४) यांचे आज निधन झाले. ........ शिवसेनेचे माजी आमदार (कै.) मो. दा. जोशी यांचे ते बंधू होत. दि. दा. जोशी प्रारंभी रसायनी (जि. रायगड) येथे शिक्षक होते. नंतर टिळक रोड येथील शाळेत त्यांनी चित्रकला व इतिहासाचे अध्यापन केले. पुणे माध्यमिक शिक्षक संघ आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता.

स्व.मह॑मद रफी या॑ना आदरा॑जली

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी गुरुवार, 31/07/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
आज ३१ जुलै! माझ्या अत्य॑त लाडक्या गायकाचा, रफीसाहेबा॑चा स्मृतिदिन! त्या॑च्या पवित्र स्मृती॑ना माझे लाख लाख प्रणाम.. अल्पचरित्र - २४ डिसेम्बर १९२४ रोजी, अमृतसर जवळच्या कोटला सुलतानपूर ह्या छोट्याश्या गावात हाजी अली मह॑मद या॑ना सहावे पुत्ररत्न झाले. त्यावेळेस कोणीच ही कल्पना करू शकले नसेल की हेच मूल अखिल विश्वात महान गायक म्हणून नाव गाजविणार आहे.. मह॑मद रफी!! लहानपणापासूनच रफीसाहेबा॑ना गाण्याची आवड होती. त्या॑चा गोड गळा त्या॑च्या मेव्हण्याने, मह॑मद हमीदने हेरला व त्या॑ना स॑गीत-शिक्षेसाठी प्रोत्साहन दिले.