Skip to main content

कंग/कुंग पाओ टोफु..!

लेखक भाग्यश्री यांनी रविवार, 03/08/2008 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. :) तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang's Chinese Bistro मधे.. तिथे ही डिश खाल्ली.. 'कंग पाओ चिकन' .. खूप खूप आवडली.. आणि तेव्हापासून मी ती नेहेमीच घ्यायला लागले.... दर वेळेला बाहेर जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं, घरी ट्राय करावी.. तर सद्ध्या चालू श्रावण..

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा !!!

लेखक फटू यांनी रविवार, 03/08/2008 07:15 या दिवशी प्रकाशित केले.

(आभार : चारोळी मराठीवर्ल्ड्.कॉम वरील एका ई-शुभेच्छा पत्रावरून घेतली आहे) आपलाच मित्र, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
Taxonomy upgrade extras

स्वार्थ: काहि सैल/स्वैर विचार

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 03/08/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
"अख्खा समाजच स्वार्थी झालाय.. " मी एकदम चमकून पाहिले. ट्रेनच्या डब्यात मागे बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये हे संभाषण चालू होते.. अख्ख्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणणारा अजूनही लेक्चर झोडतच होता "जरा भारतात बघ एकेक व्यक्तींनी सगळ्यांसाठी आयुष्य पणाला लावलं.. रामापासून ते बुद्ध, गांधी अश्या व्यक्तीच्या समाजात स्वार्थीपणा अजून टिकला हेच नवल... " मी यापुढचेही संभाषण ऐकत होतो.. पण आता कानावर शब्द पडत होते पण कळत नव्हते कारण डोक्यात अचानक विचार चमकला "खरंच आपण स्वार्थी आहोत का?.. मी स्वार्थी आहे का? स्वार्थी असावं का? " "स्वार्थी कोणाला म्हणावे? " मनाच्या एका कोपऱ्यातून प्रश्न..

आम्ही काव्याचे काव्याचे काव्यकरी रे!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 03/08/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक जुनं गाणं आठवतं. "आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे करूं काम,स्मरूं नाम मुखी नाम हरी रे" त्याच कल्पनेने "आम्ही काव्याचे काव्याचे काव्यकरी रे लिहूं काव्य,स्मरूं शब्द मनी प्रेम प्रेम रे" हे असं सांगताना कवी काय किंवा शेतकरी काय दोन्ही बिचारे स्वतःला कामात व्यग्र ठेऊन समाजाची सेवाच करत असतात म्हणाना.अर्थात एक पोट पुजेची सोय करतो तर दुसरा मनाच्या पुजेची सेवा करतो असं म्हणायला हरकत नाही. अलिकडच्या वातावरणाची तुलना विचारात घेतली तर कवी आणि computer programer हे पण जवळ जवळ सारखेच.दोघेही निर्मीती करीत असतात.कवितेची कल्पना सारखी असली अथवा कवितेचा विषय सारखाच असला तरी दोन कवी तेच शब्द वापरून काव्य

शुभेच्छा!!

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/08/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सगळ्या मिपा कुटुंबातील मित्र आणि मैत्रीणींना मैत्रीदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! आपली मैत्री अशीच वृद्धींगत होत राहो हीच ईशचरणी प्रार्थना!!! गंध अलौकिक याचा क्षणभंगूर जीवन जरी शुभ्र पाकळ्या कोमल नाजूक नाभी शेंदरी छंद समर्पाणाचा आगळा वेड्याने त्या जोपासताना मातीलाही गंध दिला फांदीवरूनी ओघळताना मैत्री व्हावी ऐसी जिवाला जीव देणारी जीवन ऐसे सार्थ व्हावे पारिजात फुला परी... - प्राजु

धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता -

लेखक सचिन-पाताळधुंड्या यांनी शनिवार, 02/08/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसहिष्णुता - . मुळातच "मुळमुळीत" असलेली हिंदुच्या मानसिकतेचा वापर (गैरवापर? ) करत गांधीनि अहिंसेच्या मार्गाने शांत, सोम्य लढा दिला. अहिंसा,उपोषण, धर्मनिरपेक्षता, शत्रुप्रेम, मवाळपणा असल्या गोष्टी मग आपसुकच हिंदुमधला तो मुळळितपणा वाढवायला कारणीभुत ठरल्या असाव्यात... . . आणि हिंदुमध्ये मुळातच असलेल्या सहिष्णूतेचं रुपांतर षंढप्रव्रुत्तित केंव्हा झाले हे आम्हाला कळलेही नाहि. . मला तर वाटतय कि "धर्मनिरपेक्षता" ह्या शब्दाची संयुक्तिक व्याख्या परत अधोरेखित व्हायला हवी.

अस्तित्व

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शनिवार, 02/08/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व पुसुनी जाण्याची का व्यर्थ मनी मी भीती धरून होतो विसरून सर्व गेले इतक्यात लोक मजला हृदयी कधी जयांच्या मी वस्ती करून होतो ते सखे सोबतीच सारे माझे शब्दासही महाग झालो ज्यांच्या मैफिली जमवुनी तयांच्या रात्रंदिन मी गप्पात रंगलो होतो आता शोधत जाणे स्वतःच स्वतःला कशास पाहावी तुटक्या आधाराची वाट अन का धरावा भरवसा माणसांचा उतरताच ऊन्हे जेव्हा सावलीही सोडते पाठ

गाव आणि शहर ख्रर काय आणि खोट काय

लेखक नोहिद सागलीकर यांनी शनिवार, 02/08/2008 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
भलतच निराळ जीवनमान, आहे शहरातलं आणी खेड्यातलं आज मी दोन वर्ष झाली सागलीतल्या एका छोट्या खेड्या तुन पुन्या ला आलो आहे, जवा इथलं जीवनमान पहिलं तेव्हा गावा विषयी फारच किव वटु लागलीय पर्याय सापडेना झालाय की ही दरी कशी बुजवायचि .मग तो प्रश्न कोणता ही असो ,

एक चांगला पायंडा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 02/08/2008 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्राध्यापक जयंत नारळीकरांनी सुरू केलेली "आयुका" ही संस्था सगळ्यांनाच किमान ऐकूनतरी माहित असेल. तिथे खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो हेही सुज्ञास सांगणे न लगे. तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा काहीतरी खगोलशास्त्राबद्दल लिहिणार असेन. नाही, या वेळेस मला वेगळ्याच विषयाकडे मिपाकरांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि का प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असावा असं मला वाटतं. आयुकामधे आत्ता विश्वरचनाशास्त्राबद्दल एक कॉन्फरन्स सुरु आहे. त्यासाठी एकूण मिळून जवळजवळ १५० लोक तरी पुण्यात येऊन जातील. यात अनेक परदेशी पाहुणेही आहेत.