Skip to main content

"किती धटिंगण किती भयंकर"... ई डंबन...

लेखक बेचवसुमार यांनी शुक्रवार, 08/08/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरेच्या "कितीक हळवे कितीक सुंदर" ही कविता वाचुन आम्हालाही आमचे सोकॉल्ड हळवे क्षण आठवले... किती धटिंगण किती भयंकर ----------------------------------------- किती धटिंगण किती भयंकर तात तुझे अन बंधु खरोखर त्याच जागी त्या येऊन गेले फाडुनि माझे चड्डी धोतर

`रामदास'बोध

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 08/08/2008 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते. समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते. बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता. सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या. महाराजांची रसवंती झरझर पाझरत होती.

०८:०८:०८:०८:०८:०८

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 08/08/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे व सेकंद या सगळ्या जागी ०८ हाच आकडा असलेला एक क्षण नुकताच येऊन गेला. असा क्षण पुन्हा शंभर वर्षांनंतर २१०८या साली येईल. तो क्षण पहायला त्या वेळी आपल्यातले कोणी असणार नाही. या वर्षी फक्त एक सेकंद उशीराने जन्मलेल्या मुलाला सुद्धा तो क्षण पाहण्यासाठी शतायुषी व्हावे लागेल. पण ०१, ०२ वगैरे आंकडे सहा जागी असलेले अशासारखे क्षण गेल्या आठ वर्षांपासून दर वर्षी येत आहेत आणि पुढील चार वर्षे म्हणजे १२ डिसेंबर २०१२ पर्यंत येत राहतील.

(सांगा ढेकुण कुणी हा पाहिला )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 08/08/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------- सांगा ढेकुण कुणी हा पाहिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला झोपुनिया असता खाटवरी हो, तसे होतो आम्ही गहनविचारी डंखुनी गेला तो विषधारी कुठे लपुन बाई हा राहिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला रात्री जागविती, हे ढेकुणजन हे सुयोग आम्हालागी तुझा ना साहे बळेबळे ओढता चादर हो मालवुनि बघा दिवा खोल्यांचा डंख पदी झाला मेल्याचा म्हणे अमल्याजी, देह हा फोडिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला ------------------------------------------------------------------------------------------------------------ मुळ गाणे - सांगा मुकुंद कुणि हा पाहिला सांगा मुकुंद कुणि हा पाहिला रासक्रीडा करिता

एका तळ्यात होती बदके पिले अनेक...

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 08/08/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
एका तळयात होती बदके पिले अनेक.... मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक... संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'... होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख... सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक... पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख... कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक... जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक... सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक... आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक... सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक... त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक.... ( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)
Taxonomy upgrade extras

झटपट घावन

लेखक ऋचा यांनी शुक्रवार, 08/08/2008 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ. कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे. तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते. टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.

वृत्ती-प्रवृत्ती..

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 08/08/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली. वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.

नाट्यगृहातले व्यत्यय : जाणीव आणि सुधारणा

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 08/08/2008 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर ते दीडशे रुपयांची तिकिटे काढून नाटक पहायला आलेल्या प्रेक्षकाची किमान अपेक्षा असते की हे नाटक विनाव्यत्यय पहायला मिळावं... पण तसं फ़ारसं नशिबात नसतं हल्ली... नाटकातल्या व्यत्ययाचे विविध प्रकार : १.खाईखाई सुटलेले प्रेक्षक : पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना लक्षात येत नाही... कोणत्याही वेळी खाणं हा हक्क वाटतो प्रेक्षकांना.. वेफ़र्सच्या पिशव्या, त्यांचा आवाज, वेफ़र्स चावताना होणारा कुरूमकुरूम आवाज अगदी लांबवर ऐकू जातो.