Skip to main content

खुळा अश्वत्थामा

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 11/08/2008 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्यापासून माझा चातुर्मास सुरु होतो. रोजचे काम आटपून घरी जायला उशीर होतो. आहे त्या वेळात जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो.

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 11/08/2008 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका विद्वान माणसाने मला सांगितलं, "तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे." कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही. तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्या दारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता. ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत

हापिसात टायमपास करण्याच्या युक्त्या

लेखक लबाड मुलगा यांनी सोमवार, 11/08/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या.... . डोळे मिटा............... .. .कान कोरा............ .. .आधी उजवा ... मग डावा....परत उजवा मग डावा ऽ दहा पाच वेळा झाले की मग हातात हात गुंफुन सरळ वर न्या .... अग आइ ग म्हणुन जोरदार आरोळी द्या ऽऽ हाताचा तळवा नाका वर घासा जोरदार नाक दुखेपर्यत ऽऽ खुर्चीवर उभे राहा तोल संभाळुन ऽऽ परत बसा माण मोडा बोटे मोडा ऽऽ छ्या असे जोरात म्हणुन कागद उडवा परत गोळा करा ऽऽ शांत बसा एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या.... . डोळे मिटा............... .. (तुम्ही अजुन तुम्हाला माहित असलेल्या युक्त्या टाका: मी अजुन पाणी ओततो)

पाऊस..

लेखक पद्मश्री चित्रे यांनी सोमवार, 11/08/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस असा हा झरतो ,धारांतुन गाणी गातो नभ घेवुनी उशाशी ,मोत्यांची स्वप्ने देतो.. ओल्या मनात माझ्या दडुनी खुशाल बसतो रोमांच होवुनी वा हातावरी उमटतो.. थेंबात ये रुपेरी, घेई हवेत झोके मातीतुनी उगवती , त्याची अनंत रुपे.. पाऊस आसमंती, पाऊस अंतरात पाऊस होवुनी मी ,माझ्या मनी तृषार्त...
Taxonomy upgrade extras

अंकुर

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 11/08/2008 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या भल्या पहाटे आपल्या गावाने ओलेत्यानेच आपले स्वागत करावं. दाराशी पोचल्या पोचल्या पोचल्या तोच पारिजताकाचा शुभ्र सडा दारी अंथरलेला असावा. अंगणातलं झाडंन झाड ओळखीच हसावं. पावसानं ओलीचिंब ती, माझ्या अंगणातली झाडं, जणु अपार माया निथळत असावीत. घर आल्याची आश्वस्त जाणीव क्लांत मनाला निववुन जावी, इतक्यात सकाळची नांदी देणारी कोकिळेची 'कूहssकूहssss' अशी हाक आसमंतात घुमावी अन टप्पकन एक टपोरा गारेग्गार पाण्याचा थेंब अगदी अचुक कपाळावर पडावा.

राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ?

लेखक राघव यांनी सोमवार, 11/08/2008 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशासमोरचे अनेक प्रश्न अन् अडचणी बघून त्याचे मूळ कशात असावे असा विचार मनात आला. त्यावर चिंतन केले असता जे वाटले ते खाली मांडत आहे. आपली मते जाणून घेण्यास उत्सुकता आहेच! कोणत्याही देशातील लोकांची मानसिकता, त्या देशाचे भविष्य ठरवत असते. देशासाठी, राष्ट्रासाठी जेथे विचार उगम पावतात तेथे अडचणींवर मात करण्याची शक्ती उत्पन्न होत असते. राष्ट्रभावनेच्या अभावामुळेच आज भारतात एकापेक्षा एक अडचणी उद्भवल्या आहेत. त्या संपवायचे प्रयत्न अपुरे पडतात त्यामागचे कारणही हेच आहे.

सलाम अभिनव बिंद्राला!!!

लेखक गिरीराज यांनी सोमवार, 11/08/2008 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना. आणि सुवर्णपदक मिळाले हे सांगितले तर कानांवर विश्वास बसेना! शेवटी विश्लेषकांनी त्यांचे बोलणे आटोपते घेऊन थेट प्रक्षेपण दाखवायला सुरवात केली तेव्हा अगदी आपणच पदक मिळवले इतपत मी हवेत तरंगायला लागलो.२८ वर्षांचा सुवर्णपदकांचा दुष्काळ त्याने संपवला. प्रथमच वैयक्तिक सुवर्णपदक हा एक इतिहासही घडवला. पदकप्रदान समारंभ बघतांना पापणी मिटवू नये असेच होत होते.