ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३
3
...तरीही "भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या "ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन् थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला.
""काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी?'' वेताळानं विचारलं.
विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला.
वेताळ आणखी कावला. म्हणाला, ""बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता.