Skip to main content

सत्यनारायण..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 21/08/2008 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, येत्या रविवारी इथे .. माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा मानस आहे. कोणाकडे त्या पूजेची मराठीतून एम पी ३ आहे का? किंवा कोणत्या साईटवर ऑडीओ पूजा मिळू शकेल .. हे सांगेल का कोणी? आपल्याकडे असल्यास मला कळवा. मी माझा गुगल पत्ता व्य. नि. मधून कळवेन. धन्यवाद. - प्राजु

आठवण........

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 20/08/2008 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
..आठवण माझी कधीतरी येईलच तुला तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळी आसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकडे एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला अडखळलेला तो शब्द मीच असेल कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल कधी जर सुटला बेधुंद गार वारा मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल........
Taxonomy upgrade extras

(प्रतिबिंब )

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/08/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची संप्रेरणा http://www.misalpav.com/node/3122 फुलवाची "प्रतिबिंब" तु खरा होतास किंवा ते तुझे प्रतिरूप होते वा तुझे नवे नाव वाहत्या जालात होते गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी शब्द माझे डीलीटुनी वाया कसे जात होते जळजळीचे संस्थळ होते मी तिथे ही बारका प्रतिसादाची भीक तेथे प्राण हे मागीत होते फ़सले हे जग मला; नव्हते कोणी वेगळे हास्य होवोनी कट्यावरी फ़जीती ही मापीत होते ग्लासाच्या आड माझ्या अपमान मी बन्दिस्त केला साद तरी ही व्यनीतुनी मित्र सारे देत होते :::: खतरनाक विजुभाऊ. :)
Taxonomy upgrade extras

विडंबन ("कर्ज" च्या निमित्ताने)

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 20/08/2008 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी जाल का, सांगाल का, सुनवाल का या हिमेशला.. नाकातुनी गाऊ नको. वापर जरा अपुला गळा..! आधीच चांगल्या गायकांची पैदास आहे थांबली. रियालिटी शोचीच आता भाउगर्दी वाढली. मुकेश, रफ़ी, किशोरचा तो काळ मागे लोटला. मी कधी अल्ताफ़, मिका ,आतिफ़ही कुरवाळिला.. सांभाळूनी अपुल्या कानाला मी जरासे ऐकले. तेव्हाच गाणे वाजले "आशिक बनाया आपने". सांगाल का त्या रेशमिया, की कुत्री ऐकत थांबली. आणि द्याया दाद त्यांनी रात्र भुंकून काढली. कुणी जाल का, सांगाल का.. -- अभिजीत दाते मूळ गीत - कुणी जाल का, सांगाल का.. गायक - वसंतराव देशपांडे

स्पर्श तुझ्या शब्दांचा...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 20/08/2008 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेदनेस शमवितो, दु:खातही सुखवितो. संजीवनी जणूकाही - स्पर्श तुझ्या शब्दांचा. मरुभुमीत सन्कटान्च्या वसंत होऊनी फुलतो. गुलमोहराचे अस्तित्व - स्पर्श तुझ्या शब्दांचा. विकल मना सावरतो अंधारात दिप धरतो. भास्करच नभीचा भासे - स्पर्श तुझ्या शब्दांचा. वादळात आधार होतो तप्त ऊन्हे साहतो. कल्पवृक्ष असे मजसाठी - स्पर्श तुझ्या शब्दांचा. आत्म्याचे अमरत्व आहे ईश्वराचे पावित्र्य आहे. अम्रुततुल्य आहे आई - स्पर्श तुझ्या शब्दांचा.

हा पहाटवारा...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 20/08/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या नाजूक बाहुंची मिठी अन् प्रेमाचा उबारा, मोहवून जातो मज हा पहाटवारा. केसांमधे लहरतो, श्वासामधे बहरतो, बाहूत या मोहरतो हा पहाटवारा. अनमोल आहे, मुक्त, अनंत आहे, आहे सृष्टीची अमृतधारा हा पहाटवारा. कधी सावली प्रेमाची, कधी उब वात्सल्याची, कधी गोड्सा शहारा... हा पहाटवारा. कधी सखे तुझा हा सुगंध घेऊन येतो. श्वासात भरून राहतो हा पहाटवारा.

पण............

लेखक नम्रता वर्तक यांनी बुधवार, 20/08/2008 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी लिहावस वाटत पण........ शब्द सुचत नाही......... काहीतरी बोलावस वाटत पण........ जिभ वळत नाही......... थोड रडावस वाटत पण........ अश्रु येत नाही........... सुखदुखः वाटाविशी वाटतात पण........ चागली साथ मिळत नाही...........
Taxonomy upgrade extras

झाडाच्या मुळांना मला एकदा विचारायचंय...

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 20/08/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
झाडाच्या मुळांना मला एकदा विचारायचंय... :झाडं जोमानं वाढू लागतात तेव्हा मुळांना जमिनीत किती खोल शिरावं लागतं? :झाडांना हिरवी पानं फुटत असतात हे मुळांना समजतं तरी का कधी? :फांदीवर पक्षी जे गाणं म्हणतात ते मुळांना कधी येतं का ऐकू? :झाड फुलांनी बहरतं तो सुगंध मुळांना श्वासात भरुन घेता येतो का? :झाड प्रकाशात न्हात असतं तेव्हा मुळांच्या अंधारायुष्यात कवडसा तरी पडतो का? :झाडं मोठी झाल्यावर मुळांचं अस्तित्वच नाकारतात तेव्हा मुळांनाही फुटतात का हुंदके? झाडाच्या मुळांना मला एकदा विचारायचंय... -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras