मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पर्श तुझ्या शब्दांचा...

अंकुश चव्हाण · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वेदनेस शमवितो, दु:खातही सुखवितो. संजीवनी जणूकाही - स्पर्श तुझ्या शब्दांचा. मरुभुमीत सन्कटान्च्या वसंत होऊनी फुलतो. गुलमोहराचे अस्तित्व - स्पर्श तुझ्या शब्दांचा. विकल मना सावरतो अंधारात दिप धरतो. भास्करच नभीचा भासे - स्पर्श तुझ्या शब्दांचा. वादळात आधार होतो तप्त ऊन्हे साहतो. कल्पवृक्ष असे मजसाठी - स्पर्श तुझ्या शब्दांचा. आत्म्याचे अमरत्व आहे ईश्वराचे पावित्र्य आहे. अम्रुततुल्य आहे आई - स्पर्श तुझ्या शब्दांचा.

वाचने 1894 वाचनखूण प्रतिक्रिया 2

प्रशा॑त Wed, 08/20/2008 - 23:58
छान........