Skip to main content

फोड रे मटका...

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 23/08/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड
Taxonomy upgrade extras

पालक भजी

लेखक Sanika यांनी शनिवार, 23/08/2008 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
२ कप बारिक चिरलेला पालक, १ कप बारिक चिरलेला कान्दा, १ इन्च किसलेल आल, ४-५ कढिपत्ता, १ छोटा चम्चा लाल तिखट, १/२ चम्चा हळ्द, १ चम्चा धणे पुड, पाव चम्चा गरम मसाला, १ छोटा चम्चा तीळ , १ छोटा चम्चा ओवा, मिठ चविप्रमाणे, १ कप बेसन्,तेल. ६ चम्चे तेल कडकडीत गरम करा.बेसन सोडुन वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि तेलाचे मोहन घालुन १५ मिनिटे झाकुन ठेवा. त्यात बेसन व थोडे पाणी घालुन सरसरीत भिजवा. कढईत तेल तापवुन खरपूस तळा. गरमा गरम पालक भजी आल घातलेल्या चहा बरोबर खा.

सल ...

लेखक मनीषा यांनी शनिवार, 23/08/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | त्या गूढ जलाशयावरी तरंग हळू उमटती जे खोल अंतरी काही अनामिक उमगत नाही | मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | बंध कसले बांधती? प्राणांस कसली भिती ? जोडण्या ईश्वरापुढती हे हात न माझे उरती |

भारनियमनाचा भार

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 23/08/2008 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा महावितरणाने सांगितले की पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत वीज भारनियमन अटळ आहे. ह्या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले होते की 'पुणे पॅटर्न' मध्ये युनिटमागे जास्त पैसे दिल्यास पुणेकरांना भारनियमन सोसावे लागणार नाही. त्याला बहुतेकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पुण्यात जास्त पैसे आकारून नियमित वीज देणे सुरू झाले(नक्की ना? चू. भू. द्या. घ्या.) हाच 'पॅटर्न' मग त्यांनी ठाणे, नवी मुंबईकरीता वापरला. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा मिळेल असे वाटून जास्त कोणी ह्या विरोधात गेले नाही.

माझी रेखाटने- कृष्ण

लेखक सैरंध्री यांनी शनिवार, 23/08/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आधीच्या रेखाटनांचा प्रतिसाद बघून अजून काही रेखाटने टाकण्याचा हुरूप आला आहे. आधीच्या रेखाटनांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आज गोकुळाष्टमी.

Khaproli

लेखक Sanika यांनी शुक्रवार, 22/08/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
1 cup kanik, 1/2 cup chirlela gool, 1 motha chamcha khobare, chimutbhar meeth, paani aani tel. Pratham ek bhandyat kanik, khobare, meeth, goolneet mix karun ghya.Mishran ekdam doshyachya mishranapramane patal have.Tavyawar tel tapavun daavbhar mishran gheun pasarava.Eka side ne neet gulabi kharpus bhajle ki dusri side neet bhaja. Ekdam khuskhushit wa chavila chan lagtat.